लम्पी पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

लम्पी पशुधनास नुकसान भरपाई

लम्पी पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज
शेतकरी मित्रानो जस कि तुम्हाला माहीतच आहे करोना नंतर गाई मध्ये पसरलेला Lumpy हा आजार देशासमोर एक मोठं संकट आहे. करोना मध्ये सरसकट सर्वांचेच नुकसान झाले पण Lumpy मध्ये मात्र माझ्या एकट्या शेतकऱ्यालाच याचा फटका बसला आहे. शेतकरी ज्या गाईला आई मानतो तीच गाई आज संकटात असताना दिसते आहे.

मुलाबाळाप्रमाणे सांभाळल्या गाई, बैल त्यांची वासरं शेतकऱ्याच्या डोळ्या समोरच हतबल होऊन आपले प्राण सोडत आहेत. शेतकरी हतबल आहे पण सरकार शेतकऱ्याला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे. Lumpy मध्ये शेतकऱ्याने गमावलेल्या गाई, बैल व वासराला नुकसान भरपाई म्हणून सरकार अनुक्रमे ३००००, २५००० व १६००० रुपये देत आहे. हि नुकसान भरपाई मिळवण्यासरही https://www.mhpashuaarogya.com/ या संकेतस्थाळावर अर्ज करायचा आहे.

Table of Contents

लम्पी पशुधनास नुकसान भरपाई खालील प्रमाणे

अ.क्र.मृत पशुधनाचा प्रकारनुकसान भरपाई मर्यादा रक्कम / प्रति जनावर
1.दुधाळ गायरु. 30,000/-
2.शेतीकाम करणारा बैलरु. 25,000/-
3.वासरूरु. 16,000/-

Animal Husbandry MAHABMS scheme 2023 | 10+1 शेळी वाटप योजना 75% अनुदान

AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India

लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई अर्ज केल्या पासून मंजुरी पर्यंतचा कामकाज प्रवास

lumpy application work flow

Lumpy आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई नोंदणी कशी करायची?

 1. www.mhpashuaarogya.org हा पोर्टल ओपन करा
 2. टॉप बार मध्ये अर्जदार नोंदणी या मेनू वर क्लिक करा
 3. नंतर अर्जदार आवश्यक माहती भरून नोंदणी करू शकतो
lumpy application

लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई अर्ज कसा करावा?

 1. www.mhpashuaarogya.org हा पोर्टल ओपन करा
 2. टॉप बार मध्ये भरपाईसाठी अर्ज करा या मेनू वर क्लिक करा
 3. नंतर अर्जदार आवश्यक माहती भरून अर्ज सादर करू शकतो
 4. अधिक माहिती साठी खाली दिलेला विडिओ पाहू शकतो

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

Lumpy आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई अर्जदार नोंदणी करण्यापुर्वी घ्यावयाची काळजी

 1. * असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे
 2. एक आधारकार्ड वापरून एकदाच अर्जदार नोंदणी करता येईल याची नोंद घ्यावी
 3. एक मोबाईल नंबर वापरून एकदाच अर्जदार नोंदणी करता येईल याची नोंद घ्यावी
 4. अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वत:चा / वापरात असणारा मोबाइल नंबर भरणे आवश्यक आहे
 5. मोबाइल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी
 6. माहिती पूर्णतः खरी असावी. माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास अर्थसहाय्य मिळणार नाही

लम्पी पशुधनास नुकसान भरपाई अर्ज कोण करू शकतो /लाभ कोण घेऊ शकतो?

महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना आणि ग्रामीण भागातील रहिवाश्यांना त्यांच्या जनावरांचा लम्पी मुळे मृत्यू झाला तर नुकसान भरपाई चा लाभ घेता येईल.

जनावराचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाल्यानंतर नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखान्यातून पंचनामा करून घेणे बंधनकारक आहे.

जनावराचा लम्पी आजारामुळे मुळे मृत्यू झाल्यानंतर लाभार्थीने तात्काळ नजीकच्या दवाखान्यात माहिती द्यावी अथवा ऑनलाईन भरपाई अर्ज सबमिट करणे बंधनकारक राहील.

ज्या व्यक्तीच्या नावे नुकसान भरपाई अर्ज कराल त्याच व्यक्तीचे बँक खात्याचे तपशील द्यावे अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही

सदर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कळवा. 

Remedy to get cow buffalo on the heat | गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

Chia seeds farming in marathi | चिया सीड्स शेती | अमेरिकन पीक मिळवून देईल रु. 1000 प्रति किलो

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

13 thoughts on “लम्पी पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज”

Leave a comment