कुक्कुट पालन व्यवसाय संपूर्ण माहिती | जो करेल कुक्कूटपालन, त्याचे घरी खेळेल चलन!!

कुक्कुट पालन व्यवसाय

Table of Contents

कुक्कुट पालन व्यवसाय संपूर्ण माहिती | जो करेल कुक्कूटपालन, त्याचे घरी खेळेल चलन!!

कुक्कुट पालन व्यवसाय केवळ छंद किंवा पुरक व्यवसाय न राहता अर्थार्जनाचा स्वतंत्र व्यवसाय झालेला आहे. पारंपारिक पध्दतीने एक व्यक्ती थोडक्याच पक्षांचे संगोपन करु शकेल. आणि अर्थातच अशा पध्दतीत वर्षाकाठी एका कोंबडी पासून जास्तीत जास्त ५० ते ६० अंडी उत्पादन मिळवू शकेल. परंतु शास्त्रोक्त पध्दतीने पक्षांचे संगोपन केल्यास त्यापासून निश्चितपणे अपेक्षित लाभ मिळण्यास मदत होईल.

कुक्कुट पालन व्यवसाय – कशाकरिता?

कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी उद्देश निश्चित करणे आवश्यक आहे. कोंबडी पालनाचा व्यवसाय

अ. अंडी उत्पादना करिता

ब. केवळ मांसाकरिता किंवा

क. उपरोक्त दोन्ही करिता करता येईल.

एकदा कोंबडी पालनाचा उद्देश निश्चित झाला की, त्यानुसार कोंबडी करिता घर बांधणी, प्रक्षेत्रावर ठेवावयाची कोंबडीची जात व त्यासोबत व्यवसायाचे दृष्टीने इतर नियोजन करता येईल.

हे हि वाचा: 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

हेही वाचा: नोकरी करावी की शेती?

कुक्कुट पालन व्यवसायाचे कायदे

१. कमी जागा लागते.

२. कमी गुतवणूकीत लवकर उत्पन्न मिळते.

३. २० ते २२ आठवडयात अंडी उत्पादन सुरु होते तसेच ८-१० आठवडयात मांसल पक्षी विक्रीस तयार होतात.

४. जोपासायला सोपे.

५. पक्षांची व अंडयाची सहज वाहतूक करता येते.

६. पक्षी व अंडयांची बाजारातील मागणी भरपूर आहे.

७. तांत्रिक प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे.

कुक्कुट पालन व्यवसायाच्या पध्दती

अ) गाडी पध्दत (Deep Liter System)

१. गादी पध्दतीत जमीनीवर धानाचा भुसा किंवा तूस टाकावा लागतो यालाच गादी असे म्हणतात.

२. गादी किमान ६ इंच जाडीची असावी.. ३. आठवडयातून दोनदा तरी गादी संपूर्ण हलवावी त्याला रॅकींग म्हणतात.

४. गादी सतत कोरडी राहील याची काळजी घ्यावी.

५. ओलसर वाटल्यास गादीत १०० स्क्वे. फूट जागेत १ किलो चुन्याची फक्की वापरावी. ६. विष्ठा गादीवरच टाकली जात असल्यामुळे कूजलेल्या गादीचे खत तयार होते.

७. गादी पध्दतीत ब्रॉयलर पक्षास १ स्क्वे.फूट प्रती पक्षी जागेची आवश्यकता असते व लेअर पक्षास २ ते २.५ स्क्वे.फूट प्रती पक्षी जागा जागते.

हे हि वाचा: राष्ट्रीय पशुधन मिशन | वैरण विकास योजना | पडीक जमिनीत वैरण लावायला १००% अनुदान | Apply Now

हे हि वाचा: लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

कुक्कुट पालन व्यवसाय गादी पध्दतीचे फायदे

१. कमी जागेत यशस्वी कुक्कुट पालन

२. ५० पक्षांपासून साधारणतः १ टन उपयुक्त खताची निर्मिती.

३. कृमी व परोपजीवी जंतुपासून संरक्षण मजुरी खर्च कमी.

४. संगोपन कमी जिकीरीचे असते.

बी) पिंजरा पध्दती

१. गादी पध्दतीप्रमाणे घराचे बांधकाम करुन त्यात पक्षांचे पिंजरे ठेवतात पण या घराला बाजूच्या भिंती नसतात फक्त जाळीच असते.

२. पिंजरा पध्दतीत प्रति ६० ते ७५ चौरस इंच प्रति पक्षी जागेची आवश्यकता असते.

