Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

Pest and Disease Management on Rice Crop

Table of Contents

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन – भात पिकावर प्रामुख्याने पिवळा खोडकिडा (स्किरपोफॅगा इन्सरटयुलस), निळे मुंगेरे (लेप्टीस्पा पिगमिया), पाने गुंडाळणारी अळी (नॅफलोक्रोसिस मेडीनॉलिस), गादमाशी, सुरळीतील अळी (निंफुला डेक्टॉलिस), तपकिरी तुडतुडे (निलपर्वता ल्युजन्स), लष्करी अळी (मायधिमना सेपराटा) व लोंबीवरील ढेकण्या (लेप्टोकोरिसा अॅक्युटा) या किडी आढळतात व कडा करपा, करपा, पर्णकोष करपा हे रोग आढळतात.

भात पिकावरील कीड व व्यवस्थापन

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

१. पिवळा खोडकिडा (स्किरपोफॅगा इन्सरटयुलस)

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

 • मादी पतंग पिवळसर-नारिंगी रंगाचा असून त्याच्या पुढील पंखावर एक काळा ठिपका असतो
 • प्रादुर्भाव रोपवाटीकेपासूनच दिसून येतो
 • फुटव्यांच्या अवस्थेत प्रादुर्भीत फुटव्यांचा कोंब (गाभा) सुकतो यालाच गाभामर म्हणतात
 • पोटरीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास लोंब्या पांढरट पडुन वाळतात यालाच पळींज किंवा पांढरी पिशी म्हणतात
rice crop Pest Pivala khodkida

पिवळा खोडकिडा (स्किरपोफॅगा इन्सरटयुलस) नियंत्रणाचे उपाय

 • पिक कापणी नंतर जमीन उभी-आडवी नांगरून धसकटे नष्ट करावीत
 • पतंग प्रकाशपिंज-यात आकर्षित करून नष्ट करावेत
 • कीडीचे अंडीपूंज, कीडग्रस्त फुटवे / पळींजउपटून अळीसह नष्ट करावेत
 • लिंगप्रलोभन सापळयांचा प्रति हेक्टर २० सापळे या प्रमाणात वापर करावा
 • जैविक नियंत्रण: लावणीनंतर ३० दिवसांपासून ट्रायकोग्रामा जापोनिकमची ५०,००० अंडी/हे ३ ते ४ वेळा १० दिवसांच्या अंतराने शेतात सोडावीत
 • पेरणीनंतर रोपवाटीकेमध्ये १५ दिवसांनी दाणेदार १० टक्के फोरेट १० कि. किंवा ३ टक्के कार्बोफ्युरॉन २५ कि. प्रति हेक्टरी टाकावे.
 • गरज असल्यास लागवडीनंतर क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २६ मि.ली. कारटॅप हायड्रोक्लोराईड ५० टक्के २० ग्रॅ. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मि. ली. प्रती १० लि. पाण्यात मिसळून फवारावे

हेहि वाचा: Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

हेहि वाचा: Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

हेहि वाचा: AH-MAHABMS Scheme 2023 | दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना

२. निळे मुंगेरे (लेप्टीस्पा पिगमिया)

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

 • भुंगेरे गर्द निळया रंगाचे असून अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते
 • प्रौढ भुंगेरे पानाच्या वरच्या पृष्ठभागावरील हरितद्रव्य खातात. अळया पान पोखरून आतील हरितभाग खातात त्यामुळे पानांवरती समांतर पांढन्या रेषा उमटतात
 • कालांतराने असे चट्टे तपकिरी होतात व पाने करपल्यासारखी दिसतात
 • प्रादुर्भाव पीक फुटव्याच्या अवस्थेत व पसवण्यापुर्वी होतो
rice crop Pest nile bhongre

निळे मुंगेरे (लेप्टीस्पा पिगमिया) नियंत्रणाचे उपाय

 • जमिनीत पाणी जास्तकाळ न साठता निचरा होईल याची काळजी घ्यावी
 • भात खाचराच्या आजुबाजूस असलेल्या निळया भुंगेऱ्यांच्या इतर खाद्य वनस्पती उदा. कसई, धुर, चिमणचारा, रानटी नाचणी इत्यादींचा समुळ नायनाट करावा जेणेकरून या किडीच्या प्रौढ भुंग्यांना खाद्य उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा पुढील प्रादुर्भाव रोखता येतो
 • किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही १२.५ मि.ली. किंवा लॅमडा सायहेलोथ्रिन ५ टक्के प्रवाही ६.२५ मि.ली. प्रती १० लि. पाणी या प्रमाणात कीटकनाशकाचा वापर करावा

हेहि वाचा: Remedy to get cow buffalo on the heat | गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हेहि वाचा: PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

