AH MAHABMS Scheme 2023 | 10+1 शेळी वाटप योजना 75% अनुदान

AH MAHABMS scheme

Table of Contents

AH MAHABMS Scheme 2023 | 10+1 शेळी वाटप योजना राज्यात ठाणबंद पध्दतीने शेळीपालन अंतर्गत 10 शेळया + 1 बोकड असा शेळी गट पुरवठा या विशेष योजनेस राज्यस्तरीय योजनांतर्गत योजना मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली असून सदर योजनेअंतर्गत उस्मानाबादी / संगमनेरी जातीच्या शेळीची आधारभूत किंमत प्रति शेळी रू.8,000/- तर बोकडाची आधारभूत किंमत प्रति बोकड रु. 10,000/- आणि स्थानिक जातीच्या शेळीची आधारभूत किंमत प्रति शेळी रु.6,000/- व बोकडाची आधारभूत किंमत प्रति बोकड रु.8,000/- करण्यास त्याचप्रमाणे अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांना 10 शेळया + 1 बोकड या गटाचा पुरवठा 75 टक्के अनुदानावर करण्यासही मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.

हेही वाचा: AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

हेही वाचा: Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

हेही वाचा: Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | मनो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

शासन निर्णय – AH MAHABMS Scheme 2023

AH MAHABMS Scheme जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना / आदिवासी उपयोजना / आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजने अंतर्गत 10 शेळ्या + 1 बोकड असा शेळी गट पुरवठा करणे या योजनेस याद्वारे शासनाची प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात येत आहे. सदरची योजना सुधारित आर्थिक निकषानुसार राबविण्यात मान्यता दिली आहे.

AH MAHABMS scheme 2023 | 10+1 शेळी वाटप योजना राज्यात ठाणबंद पध्दतीने शेळीपालन अंतर्गत 10 शेळया + 1 बोकड असा शेळी गट पुरवठा या विशेष योजनेस राज्यस्तरीय योजनांतर्गत योजना मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली असून सदर योजनेअंतर्गत उस्मानाबादी / संगमनेरी जातीच्या शेळीची आधारभूत किंमत प्रति शेळी रू 8,000/- तर बोकडाची आधारभूत किंमत प्रति बोकड रु. 10,000/- आणि स्थानिक जातीच्या शेळीची आधारभूत किंमत प्रति शेळी रु.6,000/- व बोकडाची आधारभूत किंमत प्रति बोकड रु. 8,000/- करण्यास त्याचप्रमाणे अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांना 10 शेळया + 1 बोकड या गटाचा पुरवठा 75 टक्के अनुदानावर करण्यासही मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.

AH MAHABMS scheme 2023 योजनेचे स्वरुप आणि आर्थिक निकष

AH MAHABMS scheme 2023 योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी / संगमनेरी जातींच्या अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा स्थनिक प्रजातींच्या 10 शेळ्या + 1 बोकड पुरवठा करण्यासाठी शेळी गटाचा एकूण बाबनिहा खर्चाचा तपशील खालील प्रमाणे आहे.

10 + 1 एका गटाची किंमत

10 शेळ्या व 1 बोकड1,03,545/-
(उस्मानाबादी / संगमनेरी जातीसाठी)
78,231/-
(अन्य स्थानिक जातीसाठी)
शेळ्यांचे व्यवस्थापन, खाद्य व चर्येवरील खर्च लाभार्थ्याने स्वतः करायचा आहे

हेही वाचा: Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

हेही वाचा: Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

हेही वाचा: Remedy to get cow buffalo on the heat | गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

AH MAHABMS scheme 2023 योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये उस्मानाबादी आणि संगमनेरी या जातींच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील. तर कोकण आणि विदर्भ विभागातील जिल्ह्यांमध्ये स्थानिक हवामानामध्ये तग धरणाऱ्या तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ्य असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात यावे.

AH MAHABMS scheme 2023 योजने अंतर्गत 10+1 शेळयांच्या एका गटासाठी अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील लाभार्थीना 75टक्के अनुदान म्हणजेच उस्मानाबादी / संगमनेरी जातीच्या गटासाठी रू. 77658/- तर अन्य स्थानिक जातीच्या गटासाठी रू. 58673/- शासकीय अनुदान मिळेल.

शासकीय अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित 25 टक्के हिश्याची रक्कम लाभार्थ्यानी स्वतः / बँकेकडून कर्ज घेवून (किमान 5 टक्के लाभार्थी हिस्सा व उर्वरित 20 टक्के बँकेचे कर्ज) उभारावयाचे आहे. बँक / वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.

AH MAHABMS scheme 2023 लाभार्थी निवडीचे निकष

Animal Husbandry MAHABMS scheme 2023 योजनेमध्ये लाभार्थी निवडीचे निकष खालील प्रमाणे असतील.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांची निवड खालील प्राधान्य क्रमानुसार करण्यात येईल.
१. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२. अत्यल्प भूधारक शेतकरी – 1 हेक्टर पर्यंतचे भुधारक
३. अल्प भुधारक शेतकरी – 1 ते 2 हेक्टर पर्यंतचे भुधारक
४. सुशिक्षित बेरोजगार रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले
५. महिला बचत गटातील लाभार्थी (अ.क्र. 1 ते 4 मधील)

AH-MAHABMS Scheme 2023 साठी अर्ज कसा करावा?

 • https://www.mhpashuaarogya.com या संकेतस्थळास (अथवा AH-MAHABMS मोबाइल ऍप्लिकेशन) भेट द्या
 • योजनेसाठी अर्ज करा या मेनू वर क्लिक करा
 • नंतर अर्जदार आवश्यक माहती भरून अर्ज सादर करू शकतो
 • अधिक माहिती साठी टॉप बार मध्ये अर्ज कसा करावा या मेनू वर क्लिक करून विडिओ पाहू शकतो

हेही वाचा: PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

हेही वाचा: Chia seeds farming in marathi | चिया सीड्स शेती | अमेरिकन पीक मिळवून देईल रु. 1000 प्रति किलो

हेही वाचा: रेशीम उद्योग । Reshim udyog in marathi । रेशीम शेती यशोगाथा | Success Story

योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे अर्जासोबत सोडणे आवश्यक

 • फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
 • सातबारा (अनिवार्य)
 • ८ अ उतारा (अनिवार्य)
 • अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
 • आधारकार्ड (अनिवार्य )
 • रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
 • बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य)
 • रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती
 • एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल
 • पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा
 • अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
 • दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
 • दिव्यांग असल्यास दाखला
 • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
 • वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
 • शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
 • रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
 • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

सदर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कळवा. 

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

11 thoughts on “AH MAHABMS Scheme 2023 | 10+1 शेळी वाटप योजना 75% अनुदान”

Leave a comment