३. पिंज-याचे आकारमान १५” लांबी १२” रुंदी, १६” मागची उंची व पुढची उंची १८” असावी यात ३ पक्षी ठेवता येतात. खाद्य व पाण्यासाठी नालीच्या आकाराची भांडी समोरच्या दिशेने तसेच तळाशी अंडी गोळा होण्याकरिता उतरती जाळी असते.

कुक्कुट पालन व्यवसाय पिंजरा पध्दतीचे फायदे

१. पक्षांची हालचाल कमी होते त्यामुळे खाद्य कमी लागते व उत्पन्न चांगले मिळते, “अंडयाची प्रत चांगली असते.

२. विष्टेचा व पक्षांचा सरळ संबंध येत नसल्यामुळे रक्ती हगवण, जंत व इतर रोग होत नाही त्यामुळे औषधावरील खर्च वाचतो.

३. मजुरी खर्च कमी लागतो.

४. अनुत्पादक व आजारी पक्षी त्वरीत ओळखता येतात.

५. व्यवस्थापन सुलभ होऊन खर्चात बचत होते.

६. एका नजरेत सर्व पक्षी दिसतात.

हे हि वाचा: ड्रोनच्या किमतीच्या 100% दराने आर्थिक सहाय्य | 100% subsidy on drones for farmers?

कुक्कुट पालन व्यवसाय जागेची निवड

फार्म लोकवस्तीपासून तसेच हायवेपासून दूर असावा कारण आवाज गडबड गोंधळ इत्यादीमुळे पक्षावर ताण येतो. जमीन खडकाळ व उतरणीवर असावी म्हणजे पावसाचे पाणी साचणार नाही. व्यवस्थित रस्ता असावा व मार्केट जवळ असावे. विज व पाण्याची उपलब्धता असावी.
बांधकाम करताना प्रकाश व वायुविजन व्यवस्थित राहील यासाठी खालील बाबींचा विचार करावा.
१. दिशा शेडची लांबी किंवा दिशा पूर्व पश्चिम असावी म्हणजे सूर्यप्रकाश सरळ आत येणार नाही.
२. रुंदी – शेडची रुंदी ३० फूट असावी.
३. लांबी – लांबी आवश्यकतेनुसार ठेवावी. सर्वसाधारणपणे ३० फूट बाय १०० फूट एकंदर ३००० स्क्वे.फूट चे घर उत्तम मानण्यात येते. यात ३००० मांसल पक्षी तसेच १४०० ते १५०० अंडयाचे पक्षी ठेवता येतील.
४. भिंती – शेडच्या भिंती २.५ फूट ठेवून त्यावर ४.५ फूट उंचीची पक्की जाळी बसवावी.
५. छप्पर – छप्पर सिमेंटच्या पत्र्याचे असावे, म्हणजे उन्हाळयात गरम होणार नाही सज्जा ३.५ फूट – बाहेरच्या दिशेने असावा त्यामुळे पावसाचे पाणी आत येणार नाही.
६. उंची – घराची उंची १२ ते १४ फूट असावी.
७. जमीनीपासून उंची जमीनीपासून घराची उंची कमीत कमी ३ फूट वर असावी.
८. अंतर – दोन शेडमधील किमान अंतर २५ ते ३० फूट असावे.
९. पिंजरा पध्दतीत घर बांधताना अंडयावरील पक्षांचे शेड ५ ते ७ फूट उंचीचे पिलर्स (खांब) घेवून त्यावर
बांधावे म्हणजे वर्षभर विष्ठा काढावी लागत नाही व उत्तम प्रकारचे खत उपलब्ध होते.
१०. घरात उंदीर, घुस, मांजर, चिमण्या, कावळे इ. येणार नाहीत याची काळजी घेवून बांधकाम करावे. घरे बांधतांना नजीकच्या पशुधन विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

कुक्कुट पालन व्यवसाय पक्ष्यांचे खाद्य

कुक्कुट पालन व्यवसायात सर्वाधिक खर्च हा खाद्यावर होतो. खाद्य संतुलीत असणे आवश्यक आहे. कोंबडयांना वयानुसार पुढीलप्रमाणे निरनिराळे खाद्य द्यावे लागते.
पिलांच्या व कोंबड्यांच्या वयानुसार खाद्य देण्याचा तक्ता

