शास्वत उत्पन्न मिळवून देणार रेशीम शेती व्यवसाय | Reshim Sheti Vyavsay Yojana Mahiti aani Anudan

Table of Contents

शेतीमध्ये रेशीम शेती व्यवसाय | Reshim Sheti Vyavsay शिवाय अवघ्या 14 दिवसांत उत्पन्न देणारे आज एकही नगदी पीक नाही. सुशिक्षीत बेरोजगारांना नोकऱ्यां शिवाय यात दरमहा उत्पन्न मिळविता येते. तसेच महिन्यात रविवारप्रमाणे चार दिवस सुट्टी उपभोगता येते. इतर शेती पिकां प्रमाणे यात पूर्ण व मोठया प्रमाणात नुकसान होत नाही. शेतकऱ्यांच्या कोश खरेदीची हमी शासनाने घेतलेली असून त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकणी कोश खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सदर कोश खरेदी ही शास्त्रीय पध्दतीने होत असून त्याचा दर रु. 650/- ते रु.1300/- प्रती कि आहे.

Reshim Sheti Vyavsay

रेशीम शेती व्यवसाय Reshim Sheti Vyavsay काय आहे व कसा करावा?

दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच रेशीम शेती व्यवसाय Reshim Sheti Vyavsay हा शेतीसपूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठया प्रमाणात करता येतो.

घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून घेता येतो. शेतकऱ्यास कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते. पक्का माल खरेदीसाठी शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे. तुती लागवड, निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पान्नात वाढ होते. Reshim Sheti Vyavsay

पट्टा पध्दतीस अत्यंत कमी पाणी लागते. एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात 3 एकर तुती जोपासता येते. तुतीची लागवड एकदा केल्यानंतर 15 वर्षे पर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकां प्रमाणे वारंवार येत नाही.

तुतीस एप्रिल, मे, महिन्यात पाणी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. पाणी मिळाल्यानंतर तुती पुन्हा जोमाने वाढते. यामुळे आठमाही पाण्याची सोय असलेल्या शेतकयांस देखील हा व्यवसाय करता येतो. कमीत कमी बागायत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांपासून तो जास्तीत जास्त बागायत क्षेत्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो.

दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन यासारखे शेतीपूरक व्यवसाय व ऊस, द्राक्षे यासारखी नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यास देखील हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो. पट्टा पध्दतीने तुतीची आंतरमशागत मजूंराएवजी अवजाराने कमी खर्चात व कमी वेळेत वेळेवर करुन घेता येते.

यामुळे मजूरी खर्चात व वेळेत मोठया प्रमाणात बचत होते. पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती शेतीत इतर आंतरपिके घेवून उत्पन्नात भर घालता येते. तुती बागेस रोग व किटक यांचा प्रार्दुभाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. रेशीम अळयांची अंडीपुंज सवलतीच्या दराने 450 टक्के अनुदान दरात शासना मार्फत पुरवली जातात. रेशीम अळयांचे एकूण 28 दिवसांचे आयुष्यमान असते.

त्यातील 24 दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो. या 24 दिवसांपैक सुरवातीचे 10 दिवस शासना मार्फत वाजवी दराने रेशीम किटक जोपासून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांस अवघ्या 14 दिवसांत कोश उत्पादनाचे पीक घेता येते. यामुळे शेतकऱ्याचा वेळ, श्रम व पैसा वाचतो तसेच एकूण उत्पादनात 25 टक्के पर्यंत वाढ होते.

PM Kisan सन्मान निधीच्या 14th installment | या शेतकऱ्यांना मिळणार नाही PM Kisan सन्मान निधी योजनेच्या 14 वा हप्ता

लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

रेशीम उद्योग । Reshim udyog in marathi । रेशीम शेती यशोगाथा | Success Story

PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

रेशीम शेती व्यवसायाचे (Reshim Sheti Vyavsay) फायदे:

 1. रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून 1 ते दीड लिटर दूध वाढते.
 2. वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.
 3. तुतीच्या वाळलेल्या इंधन म्हणून वापरता येतात. तसेच खत म्हणून सुध्दा वापरता येते.
 4. संगोपनाक वापरलेल्या चोथा करुन त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.
 5. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.
 6. तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे एकरी रु 3500/- ते 4500/- जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.
 7. तुतीच्या पानांमध्ये व ये जीवनसत्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दश्ष्टया महत्वाचा आहे.
 8. विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.
 9. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.
Reshim Sheti Vyavsay

ड्रोनच्या किमतीच्या 100% दराने आर्थिक सहाय्य | 100% subsidy on drones for farmers?

Reshim Sheti Vyavsay विभामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि अनुदान

