अबुल कलाम आझाद योजना | १०वी १२वी विध्यार्थ्यांना २५००० अर्थसाहाय्य | असा करा अर्ज

अबुल कलाम आझाद योजना

अबुल कलाम आझाद योजना | १०वी १२वी विध्यार्थ्यांना २५००० अर्थसाहाय्य | असा करा अर्ज

वंदे मातरम मित्रानो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आणि मोठी बातमी घेऊन आलो आहोत. तुम्ही १० वी आणि १२ वी पास आहेत का मग हि बातमी तुमच्यासाठी आहे. दहावी आणि बारावीच्या विध्यार्थ्यांना आता पुढील शिक्षणासाठी क्रमशः १५००० व २५००० अर्थसाहाय्य मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता, अटी, नियम, अर्ज कुठे व कधी करायचा हि संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हि माहिती पूर्ण वाचा. चला तर मग जाणून घेऊया योजना काय आहे.

अर्ज कुठे व कसा करावा

अबुल कलाम आझाद योजना | १०वी १२वी विध्यार्थ्यांना २५००० अर्थसाहाय्य | असा करा अर्ज
पुणे महानगरपालिका दरवर्षी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेंतर्गत 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करते. विद्यार्थ्यांनी dbt.punecorporation.org वर ऑनलाइन अर्ज भरावा आणि भरलेल्या अर्जाची प्रिंट-आउट सबमिट करावी. आवश्यक मूळ कागदपत्रे स्कॅन करून सोबत अपलोड करावीत.

Talathi Bharti 2023 apply online Now | तलाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | तलाठी भरती ऑनलाईन अर्ज

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

१) भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना

अबुल कलाम आझाद योजना | १०वी १२वी विध्यार्थ्यांना २५००० अर्थसाहाय्य | असा करा अर्ज
या वर्षी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र १० वी (SSC) किंवा कोणत्याही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुण्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजनेअंतर्गत १५००० रु.ची एक वेळची शिष्यवृत्ती मिळेल. अर्जदार खुल्या प्रवर्गातील असल्यास ८०% गुणासह, मागासवर्गीय प्रवर्गातील किंवा रात्र शाळेत शिकत असल्यास ७०% गुणासह तर ४०% अपंग असल्यास ६५% गुणासह १०वी किंवा कोणत्याही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.

२. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना

अबुल कलाम आझाद योजना | १०वी १२वी विध्यार्थ्यांना २५००० अर्थसाहाय्य | असा करा अर्ज
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजनेतून प्रत्येकाला उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी (HSC) किंवा कोणत्याही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 25,000 रु.ची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. अर्जदार खुल्या प्रवर्गातील असल्यास ८०% गुणासह, मागासवर्गीय प्रवर्गातील किंवा रात्र शाळेत शिकत असल्यास ७०% गुणासह तर ४०% अपंग असल्यास ६५% गुणासह १०वी किंवा कोणत्याही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.

abdul kalam yojana advertise
हेही वाचा: ड्रोनच्या किमतीच्या 100% दराने आर्थिक सहाय्य | 100% subsidy on drones for farmers?
हेही वाचा: Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

या योजनांसाठी कोण अर्ज करू शकतो?

  • विद्यार्थी हा पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील असावा.
  • विद्यार्थ्याने चालू वर्षात SSC किंवा HSC परीक्षेत किमान 80% गुण मिळवलेले असावेत.
  • विद्यार्थी मागास प्रवर्गातील असल्यास किंवा पुणे महानगरपालिकेच्या नियमित/रात्रीच्या शाळेत शिकत असल्यास, त्याने/तिने किमान 70% प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी 40% अपंग असल्यास, किमान टक्केवारी 65% असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्याने पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेत अर्ज केलेला असावा.
हेही वाचा: Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2.0 | पडीक जमिनीतून कमवा १२५००० | दर वर्षी ३% वाढ

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

abdul kalam yojana 1

१) रेशनिंग कार्डची पहिले व शेवटचे पान अपत्य पडताळणीसाठी जोडणे आवश्यक.

२) कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती/ भाडे करारनामा यांपैकी आवश्यक.

३) अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक आवश्यक.

४) वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला / शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक.

५) मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे व अपंगांनी अपंगत्वाचा दाखला आवश्यक राहील.

६) बोर्ड मार्कशीट तसेच CBSE & ICSE शाळेतून उत्तीर्ण झाले असल्यास शाळेचे टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. इयत्ता १० वी / इयत्त १२ वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याना ८०% पेक्षा जास्त गुण, पुणे महानगरपालिकेच्या शाळेत अथवा रात्र प्रशालेत शिकत असलेले विध्यार्थी, मागासवर्गीय प्रवर्गातील विध्यार्थी यांना ७०% पेक्षा जास्त गुण ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५% तसेच कचरा वेचक / बायोगॅस प्रकल्पावर काम करणारा / कचऱ्याशी संबंधित काम करणारा असंघटीत कष्टकरी कामगार यांचे पाल्यास ६५% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी लाभासाठी पात्र ठरतील.

७) महाविद्यालय प्रवेश शुल्क पावती जोडणे आवश्यक. महाविद्यालय प्रमुखाच्या शिफारसीमधील सर्व रकाने भरून स्कॅनिंग करून अर्ज सोबत अपलोड करावेत.

८) दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.

९) इयत्ता १० वी / इयत्ता १२ वी नंतर शासनमान्य वा विद्यापीठ मान्य संस्थेत कोणत्याही एका शाखेत प्रवेश घेतला असल्यास शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात येईल.

१०) पुणे महानगरपालिका अर्थसंकल्पातील उपलब्ध तरतुदीपेक्षा एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास अर्जदारांना समान रक्कम किंवा इयत्ता १० वी कमाल रक्कम रु. १५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल व इयत्ता १२ वी कमाल रक्कम रु.२५,०००/- अर्थसहाय्य दिले जाईल..

११) मूळ कागदपत्रे स्कॅनिंग करून अर्ज सोबत अपलोड करावेत.

अधिक माहितीसाठी, कृपया 18001030222 (टोल फ्री क्रमांक) वर कॉल करा.

दीप: अर्जदाराने वरील सर्व कागदपत्रे व अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे. उपलब्ध आर्थिक तरतूद व नियम अटींचा विचार करून अर्ज नाकारण्याचा वा स्वीकारण्याचा अधिकार मा. मुख्य समाज विकास अधिकारी, स.वि.वि. पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील. तसेच त्यांचा या विषयाबाबत निर्णय अंतिम राहील.

2 thoughts on “अबुल कलाम आझाद योजना | १०वी १२वी विध्यार्थ्यांना २५००० अर्थसाहाय्य | असा करा अर्ज”

Leave a comment