वय आठवडेखाद्य प्रति पक्षी
१० ग्रॅम
२० ग्रॅम
३० ग्रॅम
४० ग्रॅम
५० ग्रॅम
५५ ग्रॅम
६५ ग्रॅम
७० ग्रॅम
८० ग्रॅम
१०८० ग्रॅम
११९० ग्रॅम
१२९० ग्रॅम
१३ ते १६१०० ग्रॅम
१७ ते १८११० ग्रॅम
१९ ते २०१२० ग्रॅम
२१ पुढे१३० ग्रॅम

खाद्य – पहिले ४/५ दिवस पिलांना खाद्य कागदावर पसरवून द्यावे त्यानंतर चिक फिडरमध्ये खाद्य द्यावे… सुरवातीला ३ दिवस भरडलेला मका द्यावा ८ आठवडेपर्यंत चिक मॅश खाद्य द्यावे. औषधे, लसीकरण, चोची कापणे कार्यक्रम वेळापत्रानुसार करावे.

हे हि वाचा: राष्ट्रीय पशुधन मिशन | वैरण विकास योजना | पडीक जमिनीत वैरण लावायला १००% अनुदान | Apply Now

अंड्यावरील एका पक्ष्याला ७२ आठवडे पर्यंत लागणारे खाद्य (अंदाजे)

पक्ष्यांपुढे २४ तास सतत खाद्य असावे. अंडयावरील पक्ष्यांना खाद्यामध्ये केल्शियम, क्षार यांचे मिश्रण करुन देणे आवश्यक आहे. गरजेनुसार शिपला पूड, खाद्यात मिसळून द्यावी हे नसल्यास पक्षी पातळ कवचाची किंवा कवचहीन अंडी घालतात.

आठवडेखाद्यकिलो
० ते ८चीक मॅश१.५
९ ते २०ग्रोअर मॅश६.५ ते ७
२१ ते ७२लेअर मॅश३७ ते ४०
२१ ते ७२ आठवड्यांमधे पक्षांचे वजन साधारणपणे १४०० ते १५०० ग्रॅम पर्यंत होते.

कुक्कुट पालन व्यवसाया साठी १०० किलो खाद्य बनवण्याचा फॉर्मुला

Kukut Palan feed formula

ब्रडूर मांडणी आणि पिल्लांचे संगोपन

फार्म एक दिवसाचे पिल्ले विकत घेवूनच सुरु करावा पिले आणण्यापूर्वी घर तयार करुन ठेवणे आवश्यक आहे. सुरुवातीला घरात चिक गार्ड लावून त्यात २ ते ३ इंच जाडीचा धानाचा भुसा पसरावा व त्यावर २ फूट अंतरावर १.५ फूट उंचीची गोलाकार पुठ्ठा अथवा पत्र्याची मित ब्रूडरच्या भोवती उभी करावी.

यालाच चिकगार्ड असे म्हणतात. चिकगार्डमुळे पिले सतत उबेच्या छायेत राहतात. पिलांना पहिले ४ ते ५ दिवस पेपरवरच किंवा कमी उंचीच्या ट्रेमध्ये खाद्य द्यावे.

दोन आठवड्यानंतर चिकगार्ड काढून टाकावा. पिलांना उब देण्यासाठी ब्रूडरचा (हिटरचा) वापर करतात. यात इलेक्ट्रीक कॉईल अथवा बल्बज बसविलेले असतात. एका पिलास २ बॅट उष्णता लागते व एका ब्रुडरखाली २०० पिले ठेवता येतात. यासाठी पत्र्याचे चौकोनी किंवा गोल ब्रूडर तयार करुन घ्यावे.

बांबूच्या टोपल्यास शेणाने सारवून त्यात बल्ब बसविल्यास कमी खर्चात ब्रुडर तयार करता येतो. यासाठी ४ फूट व्यासाचे व १.५ फूट खोल टोपले निवडावे. ब्रुडरचे तापमान खालील प्रमाणे ठेवावे.

२० आठवड्या नंतर पक्षांना सर्व प्रकाशासह एकूण १६ ते १८ तास उजेडाची गरज असते. यासाठी २०० चौरस फुटास ६० वॅटचा बल्ब ७ ते ८ फुट उंचीवर लावावा. पिलांना आणल्याबरोबर ५ टक्के ग्लुकोजयुक्त पाणी भरपूर द्यावे.

