Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2.0 | पडीक जमिनीतून कमवा १२५००० | दर वर्षी ३% वाढ

mukhyamantri saur krishi vahini yojana 2.0

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० | पडीक जमिनीतून कमवा १२५००० | दर वर्षी ३% वाढ
mukhyamantri saur krishi vahini yojana 2.0

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० ची मोठी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील एकूण २९ दशलक्ष ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२% वीज वापरतात. सध्या कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिवसा शेतकर्‍यांना विश्वासार्ह वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या कडून अनेक दिवसांपासून होत आहे.

या समस्यांवर मात करण्यासाठी, “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना” नावाची एक अभिनव योजना जून २०१७ मध्ये सुरू करण्यात आली, ज्यामध्ये २ मेगावॉट ते १० मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रित सौर प्रकल्प कृषीप्रधान उपकेंद्रापासून ५ किमी त्रिज्येत स्थापित केले जातील. शेतकऱ्याच्यासाठी शेतीपंप फीडर सोलरायझेशनचे अफाट फायदे पाहता, महाराष्ट्र सरकारने भागधारकांशी तपशीलवार विचारविनिमय केल्यानंतर योजनेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने या योजनेची mukhyamantri saur krishi vahini yojana 2.0 म्हणून पुनर्रचना केली आणि शीघ्रगतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी एकूण ७००० मेगावॉट विकेंद्रित सौर प्रकल्प राबवून, सन २०२५ पर्यंत सुमारे ३०% फीडरचे सोलरायझेशनचे उद्दिष्ट ‘मिशन २०२५’ म्हणून निश्चित केले आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ०.५ मेगावॅट ते २५ मेगावॅट क्षमतेचा कृषी भार असलेल्या वितरण उपकेंद्रापासून ५-१० किमी परिघात विकेंद्रित सौर प्रकल्प स्थापित केले जातील.

mukhyamantri saur krishi vahini yojana 2.0 विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प हे महावितरण कंपनीच्या ३३/११ केव्ही उपकेंद्रांशी थेट जोडले जाणार असल्यामुळे पारेषण प्रणालीची गरज भासणार नाही आणि वितरण हानीमध्ये सुद्धा बचत होईल. उपकेंद्राजवळील सौर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नापीक जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भाडेतत्वावर देऊन चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. जास्ती जास्त शेतकऱ्यांनी या जोजनेचा फायदा घ्यावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने नापीक जमिनीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन मिळणार आहे. तसेच पाण्याविना नापीक जमीन सुद्धा मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येणार आहे.

Table of Contents

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

हेही वाचा: Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2.0 मिशन २०२५

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० उदिष्ठ:
कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० शेतकऱ्यांना पूर्णवेळ दिवसा वीज पुरवठा करणे हे सरकार चे उदिष्ठ आहे.

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2.0 राज्य शासनाचे निर्णय

saur krushi vahini yojana
 • आर्थिक साहाय्य
उपकेंद्र सुधारणारु. २५ लाख / उपकेंद्ररु. ३५० कोटी
वीज निर्मिती प्रोत्साहनरु. ०.१५ ते ०.२५/ युनिट, तीन वर्षासाठीरु. ७०० कोटी
ग्रामपंचायतींना सामाजिक लाभ अनुदानरु. ५ लाख / वर्ष, तीन वर्षासाठीरु. २१० कोटी
विकासकांना वेळेवर देयकांचे पैसे मिळण्यासाठी स्वतंत्र निधीरु. ७०० कोटी
राज्य शासनतर्फे हरित ऊर्जा निधीतून भरघोस आर्थिक मदतरु. १९६० कोटी

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० ची ठळक वैशिष्ट्ये:

वैशिष्ट्यतपशील
भागधारकांसाठी प्रमुख प्रोत्साहने– लवकर कार्यान्वित होणार्या प्रकल्पांसाठी वीज खरेदी करार (PPA) कालावधी हा पूर्वमान्य (deemed extension) असेल

– हरित उपकर निधीमधून रु. २५ लाख प्रति सबस्टेशन इतके एकरकमी अनुदान

– खाजगी जमीन मालक आणि शेतकर्यांसाठी रु. १,२५,००० प्रति हेक्टरी प्रमाणे जमीन भाडेपट्टी, वार्षिक ३% दरवाढीसह

– स्थानिक ग्रामपंचायतीसाठी रु. ५ लाख प्रति वर्ष प्रमाणे तीन वर्षांसाठी प्रोत्साहनपर अनुदान

– ११ केव्ही आणि ३३ केव्ही वर जोडलेल्या सौर प्रकल्पांना अनुक्रमे २५ पैसे प्रति युनिट आणि १५ पैसे प्रति युनिट प्रमाणे तीन वर्षांसाठी अनुदान

– हंगामी वीज निर्मितीच्या निर्देशकांनुसार deemed generation साठी 100% प्रचलित दर लागू

– एका पेक्षा जास्त प्रकल्पांसाठी सामायिक Evacuation वाहिनीची तरतूद
नाविन्यपूर्ण व्यवहार संरचना– महसुली जमिनीसाठी स्वतंत्र कंपनी (SPV)

