PMFME Scheme Apply Online Now | व्यवसायला सरकार देताय १० लाख अनुदान

Table of Contents

PMFME Scheme या योजनेमध्ये वैयक्तिक उद्योगांना भांडवलासाठी बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किंमतीच्या ३५% पर्यंत व जास्तीत जास्त रुपये १०.०० लाख या मर्यादेत प्रति प्रकल्पासाठी अनुदान देय राहिल. लाभार्थी हिस्सा हा प्रकल्प किंमतीच्या किमान १०% असेल व उर्वरित बँकेचे कर्ज असेल. PMFME Scheme या योजनेमध्ये नवीन व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या करणे किंवा जुना व्यवसाय वाढवणे, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, विक्री वाढवणे यासाठी केंद्र व राज्य सरकार आर्थिक मदत करणार आहे. PMFME Schemeया योजने अंतर्गत रु. ४१९०७.७६ लाख एवढ्या रखमेचं वितरण २०२३-२४ चालू आर्थिक वर्षात केले जाणार असल्याचा GR राज्य शासनाने काढला आहे.

PMFME Scheme

PMFME Scheme काय आहे?

PMFME Scheme या योजनेमध्ये वैयक्तिक उद्योगांना भांडवलासाठी बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किंमतीच्या ३५% पर्यंत व जास्तीत जास्त रुपये १०.०० लाख या मर्यादेत प्रति प्रकल्पासाठी अनुदान देय राहिल. लाभार्थी हिस्सा हा प्रकल्प किंमतीच्या किमान १०% असेल व उर्वरित बँकेचे कर्ज असेल. PMFME Scheme या योजनेमध्ये नवीन व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या करणे किंवा जुना व्यवसाय वाढवणे, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, विक्री वाढवणे यासाठी केंद्र व राज्य सरकार आर्थिक मदत करणार आहे. PMFME Scheme या योजने अंतर्गत रु. ४१९०७.७६ लाख एवढ्या रखमेचं वितरण २०२३-२४ चालू आर्थिक वर्षात केले जाणार असल्याचा GR राज्य शासनाने काढला आहे. असंघटित सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी सर्वंकष मुल्यसाखळीच्या दृष्टीने कौशल्य प्रशिक्षण, उद्यमशीलता, तंत्रज्ञान, कर्ज व विपणन या बाबतीत राज्य शासनाचे सक्रिय सहभाग व पाठबळाची गरज आहे. गेल्या दशकामध्ये केंद्र व राज्य शासनाने अन्न प्रक्रिया संस्था व महिलांचे स्वयंसहाय्यता गट स्थापन करुन शेतकऱ्यांना एकत्रित करण्यासाठी व्यापक प्रयत्न केले आहेत. स्वयंसहाय्यता गटांनी काटकसर व सुमारे ९७% पर्यंत कर्जाची परतफेड करुन खूपच चांगली प्रगती केली असून, त्यांची अनुत्पादक मालमत्तादेखील खूपच कमी आहे. शासनाने स्वयंसहाय्यता गटांच्या वतीने (अन्नप्रक्रिया उपक्रमासह) विविध सेवाक्षेत्रामधील उपक्रम हाती घ्यावेत यादृष्टीने चालना देण्यासाठी व्यापक प्रयत्न केले आहेत. तथापी शेतकरी उत्पादक संस्था व स्वयंसहाय्यता गटांनी गुंतवणूक करावी व त्यांचे उपक्रम वाढवावेत यासाठी काही शासकीय योजना राबविल्या जात आहेत. पंधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन ही योजना केंद्र पुरस्कृत असून सुक्ष्म खाद्य उद्योगांसमोरील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार केली आहे. शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्थांच्या क्षमता विचारात घेवून त्यांना सहाय्य करणे, उद्योगांची स्थरवृध्दी करणे व त्यांना औपचारिक दर्जा प्रदान करणे यासाठी ही योजना तयार केली आहे.

