Side effects of Pesticides and Herbicides | शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ? कीटकनाशक व तणनाशक बॉटल वरील या चिन्हांचा अर्थ काय होतो?

Side effects of Pesticides and Herbicides

Table of Contents

भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्या हे शेतीवर अवलंबून आहे. शेती करत असताना मोठ्या प्रमाणात कीटकनाशक व तणनाशक यांचा वापर केला जातो. पण यापैकी बहुतांश शेतकऱ्यांना कीटकनाशक व तणनाशक पॅकिंग वर दाखवल्या जाणाऱ्या चेतावणी चिन्हा कडे लक्षच नसते. Side effects of Pesticides and Herbicides शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ? कीटकनाशक व तणनाशक बॉटल वरील या चिन्हांचा अर्थ काय होतो? हे कोणत्याही शेतकऱ्याला सांगता येणार नाही. पण याच चिन्हांमुळे शेतकऱ्याचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. कीटकनाशक व तणनाशक यांच्या प्रधुरभावामुळे शेतकऱ्यानं मध्ये वेगवेळ्या प्रकारचे आजार वाढत चालले आहेत. याच कीटकनाशक व तणनाशकामुळे मुर्त्यूमुखी पडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हि मोती आहे. या कीटकनाशक व तणनाशक पॅकिंग वर दाखवल्या जाणाऱ्या चेतावणी चिन्हाची गोग्य माहिती नसल्याने हे प्रकार घडत आहेत. कीटकनाशक व तणनाशक फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. कीटकनाशक व तणनाशक होणारे दुष्परिणाम व उपाययोजना आपण या लेखात पुढे जाणून घेणार आहोत. लेख पूण वाचा हि विनंती.

PM KISAN & NAMO SHETKARI योजनेचा हप्ता आज जमा झाला? | राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंढे यांची मोठी घोषणा

भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्या हे शेतीवर अवलंबून आहे. शेती करत असताना मोठ्या प्रमाणात कीटकनाशक व तणनाशक यांचा वापर केला जातो. पण यापैकी बहुतांश शेतकऱ्यांना कीटकनाशक व तणनाशक पॅकिंग वर दाखवल्या जाणाऱ्या चेतावणी चिन्हा कडे लक्षच नसते. Side effects of Pesticides and Herbicides शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ? कीटकनाशक व तणनाशक बॉटल वरील या चिन्हांचा अर्थ काय होतो? हे कोणत्याही शेतकऱ्याला सांगता येणार नाही. पण याच चिन्हांमुळे शेतकऱ्याचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. कीटकनाशक व तणनाशक यांच्या प्रधुरभावामुळे शेतकऱ्यानं मध्ये वेगवेळ्या प्रकारचे आजार वाढत चालले आहेत. याच कीटकनाशक व तणनाशकामुळे मुर्त्यूमुखी पडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हि मोती आहे. या कीटकनाशक व तणनाशक पॅकिंग वर दाखवल्या जाणाऱ्या चेतावणी चिन्हाची गोग्य माहिती नसल्याने हे प्रकार घडत आहेत. कीटकनाशक व तणनाशक फवारणी करत असताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. कीटकनाशक व तणनाशक होणारे दुष्परिणाम व उपाययोजना आपण या लेखात पुढे जाणून घेणार आहोत. लेख पूण वाचा हि विनंती.

हेही वाचा:- शास्वत उत्पन्न मिळवून देणार रेशीम शेती व्यवसाय | Reshim Sheti Vyavsay Yojana Mahiti aani Anudan

कीटकनाशक व तणनाशक उत्पादनावरील चिन्हांचा अर्थ काय?