अ.न.योजनाअनुदानसंपर्क कार्यालय
1महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाप्रति एकर तुती लागिडीसाठी ₹2.24 लक्ष इतके अनुदान तीन वर्षात विभागून दिले जाते व कटक संगोपन गृह (1000 चौ. फुट) बांधकामासाठी ₹0..99 लक्ष असे एकुण ₹3.23 लक्ष इतके रक्कम अनुदान देण्यात येत आहे.जिल्हा रेशीम कार्यालय
2केंद्र पुरस्कृत – केंद्रीय रेशीम मंडळ, बेंगलोर यांच्याकडील सिल्क समग्र योजना1. तुती लागवड – ₹0.38 लक्ष प्रति एकर
2. किटक संगोपन साहित्य – ₹0.45 लक्ष
3. किटक संगोपनगृह बांधकाम (1000 स्वे.फु) –
₹1.26 लक्ष
4. मल्टीएंड रिलींग युनिट – ₹12.56 लक्ष
5. अटोमॅटीक रिलींग युनिट (200 एन्डस) –
₹57.62 लक्ष
6. अटोमॅटीक रिलींग युनिट (400 एन्डस) – ₹92.04 लक्ष
7. व्टिस्टींग मशिन – ₹7.53 लक्ष वितसेटिंग
जिल्हा रेशीम कार्यालय
3जिल्हा वार्षिक योजनाजिल्हास्तरीय योजने अंतर्गत खालीलप्रमाणे रेशीम विस्तार व विकासात्मक बाबींचा समावेश आहे.
1. बेणे पुरवठा ₹1500 प्रति टन व वाहतूक खर्च (तुती)
2. अंडीपुंज पुरवठा 75% अनुदान (तुती / टसर )
3. शेतकरी प्रशिक्षण ₹1000/- प्रति लाभार्थी (तुती/ टसर)
4. शेतकरी अभ्यास दौरा ₹100/- व प्रवास खर्च – (तुती /टसर)
5. रेशीम उद्योग प्रचार व प्रसिद्धी ₹50,000/- (वार्षिक प्रति जिल्हा)
6. तुती रोपे खरेदी – ₹0.50/- प्रति नग
7. शासकीय फार्म व रिलींग केंद्र देखभाल व दुरुस्ती खर्च (तुती/ टसर)
8. शासकीय अंडीपुंज निर्मीती केंद्र अंतर्गत खर्च (तुती/टसर)
9. कोष उत्पादनांवर प्रोत्साहनात्मक अनुदान – सी.बी. वाणासाठी ₹30/- प्रति किलो व बायव्होल्टाईन वाणासाठी ₹50/- प्रति किलो प्रमाणे अनुदान.
10. रेशीम धागा उत्पादनांवर प्रोत्साहनात्मक अनुदान अॅटोमॅटीक रिलींग मशिनवर सूत उत्पादनासाठी ₹150/- व मल्टीएंड रिलींग मशिनवर सूत उत्पादनासाठी ₹100/- प्रति किलो प्रमाणे तसेच टसर रिल्ड यान उत्पादनासाठी ₹100/- प्रति किलो प्रमाणे अनुदान देण्यात येत आहे.
जिल्हा रेशीम कार्यालय
4नानाजी देशमुख कृषी सांजीवनी (पोकरा) प्रकल्पाअंतर्गत रेशीम उद्योग योजनानानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत जिल्हयातील निवडक गांवामध्ये सर्वसाधारण आणि अनु.जाती, अनु.जमाती लाभार्थीना एक एकरासाठी खालील प्रमाणे अनुदान योजना आहे.
तुती रोपे तयार करण्यासाठी सहाय्य 112500/- (अ.जाती/अ.जमाती) (सर्वसाधारण) / ₹112500/-
तुती लागवड विकास कार्यक्रम – ₹37500/- (सर्वसाधारण) / ₹45000/-
(अ.जाती/अ.जमाती)
किटक संगोपन साहीत्य पुरवठा सहाय्य ₹56250/- (सर्वसाधारण) / ₹67500/-
(अ.जाती/अ.जमाती)
किटक संगोपन गृह बांधकाम सहाय्य अ) (1000 चौ.फुट) – *126479/- (सर्वसाधारण) / ₹151775/- (अ.जाती/अ.जमाती) किंवा – (सर्वसाधारण) / ₹85677/- (अ.जाती/अ.जमाती)
ब) (600 चौ. फुट) – *71397/-
जिल्हा रेशीम कार्यालय

कुक्कुट पालन व्यवसाय संपूर्ण माहिती | जो करेल कुक्कूटपालन, त्याचे घरी खेळेल चलन!!

Reshim Sheti Vyavsay व्यवसाय अर्ज कुठे करावा?

संबंधीत जिल्हा रेशीम कार्यालय प्रमुखाशी संपर्क साधुन ऑनलाईन तुती व टसर लागवडीसाठी अर्ज करून ₹500/- फी भरावी.

Reshim Sheti Vyavsay अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे कोणती?

 • अर्जासोबत जमीनीचा 7/12, 8-अ
 • आधारकार्ड
 • मनरेगा जॉबकार्ड
 • राष्ट्रीयकृत खाते पासबुकच्या बँक खाते पहिल्या पानाची छायाप्रत
 • फोटो
 • जात वर्गवारी
 • व इतर आवश्यक कागदपत्रे जोडण्यात यावीत

Reshim Sheti Vyavsay अनुदान कशे मिळते?

 • इच्छुक लाभार्थीने घटकांतर्गत बाबींचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करावा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत
 • पूर्वसंमती मिळाल्यापासून तुती लागवड, प्रकल्प उभारणी पूर्ण करून ६० दिवसात ऑनलाईन अनुदान मागणी करावी
 • निवडलेल्या लाभार्थीने ग्राम स्तरावर गठीत खरेदी समितीच्या उपस्थितीत रेशीम उद्योगासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करावी
 • रेशीम उद्योग या घटकांतर्गत अनुदान मिळणेसाठी ऑनलाईन मागणी करावी. सोबत खरेदी देयकांच्या मूळप्रती व खरेदी समितीचे प्रमाणपत्र लाभार्थ्याने स्व:साक्षांकीत करुन ऑनलाईन अपलोड कराव्यात
 • लाभार्थ्याने सदर व्यवसाय किमान ३ वर्षे करणे आवश्यक आहे
 • झालेल्या कामानुसार व पात्रतेनुसार अनुदान थेट लाभार्थीना DBT द्वारे थेट बँक खात्यात देण्यात येते

रेशीम शेती विभामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि अनुदान.pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

रेशीम शेती योजना GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

रेशीम शेती योजना अनुदान मागणी अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सादर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कळवा.