हेही वाचा: Talathi Bharti 2023 apply online Now | तलाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | तलाठी भरती ऑनलाईन अर्ज

हेही वाचा: PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

हेही वाचा : लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

PMFME Scheme योजनेचं उद्धिष्ट

PMFME Scheme या योजनेचे उद्देश सुक्ष्म उद्योगांची क्षमता बांधणी करून खालील बाबींसाठी सक्षमीकरण करणे यादृष्टीने निश्चित केले आहेत. या योजनेअंतर्गत २ लाख सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित अर्थसाह्य देय राहिल. तसेच या क्षेत्राच्या वृध्दीसाठी सामाईक पायाभूत सुविधा व संस्थात्मक रचनेसाठी आवश्यक ते सहाय्य करण्यात येईल.

 • असंघटित अन्न प्रक्रिया उद्योगातील कार्यरत वैयक्तिक सुक्ष्म उद्योगांच्या स्पर्धाक्षमतेत वाढ करणे व या क्षेत्रास औपचारिक दर्जा प्रदान करणे
 • शेतकरी उत्पादक संस्था (FPO), स्वयंसहाय्यता गट (SHG) व उत्पादक सहकारी संस्थांच्या उत्पादनांसाठी सर्वकष मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी सहाय्य करणे
 • सध्या कार्यरत असलेले सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्थांना अधिकाधिक पतमर्यादा उपलब्ध करणे
 • उत्पादनांचे बँडींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटित अशा पुरवठा साखळीशी जोडणे
 • सध्या कार्यरत असलेल्या दोन लाख उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे
 • सामाईक सेवा जसे की सामाईक प्रक्रिया सुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योगवाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सुक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे
 • संस्थांचे बळकटिकरण तसेच अन्नप्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण यावर भर देणे
 • व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा या सुक्ष्म उद्योगांनी अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे
हेही वाचा: Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय

PMFME Scheme एक जिल्हा एक उत्पादन धोरण:

PMFME Scheme या योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन हे धोरण स्विकारले असून त्यामुळे निविष्ठा खरेदी, सामाईक सेवांचा लाभ घेणे व उत्पादनाचे विपणन अधिक सुकर होणे यादृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. एक जिल्हा एक उत्पादन या धोरणामुळे मुल्यसाखळी विकास व पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. एका जिल्ह्यात एक जिल्हा एक उत्पादनाचे एका पेक्षा 2 जास्त समुह असु शकतात. लगतच्या जिल्ह्यातील एक जिल्हा एक उत्पादनाचा एक समुह असु शकतो.

PMFME Scheme या योजनेचा भर नाशिवंत शेतमालावर असल्याने त्यादृष्टीने राज्ये प्रत्येक जिल्हयासाठी उत्पादने निश्चित करतील. त्यासाठी राज्य सरकारे प्राथमिक सव्र्व्हेक्षण हाती घेतील. एक जिल्हा एक उत्पादन धोरणानुसार नाशिवंत कृषि उत्पादन, तृणधान्यांवर आधारित उत्पादन किंवा अन्न उत्पादन जे जिल्ह्यात व्यापक स्वरुपात घेतले जात आहे किंवा कृषिपूरक क्षेत्रातील उत्पादन असेल. या उत्पादनाच्या यादीमध्ये आंबा, बटाटा, लिची, टोमॅटो, शाबूदानाकंद, किन्नू, भुजिया (शेव), पेठा, पापड, लोणची, मिलेट आधारित उत्पादने, मत्स्यपालन, कुक्कूटपालन, मांस उत्पादन, तसेच पशुखाद्य निर्मिती इ. ना या योजनेअंतर्गत सहाय्य मिळू शकेल. याशिवाय काही पारंपारिक व नाविण्यपूर्ण उत्पादने ज्यामध्ये टाकाऊ पदार्थापासून उत्पन्न मिळवून देणाऱ्या उत्पादनाना सहाय्य करण्यात येईल. उदा. मध, आदिवासी क्षेत्रातील किरकोळ वनउत्पादने, हळद, आवळा, हळदपूड यासारखी पारंपारिक भारतीय वनौषधी खाद्य उत्पादने, इ. चा समावेश आहे. कृषि उत्पादनांवर प्रक्रिया करणे तसेच वाया जाणाऱ्या उत्पादनाचे प्रमाण कमी करणे, उत्पादनाची योग्य पारख करणे, उत्पादनाची साठवणूक व विपणन यासाठी सहाय्य देण्यात येईल.

