Talathi Bharti 2023 apply online Now | तलाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | तलाठी भरती ऑनलाईन अर्ज

Talathi bharti Jahirat 2023

Talathi Bharti 2023 apply online Now | तलाठी भरती जाहिरात प्रसिद्ध | तलाठी भरती ऑनलाईन अर्ज

हो तुम्ही तलाठी होणारच! जाहिरात आली | पदवीधर आहात असा करा ऑनलाईन अर्ज | Talathi Bharti 2023 apply online

तलाठी भरती ऑनलाइन अर्ज

हेही वाचा: Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग अंतर्गत तलाठी (गट क) एकुण 4644 पदांच्या सरळसेवा भरती. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकुण 36 जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. याबाबतची माहिती आणि जाहिरात जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांनी https://www.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

पदाचे नावविभागएकूण पदेअर्ज करायची पद्दत
तलाठीमहसूल व वन विभाग४६४४ऑनलाईन

हेही वाचा:- Online BhuNaksha Maharashtra | शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन

हेही वाचा: Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

तलाठी पेसा (PESA) म्हणजे काय?

१) पेसा (PESA) क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील तलाठी पदे होय.

२) सदर पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यात येतील.

३) स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार याचा अर्थ “जे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे वैवाहिक साथीदार किंवा ज्यांचे माता पिता किंवा आजी- आजोबा हे दि. २६ जानेवारी १९५० पासून आजपर्यंत संबंधित जिल्हयाच्या अनुसूचित क्षेत्रात सलगपणे राहत आले आहेत, असे अनुसूचित जमातीचे उमेदवार ” असा होय.

४) अनुसूचित जमातीचे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे वैवाहिक साथीदार किंवा ज्यांचे माता पिता किंवा आजी- आजोबा संबंधित जिल्हयाच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये दि. २६ जानेवारी १९५० पासून सातत्याने वास्तव्य करीत आहेत. असे उमेदवार तलाठी (पेसा क्षेत्रातील) पदासाठी अर्ज करू शकतील.

हेही वाचा:- नोकरी करावी की शेती?
हेही वाचा:- दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?
हेही वाचा:- रेशीम उद्योग । Reshim udyog in marathi । रेशीम शेती यशोगाथा | Success Story

ही वाचा:- शास्वत उत्पन्न मिळवून देणार रेशीम शेती व्यवसाय | Reshim Sheti Vyavsay Yojana Mahiti aani Anudan

५) अनुसूचित क्षेत्रातील उमेदवाराकडे अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक (मूळ) रहिवासी असल्याबाबतचा महसूली पुरावा असणे आवश्य आहे. तसेच सदर उमेदवारांनी अंतिम निवड झाल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यापुर्वी त्यांनी अनुसूचित क्षेत्रामधील स्थानिक रहिवासी असल्याबाबत सादर केलेल्या महसूली पुराव्याबाबत पडताळणी केली जाईल. त्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारांना अनुसूचि क्षेत्रात (पेसा) नियुक्ती दिली जाईल.

६) अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य संवर्गाची पदे ही स्वतंत्रपणे दर्शविण्यात आलेली नसून परिशिष्ट -१ मध्ये सामाजिक व समांतर आरक्षणात एकत्रित दर्शविण्यात आलेली आहे.

Talathi Bharti 2023 अर्जदार पद निवडीसाठी खालील कागदपत्रे, अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक

 • तलाठी पदाकरिता उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
 • तलाठी पदाकरिता उमेदवार संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक
 • तलाठी पदाकरिता उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
 • तलाठी पदाकरिता उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयांचा समावेश असणे किंवा एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
 • तलाठी पदाकरिता उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक
 • आरक्षित मागास प्रवर्गातील उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक
 • उमेदवाराला स्वखर्चाने परीक्षेस यावं लागेल

Talathi Bharti 2023 वयोमर्यादा

तलाठी भरती करीता अर्जदाराची वयोमर्यादा गाण्याचा दिनांक १७/०७/२०२३
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयोमर्यादा किमान १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे तर मागासवर्गीय उमेदवाराकरिता किमान १८ वर्षापेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे विविध अराजपत्रित प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी किमान व कमल मर्यादा खालील प्रमाणे

प्रवर्गआवश्यक वयोमर्यादा
खुल्या प्रवगातील उमेदवारांसाठीकिमान १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे
मागासवर्गीय उमदेवारांसाठीकिमान १८ वर्षापेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे
हेही वाचा: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.० | पडीक जमिनीतून कमवा १२५००० | दर वर्षी ३% वाढ

हेही वाचा: Gavaran Kukut Palan | गावरान कुक्कुटपालन रोज रोज 1 लाख अंडी आणि कोटीत कमाई

Talathi Bharti 2023 परीक्षेचे स्वरूप

परिक्षा ही Computer Based Test पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परिक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. (Normalization) बाबत TCS कंपनीकडून देण्यात आलेले सुत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. सदर (Normalization) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकार कराहील. याची सर्व परिक्षार्थी यांनी नोंद घ्यावी.

१) परिक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील.

२) तलाठी पदासाठी पदवी ही कमीत कमी अर्हता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) च्या दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दीक चाचणी या विषयावर प्रश्नाकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकुण २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

३) तरतुदीनुसार तलाठी या पदांकरिता मौखिक परीक्षा (मुलाखती) घेण्यात येणार नाहीत.

४) तलाठी पदासाठी तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकुण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

Talathi bharti exam pattern

Talathi Bharti 2023 जाहिरात pdf पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Talathi Bharti 2023 अर्ज कसा करावा

 • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील
 • उमेदवारास फक्त एकाच जिल्हयासाठीस अर्ज सादर करता येईल. वेगवेगळया जिल्हयात वेगवेगळे अर्ज सादर करता येणार नाहीत. एकापेक्षा जास्त जिल्हयामध्ये अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. तथापि, एखादया उमेदवाराने एकाच जिल्हयात एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केला असल्यास त्यापैकी अंतिम अर्ज सादर केला असेल तोच अर्ज ग्राहय धरण्यात येईल.
 • अर्ज सादर करण्याकरिता संकेतस्थळ :- https://mahabhumi.gov.in अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
talathi bharti 2023 application date
 • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
 • अर्ज भरण्याची व परिक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारिख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंटगेटवे दिलेल्या तारखेला वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज व परिक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
Talathi bharti Exam fee
 • परीक्षा शुल्क हे विना परतावा (not refundable) असेल
 • उमेदवारांना परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्दतीने debit card, credit card, net banking द्वारे भरता येईल

तलाठी भरती 2023 अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या

उमेदवाराने अर्ज सोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे

1) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे PDF फाईल फॉरमॅट मध्ये संलग्न (Upload) करावीत.

2) विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) संलग्न (Upload) करणे अनिवार्य आहे

talathi bharti 2023 required documents

तलाठी भरती 2023 अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या

तलाठी भरती 2023 जाहिरात pdf पाहण्यासाठी इथे क्लिक करा

जिल्हा निहाय पदांचा तपशील pdf पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हेही वाचा: शेतकऱ्याची आकाशाला गवसणी ७ कोटींचे हेलिकॉप्टर केलं खरेदी | डॉ. राजाराम त्रिपाठी