दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

Table of Contents

दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ? आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा ५५% इतका आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे उत्तम प्रक्रिया दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे. म्हणून म्हशींचे संगोपन चांगल्या रितीने करण्याची गरज आहे. दूध उत्पादनाशिवाय मांसोत्पादन व ओढकामासाठी सुद्धा म्हशींचा / रेड्यांचा वापर केला जातो.

दुधारू दुभत्या म्हशींच्या जाती

१) मुन्हा हरियाणा, पंजाब, दिल्ली उत्तर भारतात तसेच महाराष्ट्रातही जात आढळते. शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण १८०० ते २००० लिटर असते. त्यात गाईच्या दुधापेक्षा स्निग्धाचे प्रमाण जास्त असते. दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ? जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

२) मेहसाणा ही जात सुरती व मुऱ्हा जातीच्या संकरापासून निर्माण झाली असून, शरीर वैशिष्ट्ये मुन्हा जातीशी मिळती जुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी २००० लिटरपर्यंत दूध देतात.

दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

हेही वाचा: 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

हेही वाचा: Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

हेही वाचा: म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | मनो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

३) पंढरपुरी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव परिसरात या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोहचणारी लांब व पिवळटलेली तलवारीसारखी शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य. म्हशीचे वजन साधारण ४०० किलो व रेड्याचे वजन ५०० किलो असते. पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्यात गाभण राहतात आणि ३५ ते ४० महिन्यात पहिल्यांदा वितात. दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ? जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताचे वेळी कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातीत आढळत नाहीत. या म्हशी एका वेतात १५०० ते १८०० लिटर दूध देतात. पंढरपुरी म्हशीच्या पैदाशीसाठी गोठीत विर्याच्या मात्रा रु. १५/- प्रती मात्रा या दराने गो संशोधन व विकास प्रकल्प, म.कु.कृ.वि., राहुरी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ? जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

हेही वाचा: Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई

४) सुरती शरीर बांधा मध्यम, डोळे मोठे लांबट, रुंद असतात. भुवयाचे केस पांढरे वशिंडे मध्यम व विळ्यांच्या आकारांची असतात. शरीराचा रंग भुरा काळपट असतो. एका वेतातील दुधाचे उत्पादन १८०० लिटर असते.

सुरती म्हैस

दुधाळ जातींच्या म्हशींची पैदास

म्हशीचे प्रजोत्पादन करण्यासाठी शुद्ध जातीचा व उत्तम प्रतीचा रेडा निवडावा. लवकर गाभण राहणाऱ्या व जास्त दूध देणाऱ्या म्हशीपासून पैदा झालेला वळू निवडून त्याची चांगली जोपासना करावी. त्याचा उपयोग करून त्याच जातीची शुद्धता व वैशिष्ट्ये जतन करावीत. निवड पद्धतीनेच म्हशीमध्ये सुधारणा करणे शक्य आहे. त्यापासून मिळणाऱ्या पिढ्यांची वाढ करणे फायद्याचे ठरते. जनावर व्याल्यावर २ महिन्याने वळू दाखवावा व विण्यापूर्वी एक ते दीड महिना जनावर भाकड करावे. दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ? जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

म्हशींच्या माजाची लक्षणे

बहुतांशी म्हशी सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर माजावार येतात. म्हशींचा सोट घट्ट असतो. गाईप्रमाणे तो लोंबत नाही किंवा पुठ्ठ्याला चिकटलेला नसतो. म्हैस वारंवार लघवी करते. निरणाचे कातडीवर पांढरट क्षार दिसतात. माजावरील म्हशींचे निरण सुजल्यासारखे दिसते, निरणाचा रंग जास्त काळसर व तेलकट दिसतो. म्हैस पान्हा चोरते, कास व सड ताठरलेले दिसतात. माजावरील म्हशींच्या पाठीवर थाप मारल्यास ती आपली शेपटी उंचावते. दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ? जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

