गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय | Remedy to get cow buffalo on the heat

गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

शेतकरी मित्रानो नमस्कार स्वागत आहे तुमचं www.shetakarimaja.com या आपल्या शेतकऱ्याच्या साठी कार्यरत असलेल्या वेबसाइट व YouTube चॅनेल मध्ये. शेतकरी मित्रानो आपण जाणता भरतील ७०% लोकसंख्या हि शेतीवर आधारित असून शेतीपूरक व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा भारतात खासकरून महाराष्ट्रात मोट्या प्रमाणात केला जातो.

गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय करोनाच्या काळात तर तरुण पिढी मोट्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वाळलेली पाहायला मिळाली पण जेवढ्या झपाट्याने दुग्ध व्यवसाय चालू होत आहेत त्याच वेगाने दुग्ध व्यवसाय बंध हि होत आहेत आणि याच सर्वात मोठं कारण म्हणजे गाय म्हैस वेळेवर माजावर न जाणे किंवा वारंवार रिपीट होणे हे आहे. तर Remedy to get cow buffalo on the heat गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय आज आपण या भागात जाणून घेणार आहोत.

हा लेख आपण अखेर पर्यंत वाचलात तर आपल्याला गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय नक्कीच कळतील व त्याचा तुम्ही आपल्या दुग्ध व्यवसायात वापरलं व आपला दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात गाई म्हैस माजावर न येण्याची करणे व उपाय.

हेही वाचा: Soil Testing माती परीक्षण कशासाठी?

हेही वाचा: Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय

गाई म्हैस माजावर न येणे व वारंवार उलटण्याची करणे

 • गाई म्हैस माजावर न येण्याचं मुख्य कारण म्हणजे गाई म्हैस कुपोषित असणे.
 • गाई म्हैशी मध्ये खनिज द्रव्यांची कमतरता असणे.
 • गाई म्हैशीचे गर्भाशय साफ नसने
 • गाई म्हैशीच्या गर्भाशयाला विकार असणे.
 • बीज-अंडकोश किंवा प्रज्वलन नलिकेचे आजार उध्दभवणे
 • जनावरांचा आहार असंतुलित किंवा निकृष्ट दर्जाचा असणे
 • वातावरणातील बदल व अधिक तापमान
 • गाई म्हैशीची राग प्रतिकार शक्ती कमी असणे
 • गाई म्हैशी जंत किंवा कृमी तसेच अंगावर गोचड्यांचा प्रधुरभाव असणे
 • शेतकऱ्यांचे गाई म्हैशीच्या माजाविषयीचे अज्ञान
 • कृत्रिम रेतनात वापरलेले वीर्य चालल्या दर्जाचे नसणे

गाय म्हैस माजावर न येण्यासाठी वरीलपैकी एक किंवा अनेक करणे असू शकतात. गाय म्हैस माजावर न येण्यासाठी कारण जरी कोणतेही असले तरी त्याचा परिणाम डायरेक्ट आपल्या दुग्ध व्यवसायावर होतो. गाई म्हैशींचा भाकड काळ वाढतो. दुग्ध व्यवसायाचे आर्थिक नियोजन बिघडत व पर्यायी बहितांशी दुग्ध व्यवसाय बंध पडतात. हि वेळ आपल्या दुग्ध व्यवसायावर येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. गाय म्हैस माजावर येण्यासाठी खालील उपाय करून पहा.

हेही वाचा: शास्वत उत्पन्न मिळवून देणार रेशीम शेती व्यवसाय | Reshim Sheti Vyavsay Yojana Mahiti aani Anudan

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय (Remedy to get cow buffalo on the heat):

गाय म्हैस वेळेवर माजावर येणे हा दुग्ध व्यवसायातील कणा असून घरगुती नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाय करून हि समश्या आपण सोडवू शकता. गाय म्हैस वेळेवर माजावर येण्यासाठी २१ दिवसाची घरगुती नैसर्गिक व आयुर्वेदिक उपचार आपण आज इथे सांगणार आहोत. या उपचार पद्धतीचे प्रामुख्याने ५ भाग पडतात.

भागदिवसउपायसमाधान
दिवस १ ला., २ रा., ३ रा., ४ था., ५ वा.,सुरवातीचे ५ दिवस एक मुळा आणि २०ग्राम जिरे गाई किंवा म्हैशी ला रोज द्यावयाचे आहे.यामुळे गर्भाशयात असणारी कृमी, घाण निचरा होण्यास मदत होते. संसर्ग कमी करण्यास मदत होते.
दिवस ६ वा., ७ वा., ८ वा., ९ वा.,पुढील चार दिवस कोरफडीचे एक पान प्रत्येक दिवशी गाई व म्हैशीला खायला द्यावयाचे आहेकोरफड जिवाणू, विषाणू व बुरशीनाशक म्हणून काम करते.
दिवस १० वा., ११ वा., १२ वा., १३ वा.,पुढील चार दिवस चार मुठी शेवग्याची पाने प्रत्येक दिवशी गाई व म्हैशीला खायला द्यावयाचे आहेशेवग्याच्या पानाच्या वापरामुळे गाई म्हशीं माजावर येण्यासाठी आवश्यक खनिजद्रव्य व जीवनसत्त्वांची पूर्तता होते.
दिवस १४ वा., १५ वा., १६ वा., १७ वा.,पुढील चार दिवस हाडजोडच्या २ ते ३ कांड्या प्रत्येक दिवशी गाई व म्हैशीला खायला द्यावयाचे आहेहाडजोड वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने त्याचा फायदा गाई म्हैशींना माजावर येण्यासाठी व गर्भ धारणेसाठी होतो.
दिवस १८ वा., १९ वा., २० वा., २१ वा.,शेवटचे चार दिवस चार मुठी कडीपत्त्याची पाने, एक चमचा हळद, चवीसाठी मीठ व गूळ प्रत्येक दिवशी गाई व म्हैशीला खायला द्यावयाचे आहेकाडिपत्त्यामध्ये मोट्या प्रमाणात आढळणारी फॉसफरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम खनिजद्रव्य गर्भधारणा स्थिर ठेवण्यास मदत करते.

हा उपचार करत असताना ५०% शेतकऱ्याचा अनुभव आहे कि १२ व्या दिवशी गाई म्हैस माजावर येते व गाभण राहण्यास हि मदत होते. ३० ते ३५% टक्के जनावरे १९ दिवशी माजावर येत व गाभण हि राहते. उर्वरित १५ ते २०% जनावरांना माजावर येण्यासाठी २१ दिवस लागतात.

उपचारादरम्यान गाई किंवा म्हैस कोणत्याही दिवशी मजला आली तरी २१ दिवस हा उपचार सुरु ठेवण्यास काही हरकत नाही याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हेही वाचा: चिया सीड्स शेती | अमेरिकन पीक मिळवून देईल रु. १००० प्रति किलो | chia seeds farming in marathi

हेही वाचा: Side effects of Pesticides and Herbicides | शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ? कीटकनाशक व तणनाशक बॉटल वरील या चिन्हांचा अर्थ काय होतो?

गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपचाराने एक शेतकऱ्याला जरी आम्ही मदत करू शकलो तरी आम्ही स्वतःला धान्य मानतो. आपण हा उपचार नक्की करून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा त्याने इतर शेतकऱ्यांना फायदा होईल. एकमेका करू साहाय्य अवघे करू शेतकरी समृद्ध!

गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय.pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

शेती विषयक शासकीय माहितीसाठी येथे भेट द्या…

सदर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कालवा. येथे क्लिक करून आले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

8 thoughts on “गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय | Remedy to get cow buffalo on the heat”

Leave a comment