Soil Testing माती परीक्षण कशासाठी?

Table of Contents

नमस्कार मंडळी. Soil Testing माती परीक्षण कशासाठी? शेतीतून भरघोस उत्पन्न हवं असेल तर काय हवं ? मुबलक पाणी. बरोबर? पण पाण्यासोबतच उत्तम दर्जाची मातीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. शेतातली माती जर निकृष्ट दर्जाची असेल तर मुबलक पाणी असूनसुद्धा चांगली शेती होणार नाही. त्यामुळे मातीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी आवश्यक आहे Soil Testing माती परीक्षण

Soil Testing माती परीक्षण

नमस्कार मंडळी. शेतीतून भरघोस उत्पन्न हवं असेल तर काय हवं ? मुबलक पाणी. बरोबर? पण पाण्यासोबतच उत्तम दर्जाची मातीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. शेतातली माती जर निकृष्ट दर्जाची असेल तर मुबलक पाणी असूनसुद्धा चांगली शेती होणार नाही. त्यामुळे मातीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

शेतीच्या दृष्टीने माती आणि पाणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही की माती आणि पाण्याचा शेतीच्या दृष्टीने किती जवळचा संबंध आहे. जलधारण क्षमता हा मातीचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. ज्या मातीत जलधारण क्षमता जास्त असते ती माती शेतीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असते.

मग भले पाऊस कमी पडझे किंवा जास्त कसं? तर जेव्हा पाऊस कमी पडतो, ही जलधारण क्षमता जास्त असलेली माती, तिच्यात टिकून राहिलेल्या ओलाव्यामुळे, पिकांना पाणी उपलब्ध करून देते. आणि जेव्हा पाऊस जास्त पडतो, या मातीने शोषून घेतलेल्या, तुलनेत जास्तीच्या पाण्यामुळे, वॉटर लॉगिंगचा धोका टळतो व जमीन चिवड होत नाही.

ही मातीची जलधारण क्षमता मुख्यतः तिच्यातील सेंद्रिय घटकावर अवलंबून असते आणि या सेंद्रिय घटकाचे प्रमाण हे सेंद्रिय कर्ब या युनिटमध्ये मोजले जाते. जितका मातीतील सेंद्रिय कर्ब जास्त तितकी तिची जलधारण क्षमता जास्त. एवढंच नाही तर तितकंच मातीचं आरोग्यही उत्तम आणि पिकांना फायदाही जास्त.

शिवाय सेंद्रिय कर्जासोबतच मातीत नत्र, स्फुरद, पालाश असे अजूनही काही घटक असतात की ज्यांच्यावर मातीची सुपीकता अवलंबून असते. म्हणजे असं म्हणता येईल की आपल्या शेतातल्या मातीत कोणकोणते घटक आहेत आणि ते किती प्रमाणात आहेत, हे जर आपल्याला कळलं तर आपली माती पिकांच्या वाढीच्या दृष्टीने सुदृढ आहे की आजारी आहे, हे ठरवता येईल. आणि हे ठरवण्यासाठी एक सोपा मार्ग म्हणजे Soil Testing माती परीक्षण आणि त्यातूनच आपल्या नापीक मातीला सुपीक करण्याचा मार्ग मिळतो.

त्यासाठी आपल्याला एवढंच करायचं आहे, की आपल्या शेतातील अर्धा किलो मातीचा नमुना एका विशिष्ट पद्धतीने काढायचा आणि माती परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यायचा. साधारण १ महिन्याच्या आत आपल्याला या प्रयोगशाळेतून एक माती ‘परीक्षण अहवाल’ मिळतो, ज्यात आपल्या मातीतील विविध घटकांचं प्रमाण नमूद केलेलं असतं. शिवाय त्या घटकांचं प्रमाण योग्य नसेल तर ते योग्य करण्याच्या शिफारशीसुद्धा लिहिलेल्या असतात. माती परीक्षणासाठी लागणारा खर्च हा अत्यंत कमी असतो.

हेही वाचा: पनवेलचा पोलीस दूधवाला | २० जनावरे १२५ लिटर दूध दर८० रु प्रति लिटर
हेही वाचा: कुक्कुट पालन व्यवसाय संपूर्ण माहिती | जो करेल कुक्कूटपालन, त्याचे घरी खेळेल चलन!!

हेही वाचा: Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal देताय तरुणांना बिनव्याजी कर्ज कमाल मर्यादा 50 लाख

Soil Testing माती परीक्षण कशासाठी?