चिन्हचिन्हाचा रंगतपशील
Red toxicityलालअति जास्त विषारी
Yellow toxicityपिवळाजास्त विषारी
Blue toxicityनिळाविषारी
Green toxicityहिरवाकमी विषारी

हेही वाचा:- PMFME Scheme Apply Online Now | व्यवसायला सरकार देताय १० लाख अनुदान

Side effects of Pesticides and Herbicides | कीटकनाशक व तणनाशक प्राधूरभावापासून वाचण्यासाठी मार्गदर्शक सूचना

खरेदी करताना हे कराखरेदी करताना हे करु नका
• वैध परवाना असलेल्या नोंदणीकृ त कीटकनाशक ववक्रे तयाांकडूनच कीटकनाशके खरेदी करा
• एका विविष्ट क्षेत्रात एका फिारणीसाठी आवश्यक असतील तेिढेच कीटकनाशके खरेदी करा
• कीटकनाशकाांच्या डबा/पकॅेट्सवर मांजरू लेबलेपहा
• लेबलाांवर बॅच क्रमाांक, नोंदणी क्रमाांक, उतपादनाची तारीख/ कालबाह्यता पहा
• डब्यामध्ये/पकॅेटमध्येचाांगलेपकॅ केलेलेवसलबंद कीटकनाशके खरेदी करा
• फू टपाथ ववक्रे तयाांकडून ककवा परवाना नसलेल्या व्यक्तीकडून कीटकनाशके खरेदी करू नका.
• सांपूणण हांगामासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशके खरेदी करू नका.
• डब्यावर मान्यताप्राप्त लेबल नसलेली कीटकनाशके खरेदी करू नका.
• कालबाह्य झालेले कीटकनाशक कधीही खरेदी करू नका.
• सीलबांद नसलेल्या, गळती होत असलेल्या डब्यामधनू /पकॅेटमधनु कीटकनाशके खरेदी करू नका
साठवणुकी दरम्यान हे करासाठवणुकी दरम्यान हे करु नका
• कीटकनाशके घरापासून दूर ठेवा.
• मूळ डब्यामध्ये/पकॅेटमध्ये कीटकनाशके ठेवा.
• कीटकनाशके/तणनाशके स्वतांत्रपणे साठवली पावहजेत.
• जेथे कीटकनाशके साठवली गेली आहेत, ते क्षेत्र चेतावणी चिन्हासह चिन्हांकित केले जावे
• कीटकनाशके मुलाांच्या आवाक्याबाहेर आवण वजवांत साठ्यापासून दूर ठेवावीत
• साठवण वठकाण थेट सूयणप्रकाश आवण पावसापासून चाांगले सांरवक्षत केले पाहिजे
• घराच्या आवारात कधीही कीटकनाशके ठेवू नका
• मूळ डबा/पकॅेटमधील कीटकनाशके दुसऱ्या भांडयामध्येओतनु ठेऊ नका
• तणनाशके कीटकनाशके एकत्र साठवू नका
• मुलाांना जनावरांना साठवणुकीच्या ठीकाणी जाऊ देऊ नका
• कीटकनाशकांना थेट सूर्यप्रकाश लागु नये किंवा ती पावसाच्या पाण्यात जाऊ नयेत यासाठी आवश्यक काळजी घ्या

हेही वाचा:- Soil Testing माती परीक्षण कशासाठी?