म्हशींची आहार व निगा

क्षमतेइतके दूध मिळण्यासाठी सर्वसाधारणतः ४०० किलो वजन असलेल्या म्हशीस दररोज २५ किलो हिरवा व ७ ते ८ किलो कोरडा चारा शरीर पोषणासाठी द्यावा. दूध निर्मितीसाठी, दररोजच्या एकूण दूध उत्पादनाच्या ५०% खुराक द्यावा, म्हणजे दूध उत्पादनाचे सातत्य टिकून राहील. प्रत्येक म्हशीला पिण्यासाठी ६० ते ७५ लि. पाणी रोज लागते. म्हशी डुंबण्यासाठी पाण्याची सोय असल्यास चांगले.

हेही वाचा: Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

हेही वाचा: लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

हेही वाचा: Animal Husbandry MAHABMS scheme 2023 | 10+1 शेळी वाटप योजना 75% अनुदान

दुधारू दुभत्या संकरित गाई पाळण्याचे फायदे

संकरित गाई पाळण्याचे फायदे या कालवडी लवकर वयात येतात. संकरित गाईंचे अन्नाचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता व प्रजननक्षमता स्थानिक गायीपेक्षा बऱ्याच प्रमाणात जास्त आहे. संकरित गायीमध्ये दूध उत्पादन अधिक असते आणि भाकड काळ कमी असतो. संकरित गाय स्थानिक गाईपेक्षा निश्चितच फायदेशीर आहे. दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ? जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

दुधारू दुभत्या संकरित गाई

दुधाळ गाईची निवड

दुधाळ गाईची निवड सर्वसाधारणपणे दुधाळ गाईचा मागील भाग मोठा व रुंद असतो. : चारही सड एकाच आकाराचे असून त्यांची लांबी सारखी असते. कासेच्या शिरा मोठ्या लांब व स्पष्ट असतात. जनावर तरतरीत असते. कातडी तजेलदार, पातळ व मऊ असते. एकंदर जनावर समोरुन निमुळते. मागे रुंद होत गेलेले दिसते. सर्वसाधारण बांधा भक्कम असतो व कोठा तुलनात्मकदृष्ट्या मोठा असतो. वरील सर्व गुणांबरोबर गाय निरोगी असावी. दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ? जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

हेही वाचा: AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

हेही वाचा: Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

हेही वाचा: Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

अधिक दूध देणाऱ्या गाईच्या जाती

अधिक दूध देणाऱ्या गाईच्या जाती परदेशात जर्सी, होल्स्टीन फ्रिजीयन, ब्राऊन स्विस, रेड डेन, आयर शायर या जाती तर महाराष्ट्रात गीर ही दुधाळ जात आढळते. दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ? जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

तिहेरी संकरित गायः फुले त्रिवेण सर्वसाधारण उपलब्ध संकरित गायीमधील वेगवेगळ्या गुणदोषांचा विचार करून त्यातील दोष कमी करून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल अशी ‘फुले त्रिवेणी गाय महात्मा फुले कृषि विद्यापीठातील गो संशोधन विकास प्रकल्पावर विकसित केलेली आहे. या संकरित गायीमध्ये हो. फ्रिजीयन (५०%), जर्सी (२५%) व गीर (२५%) या जातींच्या रक्ताचा समावेश आहे. त्यामुळे अधिक दूध उत्पादन, अधिक फॅट व उत्तम रोगप्रतिकारक क्षमता यांचा त्रिवेणी संगम या तिहेरी संकरित जातीत साधला आहे. या जातीचे वित्ताचे सरासरी दुग्धोत्पादन ३००० ते ३५०० लिटर असून, दुधातील फॅटचे प्रमाण ३.८ ते ४.२ आहे.

