Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management

Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन वर बोलायचं झालं तर महाराष्ट्र गाई म्हैशीच्या दूध उत्पादनात अग्रेसर आहे. याला अनेक कारणे आहेत. यामध्ये विक्री व्यवस्था हा महत्वाचा भाग असून शाश्वत उत्पादन असलेने लोक दुग्धव्यवसायाकडे वळत आहेत.

या व्यवसायात अल्पभूधारक शेतकरी मोठया प्रमाणात आहेत. सुशिक्षित बेरोजगार युवक मोठयाप्रमाणात दुग्धव्यवसाय करू लागले आहेत. असे असले तरी वास्तविक चित्र वेगळे आहे. जनावरांची संख्या खूप असल्यामुळे दूध उत्पादन भरपूर दिसते. मात्र त्यांची उत्पादकता ही परदेशी जनावरांपेक्षा नगण्य आहे. ही तफावत येण्यामागे पुढील कारणे दिसून येतात.

हेही वाचा: शबरी घरकुल योजना | Shabari Gharkul Yojana

Table of Contents

भारतातील व परदेशातील गाई -म्हैशीच्या दूध उत्पादनात फरक असण्याची प्रमुख करणे

१. गाई म्हैशीच्या निकृष्ट अनुवंशिकता
२. दुग्धव्यवसायात शास्त्रीय पध्दतींचा अभाव
३. गाई म्हैशीच्या खाद्य व चारा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणे
४. गाई म्हैशीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे
५. दुग्धव्यवसायाकडे व्यसायीक दृष्टीकोनातून न पाहणे

योग्य व्यवस्थापन करून वरील कारणांवर मात करणे हेच आपल्या व्यवसायाचे यश असेल. त्यासाठी आपल्याला कार्यक्षम व्यवस्थापकाचे काम पार पाडावे लागेल. व्यवस्थापकाला पाच प्रमुख कर्तव्ये पार पाडावी लागतात. योजना आखणे, संघटन करणे, समन्वय साधणे, संचलन करणे व नियंत्रण करणे.

ही व्यवस्थापकिय कर्तव्ये पार पाडण्यासाठी व्यवस्थापकाने निर्णय कर्त्याची भूमिका पार पाडावी लागते. यासाठी फार्म रेकॉर्ड असणे गरजेचे आहे.

Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

हेही वाचा: PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

हेही वाचा: चिया सीड्स शेती | अमेरिकन पीक मिळवून देईल रु. १००० प्रति किलो | chia seeds farming in marathi

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

दुग्धव्यवसायत फार्म रेकॉर्ड असणे गरजेचे

  • जमा खर्च व निव्वळ नफा, प्रत्येक वर्षीचा आरंभीचा व अखेरचा पूर्ण तपशील
  • उत्पादन नोंदी
  • चालू खर्च व जमा
  • वार्षिक उत्पन्न व आर्थिक गोषवारा
  • वार्षिक नोंदीचे पृथ:करण, ज्यावरून व्यवसायातील प्रबल व दुर्बल बाबी जाणून घेतल्या जातील
  • तुलनात्मक अंदाजपत्रक
  • वार्षिक अंदाजपत्रक

दुग्धव्यवसाय निवडताना महत्वाच्या गोष्टी

कोणताही व्यवसाय निवडताना काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करणे हिताचे असते. Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

१. स्वत:ची आवड निवड
२. स्वत:च्या कलात्मक गुणाला वाव
३. व्यवसायाशी समरस होण्याची पात्रता
४. तांत्रिक ज्ञान
५. व्यावहारिक दृष्टीकोन
६. व्यसायाचा तुलनात्मक अभ्यास आणि अनुभव
७. व्यवसायाचे सामाजिक स्थान व प्रतिष्ठा
८. भांडवलाची सोय
९. व्यवसायास लागणा-या वस्तू
१०. उत्पादन मालाला बाजारपेठ
११. व्यवसायावरील श्रध्दा
१२. व्यवसायाबद्दल आत्मविश्वास आणि यश

व्यवसाय कोणताही असो प्रत्येक व्यावसायीकाने आपला धंदा चांगला आहे असे समजून केला तर तो नक्कीच यशस्वी होईल. Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

रेशीम उद्योग । Reshim udyog in marathi । रेशीम शेती यशोगाथा | Success Story

Side effects of Pesticides and Herbicides | शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ? कीटकनाशक व तणनाशक बॉटल वरील या चिन्हांचा अर्थ काय होतो?

गाई म्हशीच्या जातीची निवड म्हत्वाची:

दुग्ध व्यवसातय तुमच्या भौगोलिक रचणेनुसार व वातावणानुसार गाई म्हशीच्या जातीची निवड करणे खूप महत्वाचे आहे

गाई:
१. खिलार २. सिंधी ३. गीर ४. हरियाना ५. सहिवाल ६. देवनी ७. गवळाऊ ९. डांगी १०. थारपारकर ११. काँक्रेज १२. आँगोला १३. राठी १४. जर्सी १५. होल्स्टियन फ्रिजन १६. ब्राऊन स्विस् १७. रेड डॅनिश १८. आयरशायर ८. निमाडी

म्हैस:
१. पंढरपूरी २. नागपूरी ३. मु-हा ४. जाफराबादी ५. सुरती ६. मेहसाना ७. निलीरावी. देशी गाईमध्ये सिंधी, गीर व सहिवाल जाती दुग्धोत्पादनासाठी इतर देशी गाईपेक्षा चांगल्या आहेत.

