Silage Bail या किमतीने सरकार करणार मुरघास खरेदी

Silage Bail या किमतीने सरकार करणार मुरघास खरेदी या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने देशातील पीक पेरणी वर याचा परिणाम दिसत असून यामुळे देशात चारा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या काळात जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून सरकारने सध्या उपलब्ध चारा साठवून ठेऊन चारा टंचाईच्या काळात वापरता यावा म्हणून शेतकऱ्याकडून मुरघास खरेदीचे आदेश दिले आहेत.

या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने देशातील पीक पेरणी वर याचा परिणाम दिसत असून यामुळे देशात चारा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या काळात जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून सरकारने सध्या उपलब्ध चारा साठवून ठेऊन चारा टंचाईच्या काळात वापरता यावा म्हणून शेतकऱ्याकडून मुरघास खरेदीचे आदेश दिले आहेत.

सरकार करणार मुरघास खरेदी

राज्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पशुपालन व दुग्धव्यवसाय हा महत्वाचा व्यवसाय असून, वर्षभर रोजगार आणि ग्रामीण भागात नियमित आर्थिक उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. चारा टंचाईसदृश्य काळात चारा उत्पन्न कमी झाल्याने पशुधनास पौष्टिक चारा उपलब्ध करुन देण्यात पशुपालकांना शेतकऱ्यांना मर्यादा पडते. त्यामुळे पशुधनास पशुपालकांकडे उपलब्ध असलेला कमी प्रतीचा चारा दिला गेल्यामुळे पशुंच्या आरोग्यावर तसेच दुग्ध उत्पादनावरही दुरगामी विपरित परिणाम होतो.

हेही वाचा: Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

मका या चारा पिकापासून बनविलेला मुरघास हा पौष्टिक असल्यामुळे तो आरोग्यदायी ठरतो. तसेच त्यामुळे पुशधनाच्या दुग्ध उत्पादन क्षमतेत वाढ होते. याशिवाय तो पोषणमुल्यासह दिर्घकाळ टिकविता येत असल्यामुळे मुरघास हा चाऱ्यासाठी उत्तम पर्याय आहे. पशुधनास मुरघास खावू घातल्यामुळे खालील प्रमाणे फायदे होतात.

  • दुध उत्पादनात सातत्य व नियमितता राहते.
  • पशुधनाची रोगप्रतिकारशक्ती वाढते व अबाधीत राहते.
  • तसेच गाई- म्हशींची माजावर येण्याची व गाभण राहण्याची क्षमता कायम राहते.
  • पशुपालनातील मजुरीवरील खर्चामध्ये बचत होते.

उपरोक्त पार्श्वभुमीवर टंचाईसदृश्यय काळात मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांदरम्यान पशुधनास इतर चाऱ्याऐवजी मुरघास उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. सदर मुरघास खरेदी किंमतीत एकवाक्यता रहावी यासाठी मका चाऱ्याचा मुरघास खरेदीसाठी आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी शासनाने आदेश दिले आहेत.

Silage Bail

मुरघास खरेदी शासन निर्णय काय आहे?

राज्यातील संभाव्य चारा टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना दरम्यान टंचाईग्रस्त / टंचाईसदृश्य भागातील जनावरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तसेच उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सदर जनावरांस मका चाऱ्यापासून तयार केलेला मुरघास देणे आवश्यक आहे.

त्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या Silage Bail मधील मका चाऱ्यापासून तयार केलेल्या मुरघासाची किंमत रु.६.५० प्रति किलो अशी निश्चित करण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

हेही वाचा: नोकरी करावी की शेती?

हेही वाचा: Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

हेही वाचा: 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

मुरघास खरेदीसाठी शासनाच्या अटी काय आहेत?

१. खरेदी करण्यात येणारा मुरघास हा Silage Bail स्वरुपात हवाबंद अवस्थेत असावा.
२. खरेदी करण्यात येणाऱ्या Silage Bail मधील मुरघासची आम्लता (पीएच) ४.० ते ४.२ असावी आणि त्यात कोणत्याही बुरशीचा प्रादुर्भाव झालेला नसावा.
३. Silage Bail मधील ब्युटेरिक ऍसिडची मात्रा ०.२ टक्क्यापेक्षा कमी व लॅक्टिक ऍसिडची मात्रा ३ टक्क्यापेक्षा जास्त असावी.
४. मका चाऱ्यापासून तयार केलेल्या Silage Bail मधील मुरघासामध्ये ६५ ते ७० टक्के आर्द्रता (Moisture) व ३० ते ३५ टक्के शुष्क पदार्थ असावे.
५. Silage Bail मधील मक्याच्या मुरघासमध्ये खालील प्रमाणे शुष्क घटकांचे (ड्राय मॅटर) प्रमाण असावे.

सरकार करणार मुरघास खरेदी

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | नमो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

हेही वाचा: भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India

पशुधनास पुरविण्यात येणारा मुरघास हा गुणवत्तापुर्ण असणे आवश्यक असल्याने उपरोक्त २ ते ५ मध्ये नमूद केलेल्या परिमाणांची (Standard) पूर्तता होणे आवश्यक आहे, याबाबतची खातरजमा करण्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या मुरघासाची नमूना तपासणी (Sample testing) करण्यात यावी.

Silage Bail मधील मुरघासातील विविध घटकांची तपासणी करण्यासाठी खालील प्रयोगशाळांमध्ये तपासणी सुविधा उपलब्ध आहे.
१. पशुसंवर्धन विभागाची पशुखाद्य विश्लेषण प्रयोगशाळा, गोखलेनगर, पुणे.
२. बुरशी प्रादुर्भावाच्या तपासणीसाठी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राज्यस्तरीय रोग अन्वेषण संस्था, औध, पुणे
३. सेंटर फॉर अॅनालिसिस अॅण्ड लर्निंग इन लाईव्हस्टॉक अॅण्ड फुड (काफ), एनडीडीबी, आनंद, गुजरात
४. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अॅनिमल न्युट्रीशन अॅण्ड फिजीऑलॉजी, बेंगलोर
५. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा

हेही वाचा: म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हेही वाचा: शबरी घरकुल योजना | Shabari Gharkul Yojana

हेही वाचा: नमो शेतकरी सन्मान निधी योजना नक्की हप्ता कधी मिळणार

हा शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५४३/२०२३/ व्यय-२, दि.११.०९.२०२३ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२३०९१४१७०८१७९२०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कळवा. 

5 thoughts on “Silage Bail या किमतीने सरकार करणार मुरघास खरेदी”

Leave a comment