गाय-म्हैस  माजावर येण्यासाठी खात्रीशीर उपाय

तुमची गाय-म्हैस माजावर येत नाही वारंवार उलटते का?

दिवस १ ला., २ रा., ३ रा., ४ था., ५ वा.

सुरवातीचे ५ दिवस एक मुळा आणि २०ग्राम जिरे गाई किंवा म्हैशी ला रोज द्यावयाचे आहे.

मुळा आणि २०ग्राम जिरे गाई किंवा म्हैशीला दिल्यामुळे गर्भाशयात असणारी कृमी, घाण निचरा होऊन संसर्ग कमी करण्यास मदत होते

दिवस ६ वा., ७ वा., ८ वा., ९ वा.,

पुढील चार दिवस कोरफडीचे एक पान प्रत्येक दिवशी गाई व म्हैशीला खायला द्यावयाचे आहे

कोरफड जिवाणू, विषाणू व बुरशीनाशक म्हणून काम करते.

दिवस १० वा., ११ वा., १२ वा., १३ वा., शेवगा 

पुढील चार दिवस चार मुठी शेवग्याची पाने प्रत्येक दिवशी गाई व म्हैशीला खायला द्यावयाचे आहे

शेवग्याच्या पानाच्या वापरामुळे गाई म्हशीं माजावर येण्यासाठी आवश्यक खनिजद्रव्य व जीवनसत्त्वांची पूर्तता होते.

दिवस १४ वा., १५ वा., १६ वा., १७ वा.,

पुढील चार दिवस हाडजोडच्या २ ते ३ कांड्या प्रत्येक दिवशी गाई व म्हैशीला खायला द्यावयाचे आहे

हाडजोड वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याने त्याचा फायदा गाई म्हैशींना माजावर येण्यासाठी व गर्भ धारणेसाठी होतो.

दिवस १८ वा., १९ वा., २० वा., २१ वा.,

शेवटचे चार दिवस चार मुठी कढीपत्त्याची पाने, एक चमचा हळद, चवीसाठी मीठ व गूळ प्रत्येक दिवशी गाई व म्हैशीला खायला द्यावयाचे आहे

काडिपत्त्यामध्ये मोट्या प्रमाणात आढळणारी फॉसफरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम खनिजद्रव्य गर्भधारणा स्थिर ठेवण्यास मदत करते.