सध्या कार्यरत असलेल्या वैयक्तिक सुक्ष्म उद्योगांना भांडवली गुंतवणूकीसाठी सहाय्य करण्याकरिता एक जिल्हा एक उत्पादन या धोरणानुसार जे उत्पादन निश्चित केले आहे त्याचे उत्पादन घेत असलेल्या उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल. तथापी कार्यरत उद्योग जर अन्य उत्पादन घेत असतील, तर त्यांना देखील या योजनेअंतर्गत सहाय्य केले जाईल. शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट व उत्पादक सहकारी संस्थांच्या बाबतीत मात्र जे एक जिल्हा एक उत्पादन धोरणानुसार उत्पादन घेत असतील तरच त्यांचा सहाय्यासाठी विचार केला जाईल.

हेही वाचा: कुक्कुट पालन व्यवसाय संपूर्ण माहिती | जो करेल कुक्कूटपालन, त्याचे घरी खेळेल चलन!!
PMFME-Apply-Online-2023

PMFME Scheme कोण- कोण करू शकतात अर्ज?

PMFME Scheme या योजनेमध्ये वयक्तिक व्यक्ति, कंपन्या, शेतकरी बचतगट, महिला शेतकरी, युवक, उद्योजक, महिला बचतगट व विविध कार्यकारी संस्था अर्ज करू शकतात याचे प्रामुख्याने दोन भाग पडतात १) वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी

1. वैयक्तिक लाभार्थी

वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतीशील शेतकरी हे योजनेसाठी पात्र ठरतात. शिक्षणाची अट नाही.
१० टक्के भांडवल गुंतवण्याची क्षमता असावी. भाडोत्री पद्धतीने जागा देण्याची तयारी असावी.

2. गट लाभार्थी

शेतकरी उत्पादक गट / कंपनी संस्था स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था इत्यादी योजनेसाठी पात्र ठरु शकतात. १० टक्के भांडवल गुंतवणूकीची ताकद आणि बँकेचे हप्ते नियमित फेड करण्याची क्षमता असावी.

PMFME Scheme आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • आठवी पास शैक्षणिक अहर्ता
 • जागेचा करार
 • इलेक्ट्रिक बिल
 • ना हरकत प्रमाणपत्र
 • कोटेशन
 • सहा महिन्याच्या बँक स्टेटमेंट
 • उद्योग आधार
 • प्रकल्प अहवाल
 • FSSAI प्रमाणपत्र
 • बँक पासबुक
हेही वाचा: Sharad Pawar Gram Samridhi Yojana | सरकार देताय १००% अनुदान | गाय व म्हैशी, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड बांधा पक्के

PMFME Scheme निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी

 • प्रकल्प अहवाल
 • जागेची पाहणी
 • वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे
 • जिल्हा संशोधन व्यक्ती तसेच बँकेद्वारे प्रकल्पाशी निगडित बाबींची पूर्ण तपासणी करण्यात येते
 • त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय समितीच्या वतीने जिल्हा नोडल अधिकारी सर्व तपासणी करतात
तपशीलस्पष्टीकरण
ऑनलाईन सुविधा आहे काहोय
असल्यास सदर लिंकwww.pmfme.mofpi.gov.in
आवश्यक शुल्कनाही
निर्णय घेणारे अधिकारीतालुका कृषि अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधीकालावधी निश्चित केलेला नाही
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंकhttps://grievances.maharashtra.gov.in/
कार्यालयाचा पत्तातालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सादर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कालवा. येथे क्लिक करून आले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

 • शेती पूरक व्यवसाय यादी

  कोर्स overview कोर्स कोणी जॉईन करावा? कोर्सचे फायदे रूपरेषा शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने…

 • efarmwala.com

  शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने बाजारात शेळीचे दूध व मांस याला मोट्या प्रमाणात मागणी वाढत…

 • Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

  Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

  SC, ST किंवा महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून अर्थ साहाय्य व्हावं यासाठी Stand Up India योजना राबवण्यात येत आहे. Stand Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य करणारी योजना. Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट 10 लाख ते 1 कोटी पर्यंतचे बँक कर्ज किमान एक अनुसूचित जाती,…