Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

Pest and Disease Management on Soybean Crops

Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन सोयाबीन हे पीक महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचे पिक असुन शेतकन्यांची आर्थिक सुधारणा या पिकाच्या उत्पादनावर अवलंबुन आहे. किडींचा व रोगाचा प्रादुर्भाव हे सोयाबीनच्या कमी उत्पादकतेचे एक महत्वाचे कारण आहे. महाराष्ट्रात सोयाबीनवर प्रामुख्याने चक्रीभुंगा, खोडमाशी, विविध उंटअळया, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळ्या, तुडतुडे, पांढरी माशी ईत्यादी किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच सोयाबीन पिकावर मोझॅक व पिवळा मोझॅक या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते. पाने खाणाऱ्या अळयांमुळे एकत्रितपणे (स्पोडोप्टेरा, अमेरिकन बोंडअळी, केसाळ अळया इ.) ७१%, फक्त उंटअळयामुळे ५०%, चक्री भुंग्यामुळे २९ ते ८३% तर खोडमाशीमुळे ५०% पर्यंत सोयाबीनचे नुकसान होऊ शकते.

Table of Contents

सोयाबीन पिकावरील प्रमुख कीड

 • खोडमाशी
 • चक्री भुंगा
 • तंबाखूवरील पाने खाणारी अळी
 • उंटअळया
 • घाटे अळी

या सोयाबीन पिकावर पडणारी प्रमुख कीड आहेत.

हेही वाचा: शबरी घरकुल योजना | Shabari Gharkul Yojana

हेही वाचा: शेतकऱ्याची आकाशाला गवसणी ७ कोटींचे हेलिकॉप्टर केलं खरेदी | डॉ. राजाराम त्रिपाठी

हेही वाचा: पनवेलचा पोलीस दूधवाला | २० जनावरे १२५ लिटर दूध दर८० रु प्रति लिटर

हेही वाचा: कुक्कुट पालन व्यवसाय संपूर्ण माहिती | जो करेल कुक्कूटपालन, त्याचे घरी खेळेल चलन!!

सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन:

Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

1. खोडमाशी

प्रादुर्भावाचा कालावधी: खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून कधीही होऊ शकतो.

प्रादुर्भावाची लक्षणे: खोडमाशीचा प्रादुर्भाव पिक लहान असतानाच सहजपणे ओळखु येतो. सोयाबीनचे रोप लहान असताना म्हणजे १५ ते २० दिवसांच्या आसपास जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता असते. असा शेंडा मधोमध कापल्यास आत मध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही व शेवटी फक्त प्रौढ माशी निघून छिद्र फांदीच्या खोडाजवळील बाजूस दिसते.

khodmashi diseases of soybean

2. चक्री भुंगा

प्रादुर्भावाचा कालावधी: चक्री भुंगा या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनचे पिक २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर सुरु होताना दिसतो.

प्रादुर्भावाची लक्षणे: शेतात फिरताना झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेले दिसते. पान फक्त सुकलेले असेल तर चक्रीभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते जर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असण्याची तसेच त्यातून लवकरच अळी निघून ती नुकसान सुरु करण्याची शक्यता असते. चक्रीभुंग्याने केलेल्या खापेमुळे वरच्या खापेच्या वरील भाग वाळून जातो. अंडयातून निघालेली अळी पानाचे देठ, फांदी व खोड आतून पोखरत जमिनीच्या दिशेने जाते.

chakri bhunga diseases of soybean

3. तंबाखूवरील पाने खाणारी अळी

प्रादुर्भावाचा कालावधी: तंबाखूवरील पाने खाणारी अळी या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्ट ते आक्टोबर महिन्यात मोठया प्रमाणावर दिसून येतो. दिवसाच्या वेळी अनेकदा या अळया पानाखाली अथवा जमिनीत लपून राहतात व रात्रीच्या वेळी बाहेर पडतात ज्यामुळे त्या दिसत नाहीत.