हाताळताना हे कराहाताळताना हे करु नका
• वाहतूक करताना कीटकनाशके इतर पदाथांपासनु वेगळे ठेवा
• मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी कीटकनाशके कुशलतेने हाताळावीत
• अन्न/चारा/इतर खाण्यायोग्य वस्तूसोबत कधीही कीटकनाशके बाळगू नका/वाहतूक करू नका
• मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी कीटकनाशके डोक्यावर, खाांद्यावर किंवा पाठीवर वाहुन नेऊ नये
फवारणीचे द्रावण तयार करताना हे कराफवारणीचे द्रावण तयार करताना हे करु नका
• नेहमी स्वच्छ पाणी वापरा
• संपूर्ण शरीर झाकण्यासाठी सांरक्षक कपडे उदा., हातमोजे, फेस मास्क, टोपी, एप्रन, पूर्ण पायघोळ इतयादी वापरा
• स्प्रे द्रावणाच्या गळतीपासून नेहमी तुमचे नाक, डोळे, कान, हात इतयादींचे सांरक्षण करा
• वापरण्यापूर्वी कीटकनाशक डबा/पकॅेटच्या लेबलवरील सूचना काळजीपूवणक वाचा
• आवश्यक तेिढेच द्रावण तयार करा.
• दाणेदार कीटकनाशकाांचा वापर मळु स्वरूपात करावा
• फवारणी टाकी भरताना कीटकनाशकाांच्या द्रावणाची गळती टाळा
• नेहमी शिफारस केलेले कीटकनाशक शिफारस मात्रेप्रमाणे वापरा
• तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल अशी कोणतीही क्रिया करू नये
• गढूळ किंवा साचलेले पाणी वापरू नका
• सांरक्षणातमक कपडे परिधान केल्यावशवाय स्प्रे द्रावण कधीही तयार करू नका
• कीटकनाशक/त्याचे द्रावण शरीराच्या कोणत्याही आववयांवर पडू देऊ नका
• वापरासाठी डबा/पकॅेटच्या लेबलवरील सूचना वाचणे कधीही टाळू नका
• फवारणीचे शिल्लक राहीलेले द्रावण तयार केल्याच्या २४ तासाांनांतर कधीही वापरू नका
• ग्रेन्युल्स पाण्यात वमसळू नका फवारणीच्या टाकीचा वास घेऊ नका
• शिफारशी पेक्षा जास्त मात्रा वापरू नका ज्यामुळे वनस्पती, आरोग्य आणि पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो
• कीटकनाशकाांच्या संपूर्ण ऑपरेशन दरम्यान खाऊ, वपऊ, धुम्रपान किंवा चघळू नका.
उपकरणांची निवड करताना हे कराउपकरणांची निवड करताना हे करु नका
• योग्य प्रकारची उपकरणे निवडा
• योग्य आकाराचे नोझल निवडा
• कीटकनाशके आणि तणनाशकांसाठी स्वतंत्र फवारणी यंत्र वापरा
• गळती किंवा सदोष उपकरणे वापरू नका.
• सदोष / शिफारस नसलेल्या नोझल्स वापरू नका. अडकलेल्या नोझल्स तोंडाने उडवू नका / स्वच्छ करू नका. त्याऐवजी स्प्रेअरने बांधलेला टूथब्रश वापरा.
• तणनाशके आणि कीटकनाशके दोन्हीसाठी एकच फवारणी यंत्र कधीही वापरू नका.

हेही वाचा:- Mushroom Farming मशरूम शेती व्यावसाय

फवारणी करताना हे कराफवारणी करताना हे करु नका
• शिफारस केलेले डोसप्रमाणे द्रावण तयार करा
• फवारणी वातावरण थंड आणि वारा शांत असताना करावी
• फवारणी सर्वसाधारणपणे सूर्यप्रकाशाच्या दिवशी केली पाहिजे
• प्रत्येक फवारणीसाठी शिफारस केलेले स्प्रेअर वापरा
• फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी
• स्प्रे ऑपरेशननंतर, स्प्रेअर आणि बादल्या डिटर्जेंट / साबण वापरून स्वच्छ पाण्याने धुवाव्यात
• फवारणीनंतर ताबडतोब शेतात जनावरे/कामगारांना जाणे टाळावे
• शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त डोस कधीही फवारू नका
• कडक उन्हात किंवा जोरदार वाऱ्याच्या परिस्थितीत फवारणी करू नका
• पाऊस पडण्यापूर्वी आणि पाऊस पडल्यानंतर लगेच फवारणी करू नका
• इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेट फॉर्म्युलेशनचा वापर बॅटरीवर चालणाऱ्या ULV स्प्रेअरने फवारणीसाठी करू नये
• वाऱ्याच्या विरुदध दिशेने फवारणी करू नका
• कीटकनाशके मिसळण्यासाठी वापरण्यात येणारे डबा आणि बादल्या पूर्णपणे धुतल्यानंतरही कधीही घरगुती कारणासाठी वापरू नयेत
• फवारणीनंतर संरक्षणात्मक कपडे घातल्याशिवाय शेतात कधीही प्रवेश करू नका
फवारणी केल्यानंतर हे कराफवारणी केल्यानंतर हे करु नका
• फवारणी नंतर शिल्लक द्रावणाची सुरक्षित नापीक/विलग क्षेत्रामध्ये नेऊन विल्हेवाट लावावी
• वापरलेले/रिकामे डबे / पॅकेट दगड/काठीने ठेचुन पाण्याच्या स्त्रोतांपासून दूर जमिनीत खोल गाडुन टाकावेत
• खाणे / धूम्रपान करण्यापूर्वी हात आणि चेहरा स्वच्छ पाण्याने आणि साबणाने धुवा
• विषबाधाची लक्षणे दिसल्यावर प्रथमोपचार करा तसेच रिकामा डबा/पॅकेट सोबत घेवून डॉक्टरांना दाखवा
• फवारणीचे उरलेले द्रावण तलावात, तलावाजवळ किंवा पाण्यात टाकु नये
• कीटकनाशकांचे रिकामे डबे/पॅकेट इतर वस्तू साठवण्यासाठी पुन्हा वापरू नयेत
• फवारणीनंतर कपडे धुण्यापूर्वी आणि आंघोळ करण्यापूर्वी कधीही खाऊ / धुम्रपान करू नका
• विषबाधाची लक्षणे डॉक्टरांना न दाखवून धोका पत्करू नका कारण त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो

हेही वाचा:- कुक्कुट पालन व्यवसाय संपूर्ण माहिती | जो करेल कुक्कूटपालन, त्याचे घरी खेळेल चलन!!

कीटकनाशक व तणनाशक पोटात गेल्यास बाधित व्यक्तीची घ्यावयाची काळजी

 • कीटकनाशक पोटात गेल्यास किंवा त्वचा, डोके, श्वसनेंद्रिया द्वारे विषबाधा होऊ शकते.
 • व्यक्तीस विषबाधा झाल्यास झाल्यास अपघात स्थानापासून दूर न्यावे. त्याच्या अंगावरील कपडे सैल करून बदलावे.
 • रोग्याचे अंग /बाधित अवयव ताबडतोब साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावे. व कोरड्या टॉवेलने पुसावे.
 • कीटकनाशक पोटात गेलेले असल्यास रोग्याला ताबडतोब ओकारी करण्याची उपाय योजना करावी.
 • रोग्याला पिण्यासाठी बिडी / सिगारेट व तंबाखू देऊ नये.
 • रोग्याला जास्त घाम येत असल्यास कोरड्या टॉवेलने पुसावे व कपडे सैल करावे.
 • रोग्याला थंडी वाजत असल्यास अंगावर पांघरून ध्यावे.
 • रोग्याचा श्वासोच्छ्वास योग्य रीतीने सुरु आहे का ते तपासावे.
 • रोग्याचा श्वासोच्छ्वास अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित रोग्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरु करावा.
 • रोग्याला झटके येत असल्यास त्याच्या दातांमध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी.
 • रोगी बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणावयाचे प्रयत्न करू नये.
 • बेशुद्ध रोग्याला काहीहि खाऊ घालण्याचे प्रयत्न करू नये.
 • रोग्याला त्वरित कीटकनाशकाच्या माहितीपत्रकासह डॉक्टरांकडे घेऊन जावे. डॉक्टरांच्या निगराणीत उपचार करावे.
 • रोगी बरा झाल्यावर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

अधिक माहितीसाठी या https://krishi.maharashtra.gov.in/ संकेतस्थळाला भेट द्या

सादर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश्न कंमेंट मध्ये नक्की कालवा. येथे क्लिक करून आले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.

3 thoughts on “Side effects of Pesticides and Herbicides | शेतकऱ्याच्या जीवाशी खेळ? कीटकनाशक व तणनाशक बॉटल वरील या चिन्हांचा अर्थ काय होतो?”

Leave a comment