शबरी घरकुल योजना | Shabari Gharkul Yojana

शबरी घरकुल योजना (Shabari Gharkul Yojana) संदर्भात सुधारित GR राज्य शासनाने 8 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केला आहे. राज्य सरकारने या जीआर मध्ये शबरी घरकुल योजनेच्या नियमावली, पात्रता शर्यती, लागणारी कागदपत्रे यामध्ये काही बदल केले आहेत त्या बद्दलची माहिती आपण या लेखात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Shabari Gharkul Yojana

मित्रानो राज्यात राबवली जाणारी महत्वाची अशी शबरी आवास योजना म्हणजेच Shabari Gharkul Yojana संदर्भात सुधारित GR राज्य शासनाने 8 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केला आहे. राज्य सरकारने या GR मध्ये Shabari Gharkul योजनेच्या नियम, अटी, कागदपत्रे यामध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत त्या संदर्भात आपण या लेखात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Shabari Gharkul Yojana हि योजना 2013 पासून राज्यात सुरु असून या योजनेच्या लाभ संदर्भात ठराविक अर्जाचा नमुना उपलब्ध नसल्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळा नमुना अर्ज व अर्जदार वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज करत असल्याने बहुतेक अर्जदाराचे अर्ज नाकारले जात होते. शबरी घरकुल योजने संदर्भात ठराविक अश्या कागद पात्रांची यादी नसल्यानेही वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी कागदपत्रे मागितली जात होती.

या पार्श्वभूमीवर शबरी घरकुल योजनेत सुसूत्रता आणण्यासाठी आणि संपूर्ण राज्यभर लाभार्थी अर्जदाराला विहित नमुन्यात अर्ज उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासनाने काही महत्वाचे बदल करून हा नवीन GR निर्गमित केला आहे. GR सोबत जोडलेला अर्ज आणि कागदपत्रे यादी व्यतिरिक्त कोणतेही आनी मागणी अर्जदाराकडे कडू नये अशी माहितीही समंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे.

हेही वाचा: Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

हेही वाचा: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नक्की हप्ता कधी मिळणार

नवीन शासन GR मध्ये काय आहे?

Shabari Gharkul Yojana

१) राज्यातील ज्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांची घरे कुडा- मातीची आहेत किंवा अनुसूचित जमातीची जी कुटुंबे बेघर आहेत अशा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी वाचा येथील दि. 28/03/2013 च्या शासन निर्णयान्वये सन २०१३ पासून “शबरी आदिवासी घरकुल योजना” राज्यात राबविण्यात येत आहे. सदर शासन निर्णयामध्ये Shabari Gharkul Yojana योजनेसाठी अर्जदाराने सादर करावयाच्या कागदपत्राबाबत नमूद केलेले आहे. सदर योजनेसाठी अर्ज करतांना अर्जाचा विहित नमुना नमूद नाही. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून वेगवेगळ्या नमुन्यामध्ये अर्जदारांकडून अर्जाची व वेगवेगळ्या कादपत्रांची मागणी करण्यात येते.

२) त्यामुळे वाचा येथील शासन निर्णयात नमूद केलेल्या कागदपत्रांऐवजी शबरी आदिवासी घरकूल योजनेसाठी सोबत जोडलेल्या परिशिष्टामधील अर्जाचा नमुना व त्यामध्ये नमूद केलेली कागदपत्रे विहित करण्यात येत असून त्यानुसार अर्ज व कागदपत्रे अर्जदाराकडून घेण्यात यावीत. याव्यतिरिक्त अन्य कागदपत्रांची मागणी अर्जदारांकडे करु नये. अर्जदाराने अर्जाचा नमुना साध्या को-या कागदावर लिखित भरुन सादर केल्यास तो स्विकारण्यात यावा. यासाठी छापील अर्जाचा आग्रह धरण्यात येऊ नये. सदर अर्ज व कागदपत्रे ही आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणा-या सर्व घरकूल (ग्रामीण) योजनांसाठी लागू राहील.

३) सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२३०९०८१७०४४८१४२४ असा आहे.