३. पाने गुंडाळणारी अळी (नॅफलोक्रोसिस मेडीनॉलिस)

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

 • पतंग सोनेरी फिकट पिवळसर रंगाचे असून पंखांवर काळी नागमोडी नक्षी असते
 • अळी पानांच्या दोन्ही कडा एकत्र चिकटवून पानाची गुंडाळी करून त्यात राहते आणि आतील पृष्ठभागावरील हरितद्रव्य खरवडून खाते
 • गुंडाळीच्या बाहय पृष्ठभागावर पांढरट चट्टा पडतो
rice crop Pest Paane gundalnari aali

पाने गुंडाळणारी अळी (नॅफलोक्रोसिस मेडीनॉलिस) नियंत्रणाचे उपाय

 • गुंडाळीग्रस्त पाने अळयांसह काढून नष्ट करावीत
 • ट्रायकोग्रामा जापोनिकम किंवा ट्रायकोग्रामा चिलोनीस या परोपजीवी कीटकाची ५०,००० अंडी/हे. ३ ते ४ वेळा १० दिवसाच्या अंतराने पिकामध्ये सोडावीत
 • नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १२.५ मि.ली. अॅसिफेट ७५ टक्के २२.२ ग्रॅ., कारटॅप हायड्रोक्लोराईड ५० टक्के २०ग्रॅ. क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३७.५ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के ईसी २० मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

हेहि वाचा: चिया सीड्स शेती | अमेरिकन पीक मिळवून देईल रु. १००० प्रति किलो | chia seeds farming in marathi

हेहि वाचा: रेशीम उद्योग । Reshim udyog in marathi । रेशीम शेती यशोगाथा | Success Story

४. गादमाशी

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

 • अळी रोपाच्या खोडात शिरून त्यामध्ये वाढणारा कोवळा अंकुर कुरतडून खाते
 • तिच्या लाळेत “सिसिडोजन” नावाचे द्रव्य असते
 • सिसिडोजनमुळे अळीच्या भोवतालचा अंकुराचा भाग फुगतो व त्याची कांद्याच्या पातीसारखी पिवळसर पांढरट किंवा चंदेरी रंगाची नळी तयार होते. त्यालाच “नळ” किंवा “गाद” किंवा “पाँगा” असे म्हटले जाते आणि त्याला लोंबी येत नाही
rice crop Pest gaad mashi

गादमाशी नियंत्रणाचे उपाय

 • कीडग्रस्त रोपे किंवा चंदेरी पोंगे उपटून जाळावीत
 • लागवडीनंतर २० दिवसांनीएक चंदेरी पोंगा प्रति चौ.मी. आढळल्यास ३ टक्के दाणेदार कार्बोफ्युरॉन २५ किलो किंवा क्लोरोपायरीफॉस १० टक्के १० कि. किंवा ०.३ टक्के दाणेदार फिप्रोनील २५ किलो प्रति हेक्टरी जमिनीत टाकावे

५. सुरळीतील अळी (निंफुला डेक्टॉलिस)

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

 • पतंग लहान, नाजूक व दुधाळ पांढरा असतो.
 • अळी कोवळे पान कापून त्याचे लहान तुकडे करते व त्याची सुरळी करून त्यात राहते. रात्रीच्या वेळी अळी पानातील हरितद्रव्य खरवडून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात. शेत निस्तेज दिसते. पिकाची वाढ खुंटते.
rice crop Pest suralitil aali

सुरळीतील अळी (निंफुला डेक्टॉलिस) नियंत्रणाचे उपाय

 • शेतात पाणी बांधून ठेवावे व नंतर किडग्रस्त पिकावरती एक दौर आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात. नंतर शेतातील पाणी बाहेर काढावे म्हणजे पाण्याबरोबर खाली पडलेल्या सुरळ्या वाहून जातात त्या गोळा करून नष्ट कराव्यात
 • नियंत्रणासाठी फेनथोएट ५० टक्के प्रवाही २० मि.ली. प्रती १० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी
 • नियंत्रणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले कारटॅप हायड्रोक्लोराईड ५० टक्के १२ ग्रॅ. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा कार्बोफ्युरॉन ३ टक्के दाणेदार १६.५ किलो प्रती हेक्टरी वापरावे (सदर कीटकनाशके लेबलक्लेम नाहीत)

हेहि वाचा: Side effects of Pesticides and Herbicides | शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ? कीटकनाशक व तणनाशक बॉटल वरील या चिन्हांचा अर्थ काय होतो?