या गायींची रोग प्रतिकारकक्षमताही चांगली आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या पुढील पिढ्यांची दुग्धोत्पादन क्षमताही मूळ पिढ्या एवढीच जवळपास कायम राखली जाते असे संशोधनाअंती आढळून आले आहे. गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या शेतावर या गाईंनी सर्वसाधारणपणे चांगली गुणवत्ता सिद्ध केली आहे. फुले त्रिवेणीवळूचे गोठीत विर्य रु. ९ प्रती मात्रा या दराने गो संशोधन व विकास प्रकल्प, म.फु.कृ.वि., राहुरी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हेही वाचा: Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

हेही वाचा: Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

हेही वाचा: Remedy to get cow buffalo on the heat | गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

दुधाळ गाईंचे दूध काढताना घ्यावयाची काळजी

गाय दूध काढण्याअगोदर खरारा करून स्वच्छ करावी. गाईची कास, पाठीमागील भाग स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ फडक्याने कास कोरडी करावी. दूध काढणाऱ्या माणसाचे हात स्वच्छ असावेत, तसेच त्याची नखे काढलेली व स्वच्छ असावीत. कोरड्या हाताने दूध काढावे. दूध हलक्या हाताने पण वेगाने काढावे. दूध काढण्याच्या वेळात शक्यतो बदल करू नये आणि दूध काढण्याच्या कालखंडात देखील बदल करू नये. दूध काढण्यासाठी भांडी स्वच्छ व कोरडी असावीत. गायींच्या दुधाची दर आठवड्याला स्तनदाह परीक्षा करावी.

दुधाळ गाईंचे दूध काढताना घ्यावयाची काळजी

दुधाळ दुभत्या गाईंचे संगोपन

गाईला दुग्धोत्पादनाच्या प्रमाणात खाद्य द्यावे. गाईला सरासरी १५ ते २० किलो हिरवा, ५ ते ८ किलो कोरडा चारा रोज द्यावा. शरीर पोषणासाठी दीड ते दोन किलो खुराक द्यावा. तसेच दूध उत्पादनासाठी दुधाच्या ४० टक्के खुराक द्यावा. त्यांना दररोज धुतल्यास व २-३ तास मोकळे फिरण्याचा व्यायाम दिल्याने निश्चित फायदा होतो. जनावरांना दररोज समतोल खाद्य मिळेल याची काळजी घेणे महत्वाचे असते. दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ? जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

हेही वाचा: PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

हेही वाचा: Chia seeds farming in marathi | चिया सीड्स शेती | अमेरिकन पीक मिळवून देईल रु. 1000 प्रति किलो

हेही वाचा: रेशीम उद्योग । Reshim udyog in marathi । रेशीम शेती यशोगाथा | Success Story

तुम्ही चांगली दुधाळ गाई म्हैस कशी निवडाल?

तुम्ही चांगली दुधाळ गाई म्हैस कशी निवडाल?

दुधाळ गाईची निवड सर्वसाधारणपणे दुधाळ गाईचा मागील भाग मोठा व रुंद असतो. : चारही सड एकाच आकाराचे असून त्यांची लांबी सारखी असते. कासेच्या शिरा मो लांब व स्पष्ट असतात. जनावर तरतरीत असते. कातडी तजेलदार, पातळ व मऊ असते. एकंदर जनावर समोरुन निमुळते. मागे रुंद होत गेलेले दिसते. सर्वसाधारण बांधा भक्कम असतो व कोठा तुलनात्मकदृष्ट्या मोठा असतो. वरील सर्व गुणांबरोबर गाय निरोगी असावी.

दुधाची गाई म्हैस कशी निवडाल?

दुधाची गाई म्हैस कशी निवडाल?

दुधारू दुभत्या गाई आणि म्हशींची निवड कशी करायची? आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा ५५% इतका आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे उत्तम प्रक्रिया दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे. म्हणून म्हशींचे संगोपन चांगल्या रितीने करण्याची गरज आहे. दूध उत्पादनाशिवाय मांसोत्पादन व ओढकामासाठी सुद्धा म्हशींचा / रेड्यांचा वापर केला जातो.

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

13 thoughts on “दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?”

Leave a comment