१ ला आठवडा ९५ °F२ रा आठवडा ९० °F
३ रा आठवडा ८५ °F४ था आठवडा ८० °F
हे हि वाचा: Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2.0 | पडीक जमिनीतून कमवा १२५००० | दर वर्षी ३% वाढ

कोंबड्याना करावे लागणारे लसीकरण

Kukut palan Lasikaran
टीप: सर्व बर्फात आणाव्यात व तयार केलेल्या लसी बर्फातच ठेऊन सकाळी किंवा संध्याकाळी लसीकरण करावे
हे हि वाचा: Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023 | नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता “या” महिन्यात

कुकूटपालनातील रोग व प्रतीकात्मक उपाय

 • उपचारापेक्षा प्रतिबंधक उपाय उत्तम
 • पक्षी खरेदी अधिकृत व नामांकित अंडी उबवणी केंद्राकडूनच करावी
 • पक्ष्यांचे घरातील तापमान व वायुवीजन हे योग्य राहील याकडे विशेष लक्ष द्यावे
 • घरे स्वच्छ ठेवावीत, वेळोवेळी निर्जंतुक करुन घ्यावीत, थोडया जागेत प्रमाणापेक्षा जास्त पक्षी ठेऊ नयेत, योग्य प्रमाणात जागा द्यावी.
 • पक्ष्यांना पुरेसे व संतुलीत खाद्य द्यावे.
 • रोग प्रतिबंधक लसी योग्य वेळी टोचून घ्याव्यात.
 • आवारामध्ये उडते पक्षी, कुत्रे, मांजर, उंदीर येवू नये असा प्रतिबंध करावा.
 • मेलेल्या पक्ष्यांना खड्डयात खोल पुरून टाकावे अगर जाळावे.
 • कळपातील आजारी पक्षी त्वरीत बाहेर काढून त्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन करावे.
 • नवीन पक्षी जुन्या पक्ष्यात मिसळू देऊ नयेत
 • शेडच्या बाहेर चुन्याची फक्की अथवा फिनाईलचे पाणी भरुन ठेवावे, म्हणजे घरात प्रवेश करतांना त्यामध्ये पाय बुडवून प्रवेश करावा लागेल
 • औषधोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा
 • आजारी किंवा मेलेल्या पक्ष्यांची शवचिकित्सा तज्ञाकडून करुन घ्यावी, यामुळे रोग निदान नक्की करता येते व त्याप्रमाणे औषध योजना करता येते
 • एकाच वयोगटातील पक्षी एकत्र ठेवावेत

कुक्कुट पालन व्यवसायात घ्यावयाची काळजी

 • एक दिवसाच्या माद्या या आरक्षण केल्यास सरकारी अथवा खाजगी अंडी उबवणी केंद्रातून (हॅचरीज) मधून मिळू शकतात.
 • व्यवसाय चालू करण्यापूर्वी कुक्कुट पालनाचे प्रशिक्षण घ्यावे.
 • प्रत्येक जिल्हयामध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त / जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, कुक्कुट प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत अल्प मुदतीचे कुक्कुट पालन प्रशिक्षण वर्ग नियमित घेण्यात येतात.
 • कुक्कूट व्यवसायासाठी लागणा-या लसी या ठराविक मात्रांपर्यंत जवळील पशुधन विकास अधिका-यांकडून सवलतीच्या दरात मिळतात परंतु मोठया प्रमाणात लसीची आवश्यकता भासल्यास, ती लस आपण संबंधितमार्फत किंवा स्वतः विकत आणू शकता.
 • कुक्कूट व्यवसायात उपयोगात येणा-या सर्व लसी बर्फामध्ये ठेवाव्या लागतात.
 • कुक्कूट पालन व्यवसायाच्या तांत्रिक व इतर मार्गदर्शनासाठी आपण जवळचे पशुधन विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
 • आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अनुत्पादक कोंबडया नियमितपणे काढून टाकाव्यात यालाच छाटणी करणे असे म्हणतात.
 • या व्यवसायात तंत्रज्ञान महत्वाचे असून उत्तम व्यवस्थापन ही आर्थिक यशाची गुरुकिल्ली आहे.

जो करेल कुक्कूटपालन, त्याचे घरी खेळेल चलन !!

कुक्कुट पालन व्यवसायाबद्दल अधिक माहितीसाठी ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थाळाला भेट द्या.

2 thoughts on “कुक्कुट पालन व्यवसाय संपूर्ण माहिती | जो करेल कुक्कूटपालन, त्याचे घरी खेळेल चलन!!”

Leave a comment