भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India

Table of Contents

भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India. आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा 55% इतका आहे. निकृष्ट प्रतीच्या चारा व वैरणीचे चांगल्या प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीमध्ये अधिक असते सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी सांभाळणे फायदेशीर आहे. म्हणून म्हशींचे संगोपन चांगल्या रितीने व योग्य व्यवस्थापानाने करण्याची गरज आहे.

Top 3 Buffalo Breeds

1) मुन्हा हरियाणा, पंजाब, दिल्ली उत्तर भारतात तसेच महाराष्ट्रातही जात आढळते. शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण 1800 ते 2000 लिटर असते. त्यात गाईच्या दुधापेक्षा स्निग्धाचे प्रमाण जास्त असते. Top 3 Buffalo Breeds

Top 3 Buffalo Breeds

हेही वाचा: म्हैस माजावर येण्यासाठी उपाय

हेही वाचा: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नक्की हप्ता कधी मिळणार

हेही वाचा: Free Cow Dung Collecting Desi Jugaad शेण उचलायची कटकट आता संपली हा जुगाड पाहून थक्क व्हाल

2) मेहसाणा ही जात सुरती व मुऱ्हा जातीच्या संकरापासून निर्माण झाली असून, शरीर वैशिष्ट्ये मुन्हा जातीशी मिळती जुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी 2000 लिटरपर्यंत दूध देतात. Top 3 Buffalo Breeds

top 3 buffalo breeds

हेही वाचा: Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana 2000 हप्ता रखडाला?

हेही वाचा: नोकरी करावी की शेती?

हेही वाचा: Silage Bail या किमतीने सरकार करणार मुरघास खरेदी

हेही वाचा: Abhay Yojana 2023 | 50 लाखांपर्यंतच्या थकबाकीतून व्हा मुक्त!

3) पंढरपुरी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव परिसरात या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. या म्हशी आकाराने मध्यम पण अतिशय काटक असतात. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोहचणारी लांब व पिवळटलेली तलवारीसारखी शिंगे हे त्यांचे वैशिष्ट्य. म्हशीचे वजन साधारण 400 किलो व रेड्याचे वजन 500 किलो असते. पारड्या वयाच्या 25 ते 30 महिन्यात गाभण राहतात आणि 35 ते 40 महिन्यात पहिल्यांदा वितात. Top 3 Buffalo Breeds

top 3 buffalo breeds

मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताचे वेळी कमी वय, उत्तम प्रजोत्पादन व दुग्धोत्पादन क्षमता आणि दुग्धोत्पादनाचे सातत्य या गुणांमुळे दुधासाठी ही जात चांगली आहे. हे सर्व गुण एकत्रितपणे इतर जातीत आढळत नाहीत. या म्हशी एका वेतात 1500 ते 1800 लिटर दूध देतात. पंढरपुरी म्हशीच्या पैदाशीसाठी गोठीत विर्याच्या मात्रा रु. 15/- प्रती मात्रा या दराने गो संशोधन व विकास प्रकल्प, म.कु.कृ.वि., राहुरी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Top 3 Buffalo Breeds

हेही वाचा: Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment Date Fix | मनो शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता होणार जमा

हेही वाचा: दुधारू दुभत्या गाई म्हशीची निवड कशी करायची ?

हेही वाचा: 2 दिवसात दूध डबल | गाय म्हैस चे दूध वाढवायचा सर्वात खात्रीशीर उपाय

हेही वाचा: शबरी घरकुल योजना | Shabari Gharkul Yojana

भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशीची पैदास

म्हशीचे प्रजोत्पादन करण्यासाठी शुद्ध जातीचा व उत्तम प्रतीचा रेडा निवडावा. लवकर गाभण राहणाऱ्या व जास्त दूध देणाऱ्या म्हशीपासून पैदा झालेला वळू निवडून त्याची चांगली जोपासना करावी. त्याचा उपयोग करून त्याच जातीची शुद्धता व वैशिष्ट्ये जतन करावीत. निवड पद्धतीनेच म्हशीमध्ये सुधारणा करणे शक्य आहे. त्यापासून मिळणाऱ्या पिढ्यांची वाढ करणे फायद्याचे ठरते. जनावर व्याल्यावर 2 महिन्याने वळू दाखवावा व विण्यापूर्वी एक ते दीड महिना जनावर भाकड करावे. Top 3 Buffalo Breeds

Top 3 Buffalo Breeds माजाची लक्षणे

बहुतांशी म्हशी सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर माजावार येतात. म्हशींचा सोट घट्ट असतो. गाईप्रमाणे तो लोंबत नाही किंवा पुठ्ठ्याला चिकटलेला नसतो. म्हैस वारंवार लघवी करते. निरणाचे कातडीवर पांढरट क्षार दिसतात. माजावरील म्हशींचे निरण सुजल्यासारखे दिसते, निरणाचा रंग जास्त काळसर व तेलकट दिसतो. म्हैस पान्हा चोरते, कास व सड ताठरलेले दिसतात. माजावरील म्हशींच्या पाठीवर थाप मारल्यास ती आपली शेपटी उंचावते. Top 3 Buffalo Breeds

Top 3 Buffalo Breeds आहार व निगा

क्षमतेइतके दूध मिळण्यासाठी सर्वसाधारणतः 400 किलो वजन असलेल्या म्हशीस दररोज 25 किलो हिरवा व 7 ते 8 किलो कोरडा चारा शरीर पोषणासाठी द्यावा. दूध निर्मितीसाठी, दररोजच्या एकूण दूध उत्पादनाच्या 50% खुराक द्यावा, म्हणजे दूध उत्पादनाचे सातत्य टिकून राहील. प्रत्येक म्हशीला पिण्यासाठी 60 ते 75 लि. पाणी रोज लागते. म्हशी डुंबण्यासाठी पाण्याची सोय असल्यास चांगले. Top 3 Buffalo Breeds

Which buffalo is best for milk in India?

top 3 buffalo breeds

आपल्या एकूण दूध उत्पादनात म्हशीच्या दुधाचा वाटा 55% इतका आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे उत्तम प्रक्रिया दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे. म्हणून म्हशींचे संगोपन चांगल्या रितीने करण्याची गरज आहे. दूध उत्पादनाशिवाय मांसोत्पादन व ओढकामासाठी सुद्धा म्हशींचा / रेड्यांचा वापर केला जातो. मुऱ्हा, मेहसाणा, पंढरपुरी, सुरती या भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या जाती आहेत.

दुधाळ म्हैशींची लक्षणे

दुधाळ म्हैशींची लक्षणे

दुधाळ म्हैशींची निवड सर्वसाधारणपणे दुधाळ म्हैशींचा मागील भाग मोठा व रुंद असतो. चारही सड एकाच आकाराचे असतात त्यांची एक लांबी सारखी असते. कासेच्या शिरा मोठ्या लांब व स्पष्ट असतात. जनावर तरतरीत असते. कातडी तजेलदार, पातळ व मऊ असते. एकंदर जनावर समोरुन निमुळते. मागे रुंद होत गेलेले दिसते. सर्वसाधारण बांधा भक्कम असतो व कोठा तुलनात्मकदृष्ट्या मोठा असतो. वरील सर्व गुणांबरोबर म्हैस निरोगी असावी.

www.eFARMWALA.com

आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.

9 thoughts on “भारतातील सर्वात जास्त दूध देणाऱ्या टॉप 3 म्हैशी | Top 3 Buffalo Breeds for milk in India”

Leave a comment