PM Kisan सन्मान निधीच्या 14th installment | या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan सन्मान निधी योजनेच्या 14 वा हप्ता

PM Kisan सन्मान निधीच्या 14th installment

PM Kisan सन्मान निधीच्या 14th installment च्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी महत्वाची बातमी.

PM Kisan सन्मान निधीच्या 14th installment या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan सन्मान निधी योजनेच्या 14 वा हप्ता

या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan सन्मान निधी योजनेच्या 14 वा हप्ता.

जूनच्या 15 तारखे पर्यंत PM Kisan सन्मान निधीचा चौदावा हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार  असली तरी अजूनही बऱ्याच शेतकरी यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातील तब्बल 8535691 शेतकऱ्यांनी अर्ज केले असून त्यापैकी 74% शेतकरीच PM Kisan सन्मान निधीचा लाभ घेण्यास पात्र आहेत. महाराष्ट्र राज्यातील अजून 26% शेतकऱ्यांना अर्जात काही त्रुटी असल्याने PM Kisan सन्मान निधी या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. राज्यात PM Kisan सन्मान निधीचा 14 हप्ता मिळवण्यासाठी अपात्र होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 26% आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी PM Kisan सन्मान निधी 14 वा हप्ता मिळावा यासाठी म्हणून कृषी विभागाने पुढाकार घेतलेला आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी एक पत्र काढून राज्यातील शेतकऱ्यांना यासंदर्भात आवाहन केले आहे. 

मित्रांनो PM Kisan सन्मान निधीचा 14 वा हप्ता मिळण्यासाठी शासनाकडून काही अटी आणि शर्ती घालण्यात आलेले आहेत. शेतकरी अपात्र होण्यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत त्यातील काही बाबी या पत्राद्वारे शेतकऱ्यांना कळविण्यात आलेल्या आहेत. या बाबींची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना PM Kisan सन्मान निधीचा चौदावा हप्ता मिळण्यास कोणतीच अडचण होणार नाही आणि या बाबींची पूर्तता करत असताना याची जबाबदारी कोणाची असणार आहे हेही या पत्रकाद्वारे कळविण्यात आलेले आहे.

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: नोकरी करावी की शेती?

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

हेही वाचा: Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

PM Kisan सन्मान निधी चौदावा हप्ता मिळण्यापासून अपात्र होण्याची कारणे खालील प्रमाणे आहे

pm kisan beneficiary status check | PM Kisan Registration number असा मिळवा.
  1. No Land Seeding
    शेतकरी मित्रांनो PM Kisan सन्मान निधी पासून अपात्र  होणाच्या करणांपैकी No Land Seeding हे मुख्य कारण आहे. तुम्ही ऑनलाईन केलेल्या अर्जामध्ये land seeding च्या समोर जर NO हा ऑप्शन येत असेल तर तुम्ही PM Kisan सन्मान निधी मिळण्यापासून अपात्र होता. मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुमचं Physical Verification यादी मध्ये नाव आलेला आहे. जी तुमच्या नावावर जमीन आहे किंवा भूमी अभिलेखचे रेकॉर्ड आहे ते PM Kisan संकेतस्थळावर अपडेट होणे गरजेचे आहे. मित्रांनो यासाठी तुमच्या नावावर असलेला सातबारा, बँकेचा डिटेल्स आणि तुमचे रेशन कार्ड अशाप्रकारे कागदपत्रे तुम्हाला ग्रामसेवक, कृषी सहाय्यक किंवा तलाठी  यांच्याकडे विहित नमुन्यात फॉर्म भरून जमा करायची आहेत. शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून याची जबाबदारी तुमच्या गावासाठी निवडलेल्या कृषी सहाय्यक किंवा कृषी मित्र यांच्याकडे देण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो तुमच्या गावासाठी नेमून दिलेल्या कृषी मित्र याच्याशी संपर्क साधून या त्रुटी दूर करण्यासाठी तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. PM Kisan सन्मान निधीसाठी अपात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचा तपशील कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात कलेक्ट केलेला आहे तरीसुद्धा बरेच शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. यापुढे कोणताही पात्र शेतकरी PM Kisan सन्मान निधी लाभापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी तहसीलदार यांच्यावर देण्यात आलेले आहे. यासंदर्भात तहसीलदार कार्यालयाला सूचना देण्यात आलेले आहेत.