हेहि वाचा: शास्वत उत्पन्न मिळवून देणार रेशीम शेती व्यवसाय | Reshim Sheti Vyavsay Yojana Mahiti aani Anudan

भात पिकावरील रोग व व्यवस्थापन

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

१. कडा करपा

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

 • हा रोग जिवाणूजन्य असून हॉन्थोमोनास ओरायझी या जिवाणूमुळे उदभवतो
 • रोगग्रस्त रोपांची पाने कडेकडून मध्य शिरेच्या दिशेने करपतात
 • कालांतराने संपूर्ण पान करपते
 • सकाळी पानोच्या खालच्या बाजूला दुधाळ रंगाचे दवबिंदू साचलेले दिसतात
 • अनुकूल वातावरणात जिवाणुची संख्या वाढल्याने चुडातील रोपांची पाने करपून रोपे मरतात याला रोगाची मरअवस्था असे म्हणतात
 • प्रादुर्भाव पीक फुलोन्यात असताना अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत झाल्यास लोंबीतील बहुतांश दाणे भरत नाहीत
Rice crop Disease kada karpa

कडा करपा नियंत्रणाचे उपाय

 • नत्र, स्फुरद, पालाश ही खते १०० ५० ५० प्रति हेक्टरी याप्रमाणात वापरावीत.
 • नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन ५ ग्रॅम आणि कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून एकत्रित फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांच्या अंतराने याच रासायनिक औषधांच्या आणखी दोन फवारण्या घ्याव्यात (सदर बुरशीनाशके लेबलक्लेम नाहीत).

हेहि वाचा: PMFME Scheme Apply Online Now | व्यवसायला सरकार देताय १० लाख अनुदान

हेहि वाचा: Soil Testing माती परीक्षण कशासाठी?

२. करपा

Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन

 • हा बुरशीजन्य रोग असून मँग्नापोर्थी ग्रीसी या बुरशीमुळे होतो
 • पानांवर शंखाकृती किंवा डोळयाच्या आकाराचे ठिपके आढळतात
 • पानांवरील ठिपका मध्यभागी राखाडी रंगाचा आणि कडा तपकिरी असते
 • असंख्य ठिपके एकत्र मिसळून पान करपते
 • पीक वाढीच्या सर्व अवस्थांमधे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो
 • लोंबी भरण्याच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास लोंबीचा देठ काळा कुजलेल्या भागात लॉबी मोडते यालाच मानमोडी असे म्हटले जाते
Rice crop Disease karpa

करपा नियंत्रणाचे उपाय

 • रोगग्रस्त बियाणे पेरणीसाठी वापरु नये
 • रोपवाटिकेत प्रति चौ. मी. क्षेत्रात १ किलो राख मिसळून बियाणे पेरावे
 • नत्र खताबरोबरच स्पुरद आणि पालाश यांचा शिफारसीनुसार वापर करावा
 • नियंत्रणासाठी खालील बुरशीनाशकाच्या तीन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने प्रती १० लि. पाणी याप्रमाणात कराव्यात
  1. ट्रायसाक्लॉझॉल ७५ टक्के डब्लू.पी. १० ग्रॅम
  2. इडीफेनफॉस ५० टक्के प्रवाही १० मि.ली.
  3. आयसोप्रोथिओलेन ४० टक्के प्रवाही १५ मि.ली.
  4. कार्बेन्डॅझिम ५० टक्के डब्लू.पी. १० ग्र.

३. पर्णकोष करपा

 • रोगाची लक्षणे लावणीनंतर फुटवे येणा-या अवस्थेत दिसून येतात
 • चुडाच्या तळाशी खोडावर तपकीरी रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके तयार होतात
 • बुरशी खोडाच्या आतील भागात प्रवेश करुन झपाटयाने वाढते
 • खोडाचा चिवटपणा कमी होवून खोडे कोलमडतात आणि पीक करपल्यासारखे दिसते
 • रोगग्रस्त झाडांवर लोंब्या धरत नाही
Rice crop Disease parnkosh karpa

पर्णकोष करपा नियंत्रणाचे उपाय

 • नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम ५० टक्के डब्लु.पी. २० ग्रॅ./ १० प्रक्रिया करावी
 • नियंत्रणासाठी बुरशीनाशक डायफेनोकोनॅझॉल २५ टक्के इसी ५ मि.ली. किंवा हेक्साकोनॅझॉल ५ टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा प्रोपीकोनॅझॉल २५ टक्के प्रवाही १० मि.लि. प्रती १० ली. पाणी मिसळून फवारणी करावी
 • रोग तीव्रतेप्रमाणे दुसरी व तिसरी फवारणी २० दिवसांच्या अंतराने करावी

शेती विषयक शासकीय माहितीसाठी येथे भेट द्या.

सदर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कालवा. येथे क्लिक करून आले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

10 thoughts on “Pest and Disease Management on Rice Crop | भात पिकावरील कीड, रोग व्यवस्थापन”

Leave a comment