Sharad Pawar Gram Samridhi Yojana | सरकार देताय १००% अनुदान | गाय व म्हैशी, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड बांधा पक्के

Sharad Pawar Gram Samridhi Yojana

Table of Contents

Sharad Pawar Gram Samridhi Yojana | सरकार देताय १००% अनुदान | गाय व म्हैशी, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड बांधा पक्के

Sharad Pawar Gram Samridhi Yojana | सरकार देताय १००% अनुदान | गाय व म्हैशी, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड बांधा पक्के योजने अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत “Sharad Pawar Gram Samridhi Yojana” अंतर्गत जनावरांचा गोठा बांधणे, शेळी पालन शेड बांधणे व कुक्कूटपालन शेड बांधणे यापैकी एक काम एका लाभार्थ्यास मंजूर करून प्रत्यके लाभार्थी पातळीवर मग्रारोहयो अंतर्गत अनुज्ञेय कामे १) वैयक्तिक क्षेत्रावर वृक्ष लागवड व संगोपन (३ वर्ष १ हेक्टर) (कोणतेही वृक्ष किवा विविध वृक्षांचे मिश्रण ), २) वैयक्तिक शेततळे १५X१५X१५ मी चे लाभ घेतलेले लाभार्थी, ३) सार्वजनिक क्षेत्रावर व रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड संगोपन कामे (किमान २०० झाडे चा एक गट संगोपन करणारे कुटुंब), ४) कंपोस्ट बडींग चे लाभ घेतलेले लाभार्थी, तसेच योजनेंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये नरेगा अंतर्गत २७५ वैयक्तिक व सार्वजनिक कामापैकी ज्या कामामध्ये अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त आहे. अशा सर्व कामाच्या संयोजनातून ६०:४० चे अकुशल कुशल प्रमाण राखण्याचा प्रयत्न करणारे सर्व कुटुंब / लाभार्थी / मजुर हे लाभ घेण्यास पात्र राहतील.

त्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णयान्वये शासने दिलेल्या नियम व अटीनुसार ग्रामपंचायत मधील खालील लाभार्थी कुटुंब यांनी योजने अंतर्गत कामाच्या संयोजनातून ६०:४० चे अकुशल कुशल प्रमाण राखण्याकरीता योजने अंतर्गत काम करावयाचे आहे

हेही वाचा: 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

हेही वाचा: नोकरी करावी की शेती?

हेही वाचा: Remedy to get cow buffalo on the heat | गाय म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

शासन निर्णय

महात्मा गाांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतगणत काही योजनाांच्या सांयोजनातून “Sharad Pawar Gram Samridhi Yojana” राज्य योजना राबववण्यास शासन मान्यता देत आहे.

ग्रामीण भागातील कामाची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभाथ्यायाला “Sharad Pawar Gram Samridhi Yojana” अंतर्गत खालील नमूद केलेल्या ३ वैयक्तिक कामाांना सवोत्तम प्राधान्य क्रमाने सर्व ग्रामपांचायत क्षेत्रात राबववण्यात यावे असा निर्णय शासनाने दिलेला आहे.

अ.न.योजनाअकुशल खर्चकुशल खर्चएकूण खर्चअनुदान
१.गाय व म्हैशी करता पक्का गोठा बाांधणेरु. ६,१८८रु. ७१,०००रु. ७७,१८८१००%
२.शेळीपालन शेड बाांधणेरु. ४,२८४रु. ४५,०००रु. ४९,२८४१००%
३.कुक्कुट पालन शेड बाांधणेरु. ४७००रु. ४५०००रु. ४९७६०१००%

१. गाय व म्हैशी करता पक्का गोठा बाांधणे

सध्याच्या स्थितीला गोठयातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावराांपासून मिळणारे मौल्यवान मूत्र व शेण याांचा साठवण करता न आल्यामुळे ते मोठया प्रमाणावर वाया जाते. जनावराांचे मूत्र व शेण हे एक उत्कृष्ट्ठ प्रकारचे सेंद्रीय खत असल्याने जनावराांच्या गोठयातील जागा ही सिमेंट काँक्रीट चा वापर करुन पक्क्या स्वरुपात सपाटीकरण केल्यास जनावराांपासून मिळणारे मूत्र व शेण गोठयाशेजारील खडडयामध्ये एकत्र जमा करुन त्याचा शेतजमिनीची सुवपकता व उत्पादन क्षमता वाढववण्यासाठी उपयोग करुन घेता येईल यासाठी “Sharad Pawar Gram Samridhi Yojana” योजने अंतर्गत गाय व म्हैशी करता पक्का गोठा बाांधणे या वैयक्तिक लाभाच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.

