म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

शेतकरी मित्रानो नमस्कार स्वागत आहे तुमचं www.shetakarimaja.com या आपल्या शेतकऱ्याच्या साठी कार्यरत असलेल्या वेबसाइट व YouTube चॅनेल मध्ये. आजच्या लेखामध्ये आपण म्हैशी हमखास माजावर येण्यासाठीचे खात्रीशीर उपाय पाहणार आहोत.

म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

शेतकरी मित्रानो आपण जाणता भरतील 70% लोकसंख्या हि शेतीवर आधारित असून शेतीपूरक व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा भारतात खासकरून महाराष्ट्रात मोट्या प्रमाणात केला जातो. करोनाच्या काळात तर तरुण पिढी मोट्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाकडे वाळलेली पाहायला मिळाली पण जेवढ्या झपाट्याने दुग्ध व्यवसाय चालू होत आहेत त्याच वेगाने दुग्ध व्यवसाय बंध हि होत आहेत आणि याच सर्वात मोठं कारण म्हणजे म्हैस वेळेवर माजावर न जाणे किंवा वारंवार रिपीट होणे हे आहे.

हा लेख आपण अखेर पर्यंत वाचलात तर आपल्याला Mhais Majavar Yenyasathi Upay नक्कीच कळतील व त्याचा तुम्ही आपल्या दुग्ध व्यवसायात वापरलं व आपला दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात म्हैस माजावर न येण्याची करणे व उपाय.

हेही वाचा: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नक्की हप्ता कधी मिळणार

हेही वाचा: Silage Bail या किमतीने सरकार करणार मुरघास खरेदी

Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

म्हैस माजावर न येणे व वारंवार उलटण्याची करणे

 1. गाई म्हैस माजावर न येण्याचं मुख्य कारण म्हणजे गाई म्हैस कुपोषित असणे
 2. गाई म्हैशी मध्ये खनिज द्रव्यांची कमतरता असणे
 3. गाई म्हैशीचे गर्भाशय साफ नसने
 4. गाई म्हैशीच्या गर्भाशयाला विकार असणे
 5. बीज-अंडकोश किंवा प्रज्वलन नलिकेचे आजार उध्दभवणे
 6. जनावरांचा आहार असंतुलित किंवा निकृष्ट दर्जाचा असणे
 7. वातावरणातील बदल व अधिक तापमान
 8. गाई म्हैशीची राग प्रतिकार शक्ती कमी असणे
 9. गाई म्हैशी जंत किंवा कृमी तसेच अंगावर गोचड्यांचा प्रधुरभाव असणे
 10. शेतकऱ्यांचे गाई म्हैशीच्या माजाविषयीचे अज्ञान
 11. कृत्रिम रेतनात वापरलेले वीर्य चालल्या दर्जाचे नसणे
म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

म्हैस वेळेवर माजावर न आल्याचे दूध व्यवसायावरील परिणाम

म्हैस माजावर न येण्यासाठी वरीलपैकी एक किंवा अनेक करणे असू शकतात. म्हैस माजावर न येण्यासाठी कारण जरी कोणतेही असले तरी त्याचा परिणाम डायरेक्ट आपल्या दुग्ध व्यवसायावर होतो. म्हैशींचा भाकड काळ वाढतो. दुग्ध व्यवसायाचे आर्थिक नियोजन बिघडत व पर्यायी बहितांशी दुग्ध व्यवसाय बंध पडतात. हि वेळ आपल्या दुग्ध व्यवसायावर येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. म्हैस माजावर येण्यासाठी खालील उपाय करून पहा.

म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

म्हैस वेळेवर माजावर येणे हा दुग्ध व्यवसायातील कणा असून घरगुती नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाय करून हि समश्या आपण सोडवू शकता. म्हैस वेळेवर माजावर येण्यासाठी घरगुती नैसर्गिक व आयुर्वेदिक उपचार आपण आज इथे सांगणार आहोत.

म्हैस माजावर येण्यासाठी उपाय करत असताना सुरवातीचे 1 ते 5 दिवस एक मुळा आणि 20 ग्राम जिरे म्हैशीला रोज द्यावयाचे आहे. यामुळे गर्भाशयात असणारी कृमी, घाण निचरा होण्यास मदत होते. संसर्ग कमी करण्यास मदत होते.

म्हैस माजावर येण्यासाठी उपाय पुढील चार दिवस म्हणजेच 6, 7, 8 आणि 9व्या दिवशी कोरफडीचे एक पान प्रत्येक दिवशी म्हैशीला खायला द्यावयाचे आहे. कोरफड जिवाणू, विषाणू व बुरशीनाशक म्हणून काम करते.

म्हैस माजावर येण्यासाठी उपाय करत असताना पुढील चार दिवस म्हणजेच दिवस 10वा, 11वा, 12वा आणि 13वा चार मुठी शेवग्याची पाने प्रत्येक दिवशी म्हैशीला खायला द्यावयाचे आहे. शेवग्याच्या पानाच्या वापरामुळे म्हशीं माजावर येण्यासाठी आवश्यक खनिजद्रव्य व जीवनसत्त्वांची पूर्तता होते.

म्हैस माजावर येण्यासाठी उपाय दिवस 14वा, 15वा, 16वा आणि 17वा या प्रत्येक दिवशी हाडजोडच्या 2 ते 3 कांड्या प्रत्येक दिवशी गाई व म्हैशीला खायला द्यावयाचे आहे. हाडजोड वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने त्याचा फायदा म्हैशींना माजावर येण्यासाठी व गर्भ धारणेसाठी होतो.

हेही वाचा: नोकरी करावी की शेती?

हेही वाचा: Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

हेही वाचा: 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

म्हैस माजावर येण्यासाठी उपाय शेवटचे चार दिवस म्हणजेच 18, 19, 20 आणि 21 व्या दिवशी चार मुठी कडीपत्त्याची पाने, एक चमचा हळद, चवीसाठी मीठ व गूळ प्रत्येक दिवशी म्हैशीला खायला द्यावयाचे आहे. काडिपत्त्यामध्ये मोट्या प्रमाणात आढळणारी फॉसफरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम खनिजद्रव्य गर्भधारणा स्थिर ठेवण्यास मदत करते.

म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हा उपचार करत असताना 50% शेतकऱ्याचा अनुभव आहे कि 12 व्या दिवशी गाई म्हैस माजावर येते व गाभण राहण्यास हि मदत होते. 30 ते 35% टक्के जनावरे 19 व्या दिवशी माजावर येत व गाभण हि राहते. उर्वरित 15 ते 20% जनावरांना माजावर येण्यासाठी 21 दिवस लागतात.

उपचारादरम्यान म्हैस कोणत्याही दिवशी मजला आली तरी 21 दिवस हा उपचार सुरु ठेवण्यास काही हरकत नाही याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | मनो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

हेही वाचा: भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India

वरील उपचाराने एक शेतकऱ्याला जरी आम्ही मदत करू शकलो तरी आम्ही स्वतःला धान्य मानतो. आपण हा उपचार नक्की करून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा त्याने इतर शेतकऱ्यांना फायदा होईल. एकमेका करू साहाय्य अवघे करू शेतकरी समृद्ध!

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.