शास्वत उत्पन्न मिळवून देणार रेशीम शेती व्यवसाय | Reshim Sheti Vyavsay Yojana Mahiti aani Anudan

PMFME Scheme Apply Online Now | व्यवसायला सरकार देताय १० लाख अनुदान

आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

गाई-म्हैसींचे संगोपन हा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरण्यासाठी संतुलीत आहार, जनावरांची निगा, देखभाल, नियमीत प्रजनन या बरोबरच भरपूर दुध उप्तादन घ्यावयाचे असल्यास गोठा, गाय व म्हैस ईत्यादींचे व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे आहे.

शेतीला जोड असलेल्या किंवा पुरक असलेल्या अनेक उद्योगांपैकी दुग्धव्यवसाय व पशुपालन भरपूर फायदेशीर आहे. खेडोपाड्यातुन शेतीपूरक व्यवसाय म्हणुन दुग्धव्यवसाय व पशुपालनाला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. आर्थिकदृष्या मदत होण्यासाठी तसेच पशुंचे म्हणजेच गाय, म्हैस इत्यादीचे शेण, मलमुत्र शेतात खत वापरून शेतीची प्रत सुधारण्यासाठी तसेच शेतीतील उत्पादन वाढविण्याकरीता अत्यंत फायदेशीर ठरते.

दुग्ध व्यवसाय करण्याच्या दृष्टीकोनातून भरपूर दुध उत्पादन घ्यावयाचे असल्यास गोठ्याचे, गाय व म्हैस इत्यादींचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पशुउत्पादनाचा धंदा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरविण्यासाठी संतुलीत आहार, जनावरांची निगा, देखभाल, नियमीत प्रजनन याबाबी महत्त्वाच्या आहेत.

प्रजोत्पादनाची क्रिया जनावरांत माज दाखविण्यापासुन सुरू होते. नियीमत माज दाखविण्याशिवाय आहाराचा आणि शरीरक्रियांचा जवळचा संबंध आहे. गायी, म्हशीतील माजाचा काळ सरासरी १२ ते २४ तास असतो. जनावरे भरविण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी माजावर आलेली जनावरे सायंकाळी आणि सायंकाळी माजावर आलेली जनावरे दुसऱ्या दिवशी सकाळी भरविणे जास्त उपयुक्त ठरते.

आपल्या गाई व म्हशीपासुन जास्त दुध देणाऱ्या कालवडी किंवा वगारी मिळविण्यासाठी कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब करावा. जनावरे भरल्यानंतर दोन महिन्यानंतर गाभन आहेत किंवा नाहीत याची खात्री करावी. नवजात वासरांची भविष्यातील प्रजनन क्षमता त्यांच्या गर्भावस्थेत झालेल्या पोषणाशी संबंधीत असते.

त्यासाठी गाभन जनावरांच्या आहाराची काळजी घेणे आवश्यक असते. व्याल्यावर ताबडतोब वासरू उचलुन घेतल्यास वासराशी पान्हा सोडण्याची गाई किंवा म्हशींना सवय लावता येते. Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

Soil Testing माती परीक्षण कशासाठी?

Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय

आधुनिक दुग्धव्यवसाय गोठा व्यवस्थापन:

जनावरांच्या निरोगीपणासाठी स्वच्छता खुप महत्वाची असते. गोठ्यातील व आजुबाजूच्या अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगांचा प्रसार होत असतो. त्यामुळे दुध उत्पादन कमी येते. त्यासाठी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. गोठा दक्षिण-उत्तर दिशेत असावा. गोठा हा उचवट्यावर असावा. गोठ्यात पाण्याचा मुबलक साठा असावा.

गोठ्यातील नविन जनावरे ही त्यांच्या बरोबर रोगजंतू आणतात. परंतु अशी जनावरे रोगाची लक्षणे दाखवीत नाहीत. त्यामुळे अशी जनावरे १५ दिवस स्वतंत्र अशा जागेत बांधावे. जनावरांच्या अंगावर असणाऱ्या गोमाशा, गोचीड, पिसवे हे परोपजीवी किटक निरोगी जनावरात रोग फैलविण्याचे काम करतात. यासाठी गोठ्याचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे महत्वाचे असते.

स्वच्छ दूध निर्मितीसाठी जनावर स्वच्छ असणे खुप महत्वाचे असते कारण जनावरांच्या शरीरावरील घान दुधात येण्याची शक्यता असते. त्यामुळे भांडी स्वच्छ असणे सुद्धा महत्त्वाची बाब आहे. जनावरांना दररोज आंघोळ घालावी.

तसेच त्यांची खुरे नीट तपासून पहावीत. गोठ्याचे वारंवार निर्जतुकीकरण करणे महत्वाचे असते. निर्जतुकीकरण हा आजारी जनावरांचा औषधोपचार घेवू शकत नाही. परंतु हा उत्कृष्ट प्रतिबंधक उपाय आहे.