खलील फोटो दर्शवल्या प्रमाणे https://www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन Beneficiary Status हा पर्याय निवडा. रजिस्टर नंबर द्वारे login करून आपण स्वतः आपल्या अर्जामध्ये Land Seeding या पर्यासमोर Yes आहे की No ते तपासू शकता. जर Land Seeding या पर्यायासमोर No असेल तर आपल्याला घाई करायची आवश्यकता आहे. सातबारा, बँकेचा डिटेल्स आणि तुमचे रेशन कार्ड अशाप्रकारे कागदपत्रे तुम्हाला ग्रामसेवक, कृषी सहाय्यक किंवा तलाठी  यांच्याकडे विहित नमुन्यात फॉर्म भरून जमा करायची आहेत.

केसीसी लोन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी या लिंक वरती क्लिक करा.

2. eKYC
शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांची KYC अजूनही झालेली नाही अशे शेतकरी PM Kisan सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. आपण अजूनही KYC पूर्ण केली नसाल तर तुम्ही PM Kisan या वेबसाईटवर जाऊन रेजिस्टर मोबाईल वरून OTP द्वारे किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर भेटून KYC पूर्ण करायचे आहे. यासाठी आधार कार्डशी संलग्न मोबाईल नंबर आपल्या सोबत असणे गरजेचे आहे किंवा आदर कार्ड संलग्न बायोमेट्रिकद्वारे सुद्धा ही KYC पूर्ण करू शकतो.

खलील फोटो दर्शवल्या प्रमाणे https://www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन Beneficiary Status हा पर्याय निवडा. रजिस्टर नंबर द्वारे login करून आपण स्वतः आपल्या अर्जामध्ये eKYC या पर्यासमोर Yes आहे की No ते तपासू शकता.

2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

3. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे (Aadhaar Bank Account Seeding)

शेतकरी मित्रांनो बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे हे की एक मुख्य कारण आहे PM Kisan सन्मान निधीपासून शेतकरी अपात्र होण्याचे. आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कारन्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी https://www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. बऱ्याच शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक मध्ये दिले असून बँकेच्या माध्यमातून आधार कार्ड लिंक केल्यानंतर त्याचे एम पी सी आय मॅपिंग न झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना PM Kisan सन्मान निधी पासून वंचित राहावे लागले आहे. यासाठी पुन्हा एकदा बँकेची संपर्क साधून आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणे आवश्यक आहे आपले बँक खाते आधारशी लिंक नसल्यास पर्यायाने महाDBT माध्यमातून PM Kisan सन्मान निधीचे वितरण करता येत नाही.

खलील फोटो दर्शवल्या प्रमाणे https://www.pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन Beneficiary Status हा पर्याय निवडा. रजिस्टर नंबर द्वारे login करून आपण स्वतः आपल्या अर्जामध्ये Aadhaar Bank Account Seeding Status या पर्यासमोर Yes आहे की No ते तपासू शकता. जर Aadhaar Bank Account Seeding Status या पर्यायासमोर No असेल तर आपल्याला घाई करायची आवश्यकता आहे. आपण आपलं आधार नंबर बँक खात्याशी लिंक करण्यासाठी आधार कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईलनंबर घेऊन बँकेत जाऊन आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करू शकता.

PM KISAN AADHAAR

वरील तिन्ही अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच PM Kisan सन्मान निधीचे महाDBT द्वारे वितरण केले जाणार आहे.

Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

आपल्या खात्यात PM Kisan सन्मान निधीचे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

pm kisan beneficiary status check | PM Kisan Registration number असा मिळवा.

शेतकरी मित्रांनो अजूनही आपल्या खात्यात https://www.pmkisan.gov.in/ सन्मान निधीचे पैसे जमा झाले नसतील तर लवकरात लवकर वरील अटी पूर्ण करून PM Kisan सन्मान निधीचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा अशा प्रकारचे आव्हान कृषी विभागाच्या मार्फत करण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार द्वारे NAMO शेतकरी योजना राबवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे NAMO शेतकरी योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून या योजनेचा लाभ टाकून घेऊ शकता.

 शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आणि माहिती होती आशा करतो ही माहिती आपल्याला आवडली असेल अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

2 thoughts on “PM Kisan सन्मान निधीच्या 14th installment | या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan सन्मान निधी योजनेच्या 14 वा हप्ता”

Leave a comment