नमो शेतकरी सन्मान निधी योजना नक्की हप्ता कधी मिळणार

Table of Contents

नमो शेतकरी सन्मान निधी योजना नक्की हप्ता कधी मिळणार | शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (PM- KISAN) योजना सुरु केली. शासन आदेशाप्रमाणे सदर योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.

मा. वित्त मंत्री महोदयांचे सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी सन्मान निधी” ही योजना राबविण्याबाबतची घोषणा केलेली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (PM- KISAN ) योजनेच्या धर्तीवर “नमो शेतकरी सन्मान निधी” ही योजना राज्यात राबविण्याबाबतचा प्रस्तावास दि. 30 मे 2023 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यास अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे. namo shetkari yojana 1st installment date

हेही वाचा: Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई

हेही वाचा: Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

शासन निर्णय:

नमो शेतकरी सन्मान निधी

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी सन्मान निधी” ही योजना सन 2023-24 पासुन खालीलप्रमाणे राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर योजनेकरीता लाभार्थी पात्रता व देय लाभासाठीचे निकष खालीलप्रमाणे राहतील:

  • सदर योजनेकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात याव्यात.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.
  • केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील. या बदलांकरीता महाराष्ट्र शासनाकडून वेगळा शासन निर्णय निर्गमित करण्याची आवश्यकता राहणार नाही.
  • पी. एम. किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.

हेही वाचा: Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

हेही वाचा: नोकरी करावी की शेती?

हेही वाचा: Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

योजनेची कार्यपद्धती:

पी.एम. किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभास पात्र ठरलेले लाभार्थी namo Shetkari Sanman Yojana योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. सदर लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पोर्टलवरुन / प्रणालीवरुन बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निधी जमा केला जाईल.

नमो शेतकरी सन्मान निधी योजना पोर्टल/प्रणाली:

नमो शेतकरी महासन्मान निधी

पी. एम. किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थीनाच नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत राज्याच्या निधीमधून लाभ देण्यात येणार असल्याने राज्यासाठी कृषि विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल/प्रणाली विकसित करण्याची कार्यवाही करावी.

केंद्र शासनाच्या संमतीने पी. एम. किसान सन्मान निधी योजना आणि amo Shetkari Sanman Yojana योजना या दोन्ही योजनांच्या पोर्टल/प्रणालीचे एकत्रिकरण (Integration) करण्यात यावे, जेणेकरून अनुदान मिळण्यास पात्र लाभार्थीच्या संख्येत होणारा बदल दोन्ही पोर्टलला एकाच वेळी प्रत्यक्षात येईल.

हेही वाचा: 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

हेही वाचा: Silage Bail या किमतीने सरकार करणार मुरघास खरेदी

नमो शेतकरी सन्मान निधी वितरणाची कार्यपध्दती:

“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या PM- KISAN योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषी) यांच्या मार्फत वितरीत करण्यात येईल.

नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान झाल्यास करावयाची वसुली:

सदर योजने अंतर्गत अपात्र लाभार्थ्यास लाभ प्रदान करण्यात आल्यास सदर लाभ धारकाकडून करावयाची वसुली महसूल यंत्रणेमार्फत करण्यात येवून आयुक्त (कृषि) यांच्या मार्फत शासनाकडे जमा करण्यात यावी.

योजना प्रकल्प संनियंत्रण कक्ष:

राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रकल्प संनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर प्रकल्प संनियंत्रण कक्षाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण करावे.

योजनेतील मनुष्यबळाचे संनियंत्रण व इतर आवश्यक कामकाज राज्याच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षामार्फत करण्यात यावे.

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | नमो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

हेही वाचा: भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रशासकीय खर्च

amo Shetkari Sanman Nidhi योजनेच्या प्रशासकीय खर्चासह वित्त विभागाने / शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयांनुसार बाह्यस्थ संस्थेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळासाठी आवश्यकतेनुसार वार्षिक तरतूदीच्या 1 टक्के पर्यंत रक्कम खर्च करण्यात यावी.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंमलबजावणी करण्यासाठी संनियंत्रण समित्या:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ग्रामस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या संनियंत्रण समित्यांमार्फत सदर योजनेचे संनियंत्रण करण्यात यावे.

योजना नोडल अधिकारी यांची नियुक्ती:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजने अंतर्गत ग्राम स्तर, तालुका स्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेले अधिकारी यांनी सदर योजनेसाठी नोडल अधिकारी म्हणून कामकाज पहावे.

सदर योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषी) यांची राहील. तसेच आयुक्त (कृषि) यांनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रत्येक 3 महिन्यास आढावा घेऊन त्याबाबचा प्रगती अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक राहील.

हेही वाचा: म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हेही वाचा: शबरी घरकुल योजना | Shabari Gharkul Yojana

राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचा आकडा 90 लाखाच्या वरती जाण्याची शकता आहे आणि या शेतकऱ्यांना हप्ता वितरित करण्यासाठी 5400 कोटी रुपये आवश्यक असतील त्यातील 4000 कोटी रुपयेची तरतूद राज्य सरकारने केली असून 1400 कोटी रुपये अधिकचे शासनाला उभारावे लागतील परंतु अंतरिक अडचणी पोर्टलच्या समोर आलेल्या आहेत त्या दूर केल्या नंतर आणि सर्व पोर्टल आवश्यक सर्व चाचण्या पूर्ण केल्या नंतरच Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment वितरित केला जाईल. यासाठी 15 ते 30 सप्टेंबर दरम्यानच्या तारखेची घोषणा केली जाऊ शकते.

अशा करतो तुम्हाला हि माहिती आवडली असेल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

5 thoughts on “नमो शेतकरी सन्मान निधी योजना नक्की हप्ता कधी मिळणार”

Leave a comment