हेही वाचा: Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

हेही वाचा: 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

Shabari Gharkul Yojana

शबरी घरकुल योजना अर्ज करताना लागणारी माहिती

अर्जदाराने शबरी घरकुल योजने अंतर्गत घरकुल मिळणे बाबत या विषय खाली प्रति प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे अर्ज सादर करायचा आहे.

अर्जदाराचे संपूर्ण नाव, फोटो, संपूर्ण पत्ता, आधार क्र, शिधापत्रिका क्र., बैंक खाते तपशिल, बँकेचे नाव व खाते क्र., जन्म दिनांक, वय, जमात, लिंग, विवाहीत / अविवाहीत, विवाहीत असल्यास अपत्य संख्या, कुटुंबातील व्यक्तींची संख्या म्हणजेच किती महिला, किती पुरुष, योजनेचे नाव / मागणी, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न, उत्पन्नाचे साधन: शेती कि व्यवसाय, स्वतःच्या मालकीची जागा आहे काय ? होय / नाही,

अर्जदार पुढीलपैकी आहे काय प्रकारात मोडतो आहे काय भूमीहीन, विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा जातीय दंगलीमध्ये नुकसान झालेले अ‍ॅट्रॉसिटी कायद्या नुसार पिडित झालेल्या अनुसूचित जमातीच्या पात्र व्यक्ती प्रकल्पग्रस्त आहे काय?

हि आणि याप्रकारची अर्जामध्ये नमूद सर्व माहिती देणे व अर्जासोबत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक तर आहेच सोबत प्रकल्प कार्यालयामार्फत अथवा इतर विभागामार्फत यापूर्वी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे काय ? असल्यास, कोणत्या योजनेचा – योजनेचे नाव, वर्ष हि माहिती व वरीलप्रमाणे देण्यात आलेली माहिती खरी आहे, तपासणी दरम्यान माहिती खोटी आढळून आल्यास, मी स्वतः कायदेशीर कारवाईस जबाबदार राहील. अशी माहिती अर्जात देणे आवश्यक आहे.

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | मनो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

हेही वाचा: भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India

हेही वाचा: म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हेही वाचा: Silage Bail या किमतीने सरकार करणार मुरघास खरेदी

शबरी घरकुल योजना अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे यादी

 • अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
 • अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • जमातीचे प्रमाणपत्र
 • सातबारा उतारा किंवा नमुना ८-अ (घरकूल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी)
 • उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा)
 • ग्रामसभेचा ठराव
 • शिधापत्रिका
 • आधार कार्ड
 • एक रद्द केलेला धनादेश (Cancelled cheque)

शबरी घरकूल योजना नमुना अर्ज साठी येते क्लिक करा.

शबरी घरकुल योजने बद्दलची माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कळवा. 

 • शेती पूरक व्यवसाय यादी

  कोर्स overview कोर्स कोणी जॉईन करावा? कोर्सचे फायदे रूपरेषा शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने…

 • efarmwala.com

  शास्त्रशुद्ध शेळीपालन 3 दिवसीय कार्यशाळा मांस आणि दूध असा दुहेरी उत्पादनातून खातरीशीर आर्थिक नफा मिळवून देणारा शेळीपालन हा फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टितीने पाहून शास्त्रीय पद्धतीने जातिवंत शेळ्या आणि बोकडांचे संगोपन करणे आवश्यक आहे. शेळीच्या दुधात सर्वात जास्त जीवनसत्व व औषधी गुणधर्म आढळत असल्याने बाजारात शेळीचे दूध व मांस याला मोट्या प्रमाणात मागणी वाढत…

 • Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

  Stand-Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य

  SC, ST किंवा महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून अर्थ साहाय्य व्हावं यासाठी Stand Up India योजना राबवण्यात येत आहे. Stand Up India योजना | विना तारण 10 लाख ते 1 करोड आर्थिक साहाय्य करणारी योजना. Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट Stand-Up India योजनेचे उद्दिष्ट 10 लाख ते 1 कोटी पर्यंतचे बँक कर्ज किमान एक अनुसूचित जाती,…

9 thoughts on “शबरी घरकुल योजना | Shabari Gharkul Yojana”

Leave a comment