प्रादुर्भावाची लक्षणे: अंडयातून निघालेल्या सुरूवातीच्या अवस्थेतील अळया समूहाने राहून प्रथम अंडी घातलेल्या पानाचे हरितद्रव्य पूर्णपणे खाऊन टाकतात. परंतु पानास छिद्र पाडत नाहीत त्यामुळे असे पान पातळ पांढऱ्या कागदासारखे दिसते. मोठया झाल्यानंतर अळया सर्व शेतात पसरतात व पानास छिद्र पाडून पाने खातात. फुले लागल्यानंतर बऱ्याचदा या अळया फुलेसुध्दा खातात.

soybean viruses

4. उंटअळया

Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

प्रादुर्भावाचा कालावधी: उंटअळया साधारपणे पीक १५ ते २० दिवसांचे झाले की लगेच उंट अळयांचा प्रादुर्भाव होताना दिसतो.

प्रादुर्भावाची लक्षणे: या किडींच्या लहान अळया पानांच्या खालचा हिरवा भाग खरवडून खातात त्यामुळे पानांचा फक्त वरचा पांढरा पापुद्रा दिसतो. काही काळानंतर असे पातळ पापुद्रे फाटतात व त्या ठिकाणी छिद्रे दिसतात. मोठया अळया पानांना वेगवेगळया आकाराची छिद्रे पाडून खातात. त्या फुले व शेंगाही खातात.

soybean viruses 1

5. घाटे अळी

प्रादुर्भावाचा कालावधी: घाटे अळी या किडीचा प्रादुर्भाव सहसा पीक एक महिन्याचे झाल्यानंतर सुरु होताना दिसतो. पिकास फुले व शेंगा लागल्यानंतर तो वाढलेला आढळतो.

प्रादुर्भावाची लक्षणे: पिकास फुले लागलेली नसताना हि अळी पाने खाते. कळया, फुले व शेंगा लागल्यानंतर ती त्यांना नुकसान पोहोचविण्यास सुरवात करते. प्रादुर्भावग्रस्त कळया, फुले व लहान शेंगा खाली जमिनीवर पडतात. मोठया शेंगांना ही अळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाते. एकाच शेंगेला एकापेक्षा जास्त छिद्रे सुध्दा आढळतात. या अळीची विष्ठा, पानावर, शेंगावर व खाली जमिनीवर पडलेली आढळते.

soybean ghate aali virus

विविध किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे होणारे आर्थिक नुकसान

१) खोडमाशी – १० ते १५% प्रादुर्भावग्रस्त झाडे

२) चक्री भुंगा – ३ ते ५ प्रादुर्भावग्रस्त झाडे / मिटर ओळीत

३) तंबाखूवरील पाने खाणारी अळी – १० अळया / मिटर ओळीत पिक फुलोऱ्यावर येण्यापुर्वी

४) उंटअळया – ४ अळया / मिटर ओळीत पिक फुलोऱ्यावर असताना
३ अळया / मिटर ओळीत पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना

५) घाटे अळी – ५ अळया / मिटर ओळीत पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत

हेही वाचा: PMFME Scheme Apply Online Now | व्यवसायला सरकार देताय १० लाख अनुदान

हेही वाचा: Soil Testing माती परीक्षण कशासाठी?

हेही वाचा: Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय

सोयाबीन पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी मशागतीय, यांत्रिक, जैविक व रासायनिक पध्दती अवलंब केला जातो.

Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

1. एकात्मिक कीड व्यवस्थापन मशागतीय पध्दती:

 • मुख्य पिकाभोवती एरंडी व सूर्यफुल या सापळा पिकाची एक ओळ लावावी. या सापळा पिकांवर स्पोडोप्टेराचा प्रादुर्भाव सर्वात अगोदर येतो. या सापळा पिकावर स्पोडोप्टेरा किडीने घातलेली अंडी किंवा अंडयातून निघालेल्या समुहातील अळया जाळीदार पानांसह काढून कष्ट करावीत
 • पेरणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवावी. ज्या भागामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव नेहमीच मोठया प्रमाणात दिसून येतो त्या ठिकाणी पिकाची पेरणी जून अखेर पर्यंत करायला पाहिजे. सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास कीटकनाशकाची फवारणी करणे सोयीस्कर होते
 • पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेपासून पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडीच्या पूरक वनस्पतींचा जसे कि कोळशी, पेठारी, रानभेंडी या नष्ट कराव्यात
 • पिकांची फेरपालट करावी. सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पीक घेऊ नये घेतल्यास पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पुढील वर्षीच्या सोयाबीनवर मोठया प्रमाणात येतो