माती तपासणीचे महत्व व फायदे काय आहेत

 • प्रत्येक पिकाच्या अन्नद्रव्यांची गरज निरनिराळी असते
 • जमिनीत किती अन्नद्रव्ये उपलब्ध आहेत हे माती परिक्षणातून समजते
 • पिकानुसार किती अन्नद्रव्य खताद्वारे द्यायचे याचा निर्णय सुलभ होतो
 • खतांच्या वाढत्या किंमती लक्षात घेता संतुलित खत वापरामुळे आर्थिक बचत होते
 • अति खत व पाण्याच्या अयोग्य वापरामुळे जमिनीची नापीक क्षेत्रात होणारी वाढ टाळली जाते
 • जमिनीतील खारवट, चोपन आणि चुनखडी बाबतच्या समस्यांवर उपचार करता येतात
 • जमिनीच्या सुपिकतेमध्ये संतुलन राखले जाऊन पिक उत्पादनात वाढ होते
हेही वाचा: Talathi Bharti 2023 apply online Now | तलाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | तलाठी भरती ऑनलाईन अर्ज

हेही वाचा: लम्पी आजारामध्ये मृत पशुधनास नुकसान भरपाई | आजच करा असा अर्ज

मातीचा नमुना घेण्याची योग्य पद्धत

soil sampling methods
 • पिक काढल्यानंतर किंवा पेरणीपुर्वी मातीचा नमुना घ्यावा
 • गुरे बसण्याची जागा झाडाखालची जागा, दलदल व घराजवळची जागा तसेच पाण्याच्या पाटाखालील जागेचा नमुना घेण्यात येवू नये
 • शेतामध्ये माती नमुना घेण्याच्या जागा निश्चित कराव्यात
 • सदरच्या ठिकाणी इंग्रजी “व्ही आकाराचा १ मी. चा खड्डा खणावा व त्यातील माती गोळा करावी
 • अशाप्रकारे संबंधित शेतातील चार ते सहा ठिकाणाची माती एकत्र गोळा करून बिग करावा
  मातीच्या ढिगाचे समान चार भाग करावेत. समोरा समोरील दोन भागाची माती काढून टाकावी
 • उर्वरीत मातीचा पुन्हा ढिग करावा. वर नमूद केलेली कृती एक किलो माती शिल्लक असे पर्यंत करावी
 • माती नमुना पिशवीत गोळा करून त्यामध्ये शेतकऱ्याच्या नावाची चिठ्ठी टाकावी
 • चिठ्ठीवर शेतकऱ्याचे नाव, गाव, सर्व्हे / गट नंबर आणि पिकाची माहिती लिहावी
 • माती तपासणीकरीता आपल्या गावाच्या कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा
हेही वाचा: Sharad Pawar Gram Samridhi Yojana | सरकार देताय १००% अनुदान | गाय व म्हैशी, शेळीपालन, कुक्कुटपालन शेड बांधा पक्के

Soil Testing माती परीक्षण प्रयोगशाळा कुठे असते?

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी माती परीक्षण करण्यासाठी शासकीय प्रयोगशाळा असते. आणि जर एखादा शेतकरी जिल्ह्यापासून दूर खेडेगावात राहात असेल तर काळजी करण्याचं कारण नाही. माती तपासणीकरीता आपल्या गावाच्या कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. तालुक्याच्या ठिकाणीही शक्यतो माती परीक्षण करणाऱ्या खाजगी प्रयोगशाळा असतात आणि तिथेसुद्धा माती परीक्षणाचा खर्च हा कुणालाही परवडेल इतका असतो.

Soil Testing माती परीक्षण साठी आपल्याला एवढंच करायचं आहे, की आपल्या शेतातील अर्धा किलो मातीचा नमुना एका विशिष्ट पद्धतीने काढायचा आणि माती परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी द्यायचा. साधारण १ महिन्याच्या आत आपल्याला या प्रयोगशाळेतून एक माती ‘परीक्षण अहवाल’ मिळतो, ज्यात आपल्या मातीतील विविध घटकांचं प्रमाण नमूद केलेलं असतं. शिवाय त्या घटकांचं प्रमाण योग्य नसेल तर ते योग्य करण्याच्या शिफारशीसुद्धा लिहिलेल्या असतात. माती परीक्षणासाठी लागणारा खर्च हा अत्यंत कमी असतो.

Soil Testing माती परीक्षण अधिक माहिती pdf download करण्यासाठी येथे क्लिक करा.

सादर माहिती आपल्या आवडली असेल अशी अशा करतो, आपल्या प्रशक्रिया आणि प्रश कंमेंट मध्ये नक्की कालवा. येथे क्लिक करून आले टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.
पनवेलचा पोलीस दूधवाला | २० जनावरे १२५ लिटर दूध दर८० रु प्रति लिटर