शेतकऱ्याची आकाशाला गवसणी ७ कोटींचे हेलिकॉप्टर केलं खरेदी | डॉ. राजाराम त्रिपाठी

पनवेलचा पोलीस दूधवाला | २० जनावरे १२५ लिटर दूध दर८० रु प्रति लिटर

आधुनिक दुग्धव्यवसाय वासरांचे संगोपन व व्यवस्थापन:

वासरांच्या संगोपनासाठी दोन पद्धती आहेत. वासरू गाईस पाजणे, वासरास वेगळ्या भांड्यात दुध पाजणे यापैकी दुसऱ्या पद्धतीत अनेक फायदे आढळुन आले जरी वासरू मेले तरी गाय दुध देत राहते. वासरास त्यांच्या वजनानुसार योग्य दुध देता येते. गाईच्या स्तनांना वासराच्या दातापासुन होणारी इजा टाळता येते.

गाईचे दुध उत्पादन मोजता येते. वासरांची निगा व व्यवस्थापनासाठी जन्माच्या अगोदर वासरू गाईच्या पोटात असतांना शेवटच्या दोन महिन्यात गाईला एक ते दोन किलो पशुखाद्य किंवा पेंड देण्यास सुरूवात करावी. जन्म झाल्याबरोबर लगेच वासराच्या नाकातील, तोंडातील तसेच डोळ्यावरील चिकट द्रव पदार्थ काढुन टाकावा. त्यामुळे त्याचे श्वसन सुरू होण्यास मदत होते. गाईला वासरास चाटु द्यावे किंवा स्वच्छ टॉवेलने त्याचे अंग पुसून काढावे.

वाराची नाळ कापतांना पाच ते सहा से.मी. लांबी देऊन निर्जतुंक केलेल्या कात्रीने किंवा ब्लेडने कापावी व कापलेले तोंड दोऱ्याच्या सहाय्याने बांधुन टाकावे. Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

काही कारणांनी वासरू निस्तेज किंवा श्वसनास त्रास होत असल्यास अशावेळी वासरास कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागतो किंवा त्याच्या छातीवर अगदी हलकेच दाब द्यायला सुरूवात करावी व नंतर हात काढुन घ्यावा. जेणे करून छातीत हवा भरली जाईल. व श्वसन सुरळीत सुरू होईल.

वासरू जन्मल्यानंतर एका तासाच्या आत त्यास गाईचा चिक पाजावा कारण या चिकात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणारे घटक असतात. ते वासरास भविष्यात अनेक रोगापासुन त्यांचे रक्षण करतात.

वासराला दूध प्याला शिकवण्यासाठी एका स्वच्छ खोलगट भांड्यात दुध घ्यावे. प्रथम आपली दोन बोटे वासराच्या तोंडात द्यावी. ती बोटे तो ओढु लागेल मग हळुहळु बोटे व वासराचे तोंड दुधात बुडवावे बोटे त्याच्या तोंडातुन काढावीत.

कुक्कुट पालन व्यवसाय संपूर्ण माहिती | जो करेल कुक्कूटपालन, त्याचे घरी खेळेल चलन!!

Sharad Pawar Gram Samridhi Yojana | सरकार देताय १००% अनुदान | गाय व म्हैशी, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड बांधा पक्के

गाभन गाई – म्हैशीची निगा व व्यवस्थापन:

Remedy to get cow buffalo on the heat
https://www.shetakarimaja.com/remedy-to-get-cow-buffalo-on-the-heat/

गाभन गाई – म्हैशीची विशेष काळजी घ्यावी लागते गाभन गाई – म्हैशींना भरपूर चारा दिला पाहिजे. वयात येण्यापूर्वीची शारीरीक वाढ मुख्यत्वेकरून गर्भातील वाढीवर अवलंबुन असते. चांगल्या गाई म्हैशींचा कळप तयार होण्यासाठी गाभन गाई – म्हैशीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे व तिची काळजी घेतल्यास पुढिल अडचणींवर मात करता येते.

गाई म्हैशी आठवणे:

गाई म्हैस पुर्णपणे आटविण्यापुर्वी तिचे नियमित प्रमाणे दोन वेळेस दुध काढले जात असल्यास दुध काढण्याच्या वेळेतील अंतर वाढवावे. म्हणजे १२ तास असल्यास २४ तास ३६ तास ४८ तास असे वाढवावे. दिवसातून तीने वेळे ऐवजी एक वेळा पाणी द्यावे.

दोन किंवा तीन वेळा खुराक देणे एकदम बंद करावे. आटविण्याच्या शेवटच्या दिवशी गाईच्या स्तनाला दाट होऊ नये म्हणुन सडाची छिद्रे बंद करावी. यासाठी प्रथम स्पिरीटने साफ करून छिद्रावर कोलोडीऑन द्रावण लावावे.

शेती विषयक शासकीय माहितीसाठी येथे भेट द्या…

सदर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कालवा. येथे क्लिक करून आले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.