राष्ट्रीय पशुधन मिशन | वैरण विकास योजना | पडीक जमिनीत वैरण लावायला १००% अनुदान | Apply Now
रेशीम उद्योग । Reshim udyog in marathi । रेशीम शेती यशोगाथा | Success Story

Sharad Pawar Gram Samridhi Yojana” अंतर्गत ६ गुराांकवरता २६.९५ चौ.मी. जमीन पुरेशी आहे. तसेच त्याची लाांबी ७.७ मी. व रुंदी 3.5 मी. असावी, गव्हाण ७.७ मी. X ०.२ मी. X ०.६५ मी. आणि २५० लिटर क्षमतेचे मूत्रसांचय टाकी बांधावी लागेल. तसेच जनावराांना पिण्याच्या पाण्यासाठी २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधणे आवश्यक आहे. सदर कामाचा लाभ मिळवण्याकरिता मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या आवश्यकते नुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणारे लाभार्थी पात्र असतील. गोठयाांच्या प्रस्तावासोबत जनावराांचे टॅगिंग करणे आवश्यक आहे.

अकुशल खर्चरु. ६,१८८प्रमाण ८ टक्के
कुशल खर्चरु. ७१,०००प्रमाण ९२ टक्के
एकूण खर्चरु. ७७,१८८प्रमाण १०० टक्के
गाय व म्हैशी करता पक्का गोठा बाांधणे या कामाला शासन निर्णयाप्रमाणे अंदाजित ७७१८८ रुपये इतका खर्च येईल. त्याचा तपशील वरील प्रमाणे

शासन निर्णयानुसार ६ गुराांसाठीची तरतूद रद्द करुन दोन गुरे ते ६ गुरे कवरता एक गोठा व त्यानांतरच्या अधीकच्या गुराांसाठी ६ च्या पटीत म्हणजेच १२ गुराांसाठी दुप्पट व १८ पेक्षा जास्त गुराांसाठी ३ पट अनुदान येण्यात येईल मात्र ३ पटीपेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.

२. शेळीपालन शेड बाांधणे

“Sharad Pawar Gram Samridhi Yojana” अंतर्गत शेळीपालन शेड बाांधणे ग्रामीण भागामध्ये शेळया – मेंढयापासून मिळणारे शेण, लेंडया व मूत्र यापासून तयार होणाऱ्या उत्कृष्ट्ठ दर्जाच्या सेंद्रीय खताांचा पक्क्या स्वरुपाचे व चाांगले गोठे नसल्याने नाश होतो. शेळया – मेंढयाकरता चाांगल्या प्रतीचे शेड बाांधून दिल्यास या जनावराांचे आरोग्य देखील चाांगले राहणार असून वाया जाणारे मल, मूत्र एकत्र करुन शेतीमध्ये उत्कृष्ट्ठ प्रकारचे सेंद्रीय खत म्हणून वापर करता येईल.

यामुळे शेतीच्या सुवपकतेबरोबरच शेती उत्पादन वाढीवर चाांगला परिणाम होऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी मदत होऊ शकेल.

शासन निर्णया नुसार १० शेळ्यांकरिता ७.५० चौ.मी. निवारा पुरेसा आहे तसेच त्याची लाांबी ३.७५ मी. व रुंदी २.० मी. असावी. तसेच चारही भिंतींची सरासरी उांची २.२० मी. असावी. भिंती १:४ प्रमाण असलेल्या सिमेंट व विटांच्या असाव्यात. छतांच्या लोखांडी तुळयाांचा आधार देण्यात आलेला असावा व छतासाठी सिमेंट पत्रे वापरण्यात यावेत. तळातीळ जमिनीसाठी मुरुम वापरावा. शेळयाांना पिण्यासाठी पाण्याची टाकी बांधणे बंधनकारक आहे. सदर कामाचा लाभ मिळवण्याकरिता मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या आवश्यकते नुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणारे लाभार्थी पात्र असतील. तसेच भूमिहीन (शेती नसलेले) कुटुंबाना प्राधान्य देण्यात येईल.

अकुशल खर्चरु. ४२८४प्रमाण ८ टक्के
कुशल खर्चरु. ४५०००प्रमाण ९२ टक्के
एकूण खर्चरु. ४९२८४प्रमाण १०० टक्के
शेळीपालन शेड बाांधणे या कामाला शासन निर्णयाप्रमाणे अंदाजित ४९२८४ रुपये इतका खर्च येईल. त्याचा तपशील वरील प्रमाणे

तसेच हेही स्पष्ट्ट करण्यात येते की शेळीपालनाच्या शेडसाठी प्रत्येक दहा शेळयाांसाठी एक गट समजण्यात येईल व त्याप्रमाणे परिपत्रकानुसार अनुदान अनुज्ञेय करण्यात येईल तसेच, ज्या लाभार्थ्याकडे १० पेक्षा अधीक शेळया असतील त्याांना शेळयाांसाठीचे दोन गट लक्षात घेवून दोन पट अनुदान देण्यात येईल. मात्र एका कुटुंबास जास्तीत जास्त ३० शेळयाांकवरता तीन पट अनुदान मांजूरी देण्यात येईल.

ड्रोनच्या किमतीच्या 100% दराने आर्थिक सहाय्य | 100% subsidy on drones for farmers?