2. एकात्मिक कीड व्यवस्थापन यांत्रिक पध्दती:

 • शेतात सुरवातीपासून किड रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नष्ट करावीत
 • चक्री भुंगा व खोडमाशी प्रादुर्भावग्रस्त वाळलेल्या फांद्या व झाडे या आतील किडीसह नष्ट कराव्यात
 • तंबाखूची पाने खाणारी अळी व केसाळ अळ्या एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात. अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगत तोडून नष्ट करावीत
 • घाटे अळी व तंबाखूवरील पाने खाणारी अळी किडींच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे शेतात लावावेत
 • भक्षक पक्षांना बसण्यासाठी शेतात ८ ते १० प्रति एकरी पक्षी थांबे उभारावेत

3. एकात्मिक कीड व्यवस्थापन जैविक पध्दती:

 • पाने खाणाऱ्या सर्व प्रकारच्या अळ्या यांच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क ५० मिली १० लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी
 • तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एल.ई. विषाणु २ मि.ली. प्रति लिटर पाणी किंवा नोमूरिया रिलाई बुरशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी. फवारणी शक्यतो सायंकाळी करावी

4. एकात्मिक कीड व्यवस्थापन रासायनिक पध्दती:

रासायनिक पध्दत किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.

Soybean Pest and Disease chart
 • वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे, पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी
 • शेतात कीटक नाशकाची फवारणी करताना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा

हेही वाचा: चिया सीड्स शेती | अमेरिकन पीक मिळवून देईल रु. १००० प्रति किलो | chia seeds farming in marathi

हेही वाचा: Side effects of Pesticides and Herbicides | शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ? कीटकनाशक व तणनाशक बॉटल वरील या चिन्हांचा अर्थ काय होतो?

हेही वाचा: शास्वत उत्पन्न मिळवून देणार रेशीम शेती व्यवसाय | Reshim Sheti Vyavsay Yojana Mahiti aani Anudan

सोयाबीन पिकावरील रोग व्यवस्थापन:

सोयबीन मोझॅक

सोयबीन मोझॅक हा रोग सोयाबीन मोझॅक पॉटीव्हायरस या विषाणूमुळे उद्भवतो. सोयाबीन बरोबरच इतर डाळवर्गीय पिकांवर देखिल त्याचा प्रादुर्भाव होतो. रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने रोगग्रस्त बियाण्यामुळे होतो. ३२° से. पेक्षा अधिक तापमान वाढल्यास रोगाची लक्षणे बहुधा दिसून येत नाहीत.

दुय्यम प्रसार मावा किडीमुळे होतो. रोगाची तीव्रता वाढल्यास सोयाबीनच्या उत्पादनात ५० ते ९० टक्क्यांपर्यंत घट येते.

सोयबीन मोझॅक रोगाची लक्षणे: सुरुवातीला शेंड्याकडील कोवळ्या पानांच्या शिरा पिवळसर होतात. पानांवर गडद हिरव्या रंगाचे चट्टे / उंचवटलेले पुरळ दिसून येतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांची पाने सुरकुततात व खालच्या बाजूस वळतात. रोगाची तीव्रता वाढल्यास झाडाचा शेंडा व शेंड्याकडील पाने करपून पानगळ होऊन झाडे वाळतात. रोगग्रस्त झाडे खुरटी राहतात व अशा झाडांना शेंगा देखिल कमी प्रमाणात लागतात. शेंगा वेड्या वाकड्या, चपट्या व पसरट झालेल्या दिसून येतात. अशा शेंगांतील दाण्यांच्या पृष्ठभागावर करड्या / काळ्या रंगाचे चट्टे दिसतात. रोगग्रस्त झाडांच्या मुळावर नत्र स्थिरीकरण करणाऱ्या गाठींची संख्या कमी होऊन त्या आकाराने लहान राहतात. मोझॅकग्रस्त झाडे, पाने / शेंगा इतर कीड व रोगांस सहज बळी पडतात.

soybean mosaic virus

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणूमुळे उद्भवतो, पांढरी माशी ही किड या रोगाचा प्रसार करते. या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर आढळून येतो. मुग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इ. यजमान पिकांवर तो जिवंत राहू शकतो व सोयाबीन पिकावर संक्रमित होत राहतो.