– खाजगी आणि महसुली जमिनीचे एकत्रीकरण

– बॅक-टू-बॅक लीज-सबलीज; PPA-PSA व्यवस्था

– कार्यक्रमासाठी समर्पित नोडल एजन्सी
योजना जोखीम मुक्त करण्यासाठी उपाय– डेटा-रूम, GIS स्तरावर जमिनीचा तपशील

– एक खिडकी मंजुरी यंत्रणा

– कृषी वापरावर आधारित प्रकल्प क्षमता निर्धारित; CFA चा लाभ घेण्यासाठी ह्या योजनेतील वीज प्रकल्प KUSUM – C योजनेशी संलग्नित

– देयक सुरक्षा निधी (Revolving Fund), लेटर ऑफ क्रेडिट (LC)

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० मध्ये नवीन काय आहे

Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

समुह प्रकल्प – एक नवीन दृष्टीकोन:0

प्रकल्प क्षमता०.५ मेगावॅट ते २५ मेगावॅट
कनेक्शन पातळी (व्होल्टेज)
११ केव्ही
३३ केव्ही
उत्पादन आधारित प्रोत्साहन११ केव्ही: २५ पैसे प्रति युनिट
३३ केव्ही: १५ पैसे प्रति युनिट
(तीन वर्षांसाठी)
खालील अटींच्या अधीन राहून:
१) वीज खरेदी करार (PPA) डिसेंबर २०२४ पूर्वी
२) १२ महिन्यांच्या आता प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक

जमीनीसंबंधित समस्या सोडविण्यासाठी धोरण:

प्रकल्पाची अंमलबजावणी SPV गठीत करून
SPV द्वारे जमीन भाड्याने घेतली जाणार
ना हरकत दाखले (NOC) SPV द्वारे घेतले जाणार
४५ दिवसांची राज्यव्यापी जमीन शोध मोहीम
जिल्हाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग

नोकरी करावी की शेती?

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या खाजगी जमिनीसाठी वाढीव मोबदला (भाडे):

रेडी रेकनर दराच्या ६ % किंवा १, २५, ००० /- प्रति हेक्टर प्रति वर्ष, यापैकी जे जास्त असेल ते भाडे जमीन मालकाला मिळेल
मूळ भाडेपट्टीवर वार्षिक ३% वाढीची तरतूद

आयटी (IT) प्लॅटफॉर्मचा वापर:

माहितीच्या निरंतर आदानप्रदानासाठी विशेष API लिंकेजचा वापर
डिजिटल नकाशांवर सौर प्रकल्पांसाठी योग्य जमिनी शोधणे
PM गति-शक्ती पोर्टलद्वारे जमिनीची व्यवहार्यता तपासणे

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० लाभ घेण्यासाठी अर्ज कसे करावेत:

mukhyamantri krishi vahini yojana

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी online अर्ज करू शकतात. online https://www.mahadiscom.in/ या संकेतस्थळावर जाऊन आपली संपूर्ण माहिती व कागदपत्रासह अर्जदाराने अर्जासोबत प्रक्रिया शुल्क रु १,०००/- + १८% ( वस्तू व सेवा कर ) अर्जाच्या पुढील कार्यवाहीसाठी भरावे.

अर्जदारास सूचना :
१. प्रत्येक अर्जदाराने प्रथम नोंदणी करावी लागेल.
२. नोंदणी केल्यानंतर अर्जदाराने जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज करण्यासाठी योग्य युजर-आयडी / पासवर्डने लॉग इन करावे लागेल.
३. अर्जदाराने एका जागेसाठी एकच अर्ज करावा लागेल

कोण अर्ज करू शकते ?
१. अर्जदार हे स्वतः शेतकरी ,शेतकऱ्याचा गट
२. कॉपरेटिव्ह सोसायटी ,वॉटर युसर असोसिएशन
३. साखर कारखाने , जल उपसा केंद्र ,
४. ग्रामपंचायत ,उद्योग आणि इतर संस्था यापैकी कोणीही असू शकतात .

जागेची पात्रता:
१. जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर ते जास्तीत जास्त ५० एकर असावे.
२. महावितरण च्या ३३/११ K .V उपकेंद्राजवळील जमिनीला प्राधान्य देण्यात येईल ( ५ कि .मी च्या आतील).

शेतकरी मित्रानो अशा करतो आपल्या हि माहिती आवडली असेल.

 • शेती पूरक व्यवसाय यादी

  कोर्स overview कोर्स कोणी जॉईन करावा? कोर्सचे फायदे रूपरेषा शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने…


 • efarmwala.com

  शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने बाजारात शेळीचे दूध व मांस याला मोट्या प्रमाणात मागणी वाढत…


 • Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

  Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

  SC, ST किंवा महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून अर्थ साहाय्य व्हावं यासाठी Stand Up India योजना राबवण्यात येत आहे. Stand Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य करणारी योजना. Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट 10 लाख ते 1 कोटी पर्यंतचे बँक कर्ज किमान एक अनुसूचित जाती,…


8 thoughts on “Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2.0 | पडीक जमिनीतून कमवा १२५००० | दर वर्षी ३% वाढ”

 1. उत्तम अशी माहिती दिल्या बद्दल आभारी आहे. अशीच माहिती देत रहा.

  Reply

Leave a comment