३. कुक्कुट पालन शेड बांधणे

“Sharad Pawar Gram Samridhi Yojana” अंतर्गत ग्रामीण भागातील परसातील कुक्कूट पालनामुळे ग्रामीण भागातील कुटूांबाना पूरक उत्पादनाबरोबरच आवश्यक पोषक प्राणीजन्य प्रावर्थनाांचा पुरवठा होतो. खेडयामध्ये कोंबड्याना चाांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध नसतो. त्यामुळे त्याांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. कोंबड्याना उन, पाऊस, परभक्षी जनावरे व वारांवार येणाऱ्या आजाराांपासून सरांक्षण करण्यासाठी चाांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. चाांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्या वेळी त्याांचे, पिल्लांचे व अंड्यांचे परभक्षी प्राण्याांपासून सरांक्षण होण्यास मदत होईल.
सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या नियमानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी लाभ घेऊ शकतील. तसेच भूमिहीन (शेती नसलेले) कुटूांबाना प्राधान्य देण्यात येईल.

१०० पक्षयाांकवरता ७.५० चौ.मी. निवारा पुरेसा आहे तसेच त्याची लाांबी ३.७५ मी. व रुंदी २.० मी.असावी. लाांबीकडील बाजूस ३० सेमी उंची व २० सेमी जाडीची, विठांची ज्योत्यापर्यंत भिंत असावी. तसेच छतापयंत कोंबड्यांची जाळी ३० सेमी X ३० सेमीच्या खाांबानी आधार दिलेली असावी. तसेच आखूड बाजूस २० सेमी जाडीची सरासरी २.२० मीटर उांचीची भिंत असावी. छतास लोखांडी तुळयाांचा आधार द्यावा. छतासाठी सिमेंट पत्रे वापरावेत. कोंबड्याना पिण्याच्या पाण्याची सोया असावी.

अकुशल खर्चरु. ४७६०प्रमाण १० टक्के
कुशल खर्चरु. ४५०००प्रमाण ९ टक्के
एकूण खर्चरु. ४९७६०प्रमाण १०० टक्के
कुक्कुट पालन शेड बांधणे या कामाला शासन निर्णयाप्रमाणे अंदाजित ४९७६० रुपये इतका खर्च येईल. त्याचा तपशील वरील प्रमाणे

जरी शेड १०० पक्ष्यांकरिता पात्र करण्यात आले असले तरीही सदर शेडमध्ये १५० पक्षी सामावू शकतात. त्यामुळे १०० पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या १५० च्या वर नेल्यास सदर लाभार्थ्यास मोठ्या शेडसाठी दोनपट निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तथापि, कोणत्याही कुटुंबास दोनपट पेक्षा अधीक निधी अनुज्ञेय राहणार नाही. अन्य तरतूदी उपरोक्त परिपत्रकानुसार राहतील.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana anudan
Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2.0 | पडीक जमिनीतून कमवा १२५००० | दर वर्षी ३% वाढ

Sharad Pawar Gram Samridhi Yojana आवश्यक कागदपत्रे

१. पशुपालक असलेबाबत पशुधन पर्यवेक्षक / पशुधन अधिकारी यांचा दाखला
२. कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र Online जॉबकार्ड किवा जॉबकार्ड झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.
३. लाभार्थीच्या नावे जमीन / जागा असणे आवश्यक आहे.
४. लाभार्थी सदर गावाचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
५. लाभार्थी आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
६. लाभार्थीचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक असणे आवश्यक आहे.
७. सदरचे काम ग्रामपंचायत वार्षिक कृती आराखडा / लेबर बजेट सन २०२२- २०२३ मध्ये नाव समाविष्ट असलेबाबत ग्रामपंचायतचे प्राधान्य क्र. नुसार शिफारस पत्र घेणे आवश्यक आहे.
८. निवडलेल्या कामाचा / जागेचा अक्षांश-रेखांश असलेला फोटो सह ग्रामसेवक, तांत्रिक सहाय्यक
(नरेगा) / पशुधन पर्यवेक्षक, लाभार्थी यांची संयुक्त सहीचा स्थळ पहाणी अहवाल जोडणे आवश्यक आहे.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana अर्ज कुठे व कशे करावेत?

अर्ज हे ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येतात

१. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी या https://ahd.maharashtra.gov.in/ संकेतस्थळाला भेट द्या.

२. अ) ऑफलाइन पद्धतीने करण्यासाठी यथे क्लिक करून जोडलेला प्रस्थाव अर्जाची PDF डाउनलोड करा.

ब) सदर प्रस्थाव अर्ज भरून सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून ग्रामसेवक किंवा पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करावेत

सादर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश कंमेंट मध्ये नक्की कालवा. येथे क्लिक करून आले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

2 thoughts on “Sharad Pawar Gram Samridhi Yojana | सरकार देताय १००% अनुदान | गाय व म्हैशी, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड बांधा पक्के”

Leave a comment