सोयाबीनवरील पिवळा मोझॅक रोगाची लक्षणे: सुरवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट पिवळे ठिपके /हलके चट्टे दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या / चट्ट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडते. हरितद्रव्याचा -हास झाल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेडीवाकडी होतात व आकार लहान होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस करपट रंगाचे ठिपके दिसतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांना शेंगा कमी प्रमाणात लागतात व त्यातील दाणे लहान राहतात बहुतांश वेळी शेंगादाणे विरहीत व पोचट राहिल्याने उत्पादनात लक्षणीय घट होते.

हेही वाचा: Advanced Dairy Farming Difficulties, Challenges and Management | आधुनिक दुग्धव्यवसाय अडचणी, उपाय आणि व्यवस्थापन

हेही वाचा: Remedy to get cow buffalo on the heat | गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हेही वाचा: PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

सोयाबीन पिकावरील एकात्मिक रोग व्यवस्थापन:

Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन

 • शेतातील तणांचा वेळीच बंदोबस्त करावा
 • शिफारशीत खतांचा वापर करावा तसेच नत्रयुक्त खतांचा अती वापर टाळावा
 • पिकाचे नियमित सर्वेक्षण करून रसशोषक किडींच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे
 • रोगग्रस्त झाडे दिसून येताच समूळ उपटून टाकुन त्वरित नष्ट करावीत. उपटलेली झाडे बांधावर टाकू नयेत
 • पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये
 • पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे २०-२५ प्रती हेक्टरी पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावेत
 • ५% निंबोळी अर्क किंवा अँझाडीरेक्टीन १५०० पी. पी. एम. २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी
 • लेकॅनिसिलीयम लेकॅनी १.१५ डब्ल्यू पी (१x१०८ सी एफ यु / ग्रॅम) ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी
 • सद्य परिस्थितीत सोयाबीन पिकातील रस शोषक किडी (मावा व पांढरी माशी) नियंत्रणासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीद्वारा कुठल्याही कीटकनाशकाची शिफारस उपलब्ध नाही. तथापी रोगप्रसार करण्यास सदर किडी कारणीभूत असल्याने त्यांच्या नियंत्रणासाठी खालील कीटकनाशकांचा वापर फवारणीसाठी करावा
 • मावा : डायमिथोएट ३०% ई. सी. २० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६% एस. एल. २० मिली किंवा ब्युप्रोफेझीन २५% एस. सी. २० मिली किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ % एस. एल. २ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारावे
 • पांढरी माशी : थायामिथोक्झाम २५% डब्ल्यू. जी. २ ग्रॅम किंवा ब्युप्रोफेझीन २५ एस. सी. २० मिली किंवा क्वीनॉलफॉस २५% ई. सी. २० मिली किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ % एस. एल. २ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारावे
 • पांढऱ्या माशीचा उद्रेक टाळण्यासाठी सिंथेटिक पायरेथ्रोइड गटातील कीटकनाशकांची फवारणी करू नये. कारण ती त्यांच्या नैसर्गिक शत्रु (मित्र किडी) चा नाश करतात
 • वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी साध्या पंपाने करावी. गरज भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. तसेच कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. उपरोक्त कीटकनाशकांसोबत इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते व अन्नद्रव्ये इ. मिसळू नये. सदर कीटकनाशकांच्या शिफारशी ह्या तदर्थ स्वरूपाच्या असून शेतकरी बंधुंना तात्काळ नियंत्रणाच्या दृष्टीने प्रसारित करण्यात येत आहेत
 • शेतकरी बंधुनी सोयाबीन पिकाचे सर्वेक्षण करून किडीचा प्रादुर्भाव असल्याशिवाय सरसकट फवारणी करू नये. फवारणी करतेवेळी संरक्षक साधनांचा वापर करावा

Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन PDF

शेती विषयक शासकीय माहितीसाठी येथे भेट द्या…

सदर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कालवा. येथे क्लिक करून आले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

13 thoughts on “Pest and Disease Management on Soybean Crops | सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन”

Leave a comment