शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय कृषिपंपांना दिवसा वीज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.०

शासनाचा निर्णय शेतकऱ्यांना दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा 

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासकीय आणि खाजगी जमिनींचा प्राधान्यक्रमाने वापर केला जाणार 

शेतकऱ्यांना आपली पडीक / नापीक जमीन भाड्यावर देऊन नियमित उत्पन्न मिळवायची संधी 

शेतकऱ्यांना एकरी रु. ५०००० तर हेक्टरी १.२५ लाख रु वार्षिक भाडे / ३ टक्के वार्षिक वाढहि मिळणार 

अभियानात उत्स्फुर्तपणे सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना रु. १५ लाख अनुदान 

किमान ३ ते ५० एकर लाभार्थ्यांची जमीन महावितरण केंद्रापासून ५ किमी च्या आत असावी 

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करणे आवश्यक.

नोंदणी केल्यानंतर अर्जदाराने जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज करण्यासाठी योग्य युजर-आयडी / पासवर्डने लॉग इन करावे लागेल.

एक अर्जदार एका जागेसाठी एकाच अर्ज करू शकतो.